शेतकऱ्यांनो कापसाने यावर्षी शेतकऱ्यांना चक्क रडवले आहे, शेतकऱ्यांना अपेक्षित असणारा कापसाचा 12 हजार ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर दूरच राहिला, सध्या शेतकऱ्यांना त्याच्या निम्मे किमतीने कापूस विकावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच देशातील बाजारात कापसाचे दर दबावत असून मार्च महिना सुरू झाल्यानंतर कापसाने चक्क मान टाकली आहे. परंतु आज कापसाच्या वायदे बाजारात वाढ झालेली दिसते. त्यामुळे येत्या काळात कापसाचे भाव वाढणार का? या Cotton Market चे थोडक्यात विश्लेषण आपण जाणून घेऊया.
शेतकरी बांधवांना देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात कापसाचे भाव दबावात आहे. कापसाचे भाव वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणात कापूस विकायला सुरुवात केली आहे. आता मे महिला सुरू असून पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांना नवीन लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता असते. तसेच शेतकरी आता जास्त काळ कापूस साठवून ठेवू शकत नसल्यामुळे ते विक्री करण्यात येत आहे.
कापसाच्या दरात सुधारणा
पण सध्या कापूस वायदे बाजारात कापसाला चांगले दिवस आहे. चालू आठवड्यात कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा झालेली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन तसेच अमेरिका व भारत आणि पाकिस्तान मध्ये काहीशा प्रमाणात कापसाच्या दरात cotton market price मध्ये वाढ होत आहे.
चालू आठवड्यामध्ये अमेरिकेत कापूस वायद्यांमध्ये वाढ झालेली असून कापसाचे फायदे 84 सेंटवर पोचले आहे. म्हणजेच कापसाच्या वायद्यांमध्ये 5 टक्यांची वाढ झाली आहे. कापूस तज्ञांनी अमेरिकेच्या कापसाला चीन या देशाकडून उठाव मिळाल्याची माहिती दिले आहे.
चीन मध्ये कापसाच्या दरात वाढ:
शेतकरी बांधवांनो चीन या देशात कापसाच्या दरात प्रति टन 445 युआनची वाढ झाली आहे, त्यामुळे सध्या चीन मध्ये कापसाला पंधरा हजार सहाशे पन्नास युआन इतका दर मिळत आहे.
देशातील कापूस वायद्यांमध्ये वाढ:
शुक्रवारी देशातील कापसाच्या वायद्यांमध्ये 180 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. कापसाचे वायदे 63260 रुपये प्रतिखंडीवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये मध्ये झालेल्या सुधारणाचा परिणाम हा देशातील कापूस वायदा बाजारावर झाला. असेच सुधारणा देशात पुढील आठवड्यात राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
देशातील कापसाच्या बाजारभावात सुधारणा Kapus Bajarbhav:
देशातील कापूस वायदे दरामध्ये झालेल्या सुधारणांचा परिणाम हा देशातील काही बाजार समितीमध्ये दिसून आला. देशातील अनेक बाजार समितीमध्ये Kapus Bajarbhav मध्ये दरात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा दिसून आली. सध्या देशात कापूस 7500 ते 8200 रुपयांच्या दरम्यान आहे.