तुमची जमीन तुमचीच असल्याचे सिद्ध करणारे हे 4 पुरावे, तुमच्याकडे आहे का? हे पुरावे प्रत्येकाने जपून ठेवा | Land Ownership Documents

शेतकरी बांधवांनो जमिनीशी संदर्भातील प्रत्येक व्यवहार आपण जपून केला पाहिजे. तसेच अनेक वेळा आपल्याला आपली जमीन आपलीच असल्याचे सिद्ध करावे लागू शकते त्यामुळे जमिनी संदर्भातील असणारे महत्त्वाचे कागदपत्र आपण नेहमी जपून ठेवले पाहिजे. जर तुमच्या जमिनीचा वाद कोर्टामध्ये चालू असेल, किंवा तुम्हाला असे वाटत असेल की भविष्यामध्ये एखाद्या व्यक्ती आपल्या जमिनीवर दावा करू शकतो, अशा वेळेस तुम्ही या Land Ownership Documents च्या माध्यमातून तुम्हाला काही कागदपत्रे तुमची जमीन असल्याचे सिद्ध करून देऊ शकतात.

 

अनेक वेळा भावाभावामध्ये तसेच नातलगामध्ये तसेच बहीण भावामध्ये जमिनी संदर्भातील वाद निर्माण होतात कोर्टामध्ये केस होते. त्यामुळे जर आपल्या जमिनीवर भविष्यामध्ये कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करेल अशी शक्यता असेल तर तुम्ही खालील काही महत्त्वाची जमिनी संदर्भातील कागदपत्रे आहेत. ते नेहमी जपून ठेवायला पाहिजे. हे land Ownership Documents कागदपत्रे तुमच्या जमिनीचा मालकत्व सिद्ध करणाऱ्या असून त्याचा फायदा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळेल.

 

खालील 4 महत्त्वाचे जमिनीचे कागदपत्र जपून ठेवा Land Ownership Documents List

जमिनी संदर्भात खालील चार महत्त्वाचे कागदपत्र असून ते प्रत्येक शेतकऱ्यांनी पुरावा म्हणून वापरण्यासाठी जपून ठेवायला पाहिजे. कागदपत्राच्या माध्यमातून ही जमीन तुमचीच असल्याचे तुम्ही सिद्ध करू शकतात.

 

1. सातबारा व आठ अ

मित्रांनो प्रत्येक जमिनीला सातबारा उतारा व आठ अ उतारा असतो. सातबाराला शेत जमिनीचा आरसा सुद्धा म्हटले जाते कारण की सातबारा वर तुमच्या शेत जमिनीची संपूर्ण माहिती असते त्यामध्ये जसे की सातबारा वर किती व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे तसेच तुमच्या जमिनीमध्ये विहीर आहे का तुमच्या जमिनीतील किती टक्के भाग पोट खराब आहे. सातबारा वर फेरफार क्रमांक सुद्धा नमूद असतो म्हणजे जमिनीमध्ये यापूर्वी कोणत्या प्रकारचा बदल केला याची सुद्धा माहिती सातबाराच्या माध्यमातून मिळते.

त्यामुळे जमिनीचा मालकत्व सिद्ध करणारा सातबारा उतारा व आठव उतारा हा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे तो प्रत्येकाने जपून ठेवावा.

 

2. औषधी व रासायनिक खते खरेदीच्या पावत्या

दरवर्षी आपण कृषी केंद्रामधून रासायनिक खते आणि औषधे खरेदी करतो ती शक्यतो स्वतःच्या नावावर खरेदी करावीत व त्याच्या पावत्या जपून ठेवावा.

 

3. पिक विमा योजनेच्या पावत्या:

शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आपण आपल्या पिकांचा पिक विमा काढत असतो, या पावत्यांवर कोणत्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला एकूण किती क्षेत्राचा कळला तसेच जमिनीची माहिती असते त्यामुळे ही पावती तुम्हाला अतिशय महत्त्वाची ठरते. हे सुद्धा पावती प्रत्येकाने व्यवस्थित ठेवावे.

 

Property Rights: पतीच्या संपत्तीवर पत्नीचा किती अधिकार असतो? संपत्तीत पत्नी ला अधिकार मिळतो का? कसा व केव्हा? 

 

4. प्रॉपर्टी कार्ड तसेच महसूल पावत्या:

प्रॉपर्टी कार्ड वर तुमच्या जमिनीची संपूर्ण माहिती असते हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. तसेच आपण आपल्या शेत जमिनीचा जर महसूल भरत असाल तर, त्या Jamin Kagadpatre संदर्भातील कोणत्या शेतकऱ्यांनी कोणत्या जमिनीचा महसूल भरला आहे, याची माहिती देणाऱ्या पावत्या महत्त्वाच्या असतात.

 

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं, आता घरबसल्या करा सातबारा वर वारसाची नोंद, सातबाऱ्यावर घरातील व्यक्तीचे नाव टाका ऑनलाईन

 

वरील सर्व कागदपत्रे तुम्हाला जमिनी संदर्भात महत्त्वाचा पुरावा म्हणून वापरता येतील. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यावर कोणत्याही वेळेची वाट न पाहता वरील सर्व महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित जपून ठेवावी. जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.