प्लास्टिक मल्चिंग अनुदान मिळवण्यासाठी असा करा अर्ज, भाजीपाला व फळ पिकांसाठी अतिशय उपयुक्त, 50 टक्के अनुदान | Plastice Mulching Anudan

मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेच्या माध्यमातून प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. भाजीपाला पिके व फळ पिके यांच्यासाठी प्लास्टिक मल्चिंग अतिशय उपयुक्त असून त्याकरिता शेतकरी 50% पर्यंत अनुदान मिळू शकतात. या योजने अंतर्गत अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याकरिता आवश्यक पात्रता या Plastice Mulching Anudan Yojana संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

कोणत्या पिकांसाठी प्लास्टिक मल्चिंग अनुदान मिळते? Plastic Mulching Subsidy Details

भाजीपाला पिके तसेच फळ पिके, 3 महिन्यापर्यंतची भाजीपाला पिके किंवा फळ पिके तसेच बहु वार्षिक फळबाग या सर्वांच्या लागवडीकरिता शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे.

 

अनुदान किती मिळते? Plastic Mulching Anudan:

राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी देण्यात येणारे हे अनुदान एकूण खर्चाच्या 50 टक्के आहे. प्रति हेक्टर 32 हजार रुपये इतका खर्च या प्लास्टिक मल्चिंग अनुदानासाठी करण्यात येतो. आणि या 32 हजाराच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 16 हजार रुपये पर्यंतचा अनुदान तुम्हाला या प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेअंतर्गत मिळते.

 

प्लास्टिक मल्चिंग योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा? How to Apply for Plastic Mulching Yojana?

जर तुम्हाला सुद्धा प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

1. सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाची महाडीबीटी फार्मर ची वेबसाईट तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये ओपन करा.

2. आता या वेबसाईटवर जर तुम्ही या पूर्वी कोणत्याही प्रकारचा अर्ज केलेला नसेल तर त्यासाठी नोंदणी करायची आहे.

3. तुम्ही शेतकरी म्हणून नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक युजरनेम आणि पासवर्ड मिळेल त्याच्या माध्यमातून लॉगिन करून घ्या.

4. आता या वेबसाईटच्या मेन पेजवर तुम्हाला अर्ज करा नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

5. आता तुम्हाला या वेबसाईट वर एकात्मिक फलोत्पादन हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

6. आता तुमच्या समोर अर्ज ओपन झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका तसेच तुमचे गाव इत्यादी सर्व माहिती दिसत असेल.

7. आता इतर घटक हा पर्याय त्या ठिकाणी निवडा.

8. त्यानंतर तुम्हाला प्लास्टिक मल्चिंग या बाबीवर क्लिक करायचं आहे.

9. या ठिकाणी तुम्हाला तुमचे हेक्टर मधील क्षेत्र निवडायचा आहे.

10. शेवटी तुमचा अर्ज जतन करा आणि या वेबसाईट च्या होम पेजवर येऊन तुमचा अर्ज सादर करा. आता पेमेंट करा आणि तुमचा अर्ज सक्सेसफुल सबमिट होईल.

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

अशाप्रकारे आपण जास्तीत जास्त 16 हजार रुपये प्लास्टिक मशीन साठी अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. योजनेअंतर्गत तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला एसएमएस प्राप्त होईल किंवा तुम्ही पोर्टलवर लोगिन करून चेक करू शकतात.

 

Pocra DBT Scheme: या योजनेअंतर्गत जुन्या विहिरीचे तसेच बोरवेल चे पुनर्भरण करा, मिळेल 16000 अनुदान, लगेच करा अर्ज