मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात अवैध वाळू उत्खननातून वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन वाळू धोरण आणलेले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार आता प्रत्येकाला फक्त 600 रुपयात एक ब्रास वाळू मिळणार आहे. राज्यात 1 मे पासून शासकीय वाळू धोरण लागू करण्यात आलेले असून आता सर्व सामान्यांना कमी किमतीत वाळू मिळणे शक्य झाले आहे. त्याकरिता सर्वांनी Sand Booking Online करावी.
राज्यातील सर्वसामान्य व्यक्तींना घर बांधण्यासाठी सहाशे रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळू मिळणार आहे, तसेच व्यक्ती घरकुल योजनेअंतर्गत घर बांधणार आहेत अशा व्यक्तींना 5 ब्रास वाळू मोफत मिळणार आहे. त्यामुळे शासकीय नवीन वाळू धोरणानुसार अतिशय कमी किमतीत स्वस्त वाळू मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यामुळे स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी नोंदणी करायची Sand Booking Maharshtra Process प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत.
राज्यात अनेक ठिकाणी वाळू घाटाचे उद्घाटन होत असून या घाटामध्ये सर्वसामान्य नागरिकांना वाळूचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच भागात घाटांची स्थापना तसेच उद्घाटन होत असून तुम्हाला तुमच्या जवळील वाळू घाटामधून वाळूचे वितरण होणार आहे. त्यामुळे Sand booking on mahakhanij बद्दल ही माहिती महत्वाची आहे.
ऑनलाइन वाळू बुकिंग साठी आवश्यक कागदपत्रे Required Documents for San Booking:
ऑनलाइन वाळू बुकिंग करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्र असायला पाहिजे.
1. पॅन कार्ड, आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. मोबाईल क्रमांक
4. पासपोर्ट फोटो
ऑनलाइन वाळू बुकिंग कशी करायची?
जर तुम्हाला स्वस्तात वाळू मिळवायचे असेल तर त्यासाठी खालील प्रमाणे अर्ज करा.
1. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाखनिज च्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.
2. ऑनलाइन वाळू बुकिंग करण्यासाठी वेबसाईट – www.mahakhanij.Maharashtra.gov.in
3. आता या वेबसाईट वर तुम्हाला Sand Booking नावाच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
4. आता तुम्हाला तुमच्या समोर नवीन पेज ओपन झालेला आहे, त्यामध्ये stockyard details नावाच्या पर्यायावर क्लिक करा.
5. तुमच्या जिल्ह्यामध्ये वाळू डेपो निर्माण झाला आहे का, याची माहिती मिळवा, जर झाला असेल तर च तुम्ही ऑनलाइन वाळू बुकिंग करू शकतात.
6. आता लॉगिन करून घ्या, जर तुम्ही वेबसाईटवर पहिल्यांदा आलेला असेल तर तुमची नवीन अकाउंट बनवण्यासाठी sign up नावाच्या पर्यावर क्लिक करा.
7. आता तुमची प्रोफाइल कम्प्लीट करून घ्या.
8. त्यानंतर तुम्ही वाळू बुकिंग साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन बुकिंग करण्याचा व्हिडिओ पाहा
अशाप्रकारे आपण आजच्या या लेखात शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणारी स्वस्त दरात वाळू ऑनलाईन बुक करणे संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे.