शेतकऱ्यांनो तो दिवस जवळ येतोय, राज्यात या तारखेपासून मान्सून लावणार हजेरी; हवामान अभ्यासक पंजाब डख यांची माहिती | Monsoon Andaj 2023

शेतकरी बांधवांना लवकरच नवीन खरीप हंगाम सुरू होणार आहे, या नवीन खरीप हंगामामध्ये पाऊस कसा राहील, याचा अंदाज प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत असायला पाहिजे. यावर्षी हवामानाचा अंदाज कसा राहील किती पाऊस आपल्या भागात पडेल त्यानुसार आपण योग्य त्या पिकाची निवड करून लागवड करू शकतो. त्यामुळे इथे खरीप हंगामात राज्यात हवामान कसे राहील मान्सून केव्हा राज्यात येणार याचा Monsoon Andaj 2023 Maharashtra आपण जाणून घेणार आहोत.

राज्यातील अनेक शेतकरी बांधव हवामान अभ्यासक पंजाब डख साहेब यांच्या हवामानाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डक यांनी 2023 चा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. Monsoon Andaj 2023 चा हवामानाचा एकंदरीत अंदाज आपण या लेखात जाणून घेऊया.

 

पंजाबराव यांनी दिलेल्या 2023 चा हवामानाचा अंदाज Panjabrao Dakh Monsoon Andaj 2023

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात 8 जूनला मान्सूनची आगमन होणार आहे. हा मान्सून राज्याच्या सर्वच भागात 22 जून 2023 पर्यंत पोहोचणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या हवामानाच्या अंदाजानुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम 2023 च्या पेरण्या या 27 ते 30 जून पर्यंत होणार आहे. जे शेतकरी या कालावधीमध्ये पेरण्या करू शकणार नाहीत त्या शेतकऱ्यांना नंतर जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेरण्या करता येतील.

 

यावर्षी एकंदरीत पाऊस कसा राहील?

2023 च्या मान्सून अंदाजानुसार या वर्षीचा पाऊस जुलै महिन्यामध्ये जून महिन्याच्या तुलनेत जास्त असणार आहे. तसेच जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जास्त पाऊस पाहायला मिळणार त्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यावर्षीचा मान्सून गेल्यावर्षीच्या मान्सून सारखाच होण्याची शक्यता हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी वर्तवली आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा 2022 सारखाच पावसाळा होणार असून गेल्या वर्षी प्रमाणे कृष्णा नदीच्या काठावर यावर्षी देखील महापूर होणार आहे.

 

यापूर्वी भारतीय हवामान विभागाने देखील यांचा 2023 चा Monsoon Andaj 2023 जाहीर केला होता, हवामान विभागाच्या मान्सून अंदाजानुसार यावर्षी देशात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणारा असून त्यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे.

शेतकऱ्यांनो तो दिवस जवळ येतोय, राज्यात या तारखेपासून मान्सून लावणार हजेरी; हवामान अभ्यासक पंजाब डख यांची माहिती | Monsoon Andaj 2023

2023 मध्ये या भागात पडणार प्रचंड मोठा दुष्काळ, इथे क्लिक करून पाहा कुठे पडणार दुष्काळ

 

अश्या प्रकारे आपण या लेखात Panjabrao Dakh Havaman Andaj 2023 संदर्भात एक छोटीशी अपडेट जाणून घेतलेली आहे. हवामानाच्या अंदाज संदर्भात इतर कोणत्याही प्रकारची महत्त्वाची अपडेट आल्यास तुम्हाला या वेबसाईटवर कळवण्यात येईल.

शेतकऱ्यांनो तो दिवस जवळ येतोय, राज्यात या तारखेपासून मान्सून लावणार हजेरी; हवामान अभ्यासक पंजाब डख यांची माहिती | Monsoon Andaj 2023

2023 मध्ये या भागात येणार महापूर! येथे क्लिक करून पाहा कुठे कोणत्या भागात या वर्षी महापूर

Leave a Comment