नवीन विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान मिळणे सुरू, असा करा तात्काळ अर्ज | Vihir Anudan Yojana

शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांना पाणी देता यावे यासाठी राज्य शासनाने विहीर अनुदान योजना सुरू केली होती. विहिरीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदान पूर्वी 2 लाख 50 हजार रुपये इतके होते. परंतु आता महाराष्ट्र शासनाने अनुदानात वाढ केलेली असून आता मागील त्याला विहिरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाख रुपये इतके अनुदान मिळत आहे. राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येणार आहे या मागील त्याला विहीर योजने अंतर्गत अर्ज कसा करायचा तसेच त्या Vihir Anudan Yojana करिता आवश्यक असणारी अटी व शर्ती आणि पात्रता तसेच कागदपत्रे यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

कोणत्या योजने अंतर्गत मिळणार विहिरीसाठी 4 लाख अनुदान Vihir Anudan 2023 Maharashtra

शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत मागेल त्याला विहीर अनुदान योजना या घटकांतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने पूर्वीच्या विहीर अनुदान योजनेत बदल करून नव्याने नव्या स्वरूपात अनुदानामध्ये वाढ करून ही Vihir Anudan Yojana Maharashtra राज्यात सुरू केलेली आहे, त्यामुळे आता प्रत्येक शेतकरी ज्याला विहिरीची आवश्यकता आहे अशा सर्व शेतकऱ्यांना विहीर वाटप करण्यात येणार आहे.

 

 

आवश्यक कागदपत्रे Required Documents For Vihir Yojana

शेतकरी बांधवांना मागील त्याला विहीर अनुदान योजना तुम्हाला नवीन विहीर बांधण्यासाठी चार लाख रुपये इतक्या अनुदान मिळवायचे असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असायला पाहिजे.

1. मागेल त्याला विहीर अंतर्गत करावयाचा अर्ज

2. शेत जमिनीचा सातबारा उतारा व आठ अ

3. जातीचा दाखला

4. अपंग प्रमाणपत्र असल्यास

5. जॉब कार्ड

6. आधार कार्ड

7. इतर आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं, आता घरबसल्या करा सातबारा वर वारसाची नोंद, सातबाऱ्यावर घरातील व्यक्तीचे नाव टाका ऑनलाईन

 

अर्ज कसा करायचा?

शेतकरी बांधवांना जर तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतात नवीन विहीर बांधायचे असेल आणि त्यासाठी चार लाख रुपये अनुदान पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये आपले पद्धतीने अर्ज सादर करू शकता. मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत करावयाचा अर्ज हा ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज जमा करू शकतात.

4 लाख अनुदान मिळण्यासाठी करावयाचा अर्ज pdf येथे पहा

प्लास्टिक मल्चिंग अनुदान मिळवण्यासाठी असा करा अर्ज, भाजीपाला व फळ पिकांसाठी अतिशय उपयुक्त, 50 टक्के अनुदान