मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या गाडीचा नंबर वरून त्या गाडी मालकाचे नाव व पत्ता जाणून घ्यायचा असतो. ती गाडी कोणाच्या नावावर आहे, ती गाडी कधी खरेदी केली होती तसेच त्या गाडीची संपूर्ण तपशील आपल्याला ऑनलाइन पाहता येते. परंतु आपल्याला याबद्दल थोडीशी माहिती नसल्यामुळे ते आपण चेक करू शकत नाही. आजच्या लेखात आपण फक्त गाडीच्या नंबरच्या माध्यमातून त्या गाडी मालकाचे नाव व पत्ता कसा पहायचा, या Vehical owner information ची माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो अनेक वेळा अपघात झालेला असताना आपल्याला त्या वाहन मालकाची संपूर्ण माहिती मिळवणे आवश्यक असते. किंवा एखाद्या वेळेस जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या नावावर असणारे vehical details online चेक करायची असेल तर ती आपल्याला ऑनलाइन चेक करण्याची सुविधा आहे. आजकाल सर्वच गोष्टी ऑनलाईन होत असल्यामुळे परिवहन विभागाने सुद्धा हे महत्त्वाचे पाऊल उचलला आहे.
त्यामुळे आता कोणती गाडी कोणत्या व्यक्तीच्या नावावर आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयामध्ये जाऊन चकरा मारण्याची आवश्यकता नसून फक्त गाडीच्या नंबर वरून तुम्ही त्या गाडीची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. यापूर्वी गाडीच्या नोंदी ऑफलाईन पद्धतीने व्हायच्या त्यामुळे कोणती गाडी कोणाच्या नावावर आहे याची माहिती मिळायची नाही. त्यामुळे सदर online vehicle owner details चेक करण्यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयांमध्ये जावे लागत होते. परंतु आता सर्व बाबी ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे तुम्हाला घरबसल्या चेक करता येते.
गाडी मालकाचा पत्ता व नाव असे चेक करा:
मित्रांनो जर तुम्हाला आता एखाद्या वाहनाची माहिती काढायची असेल, किंवा Vehical owner information तर त्याकरिता तुमच्या मोबाईल मध्ये परिवहन विभागाचे अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. किंवा तुम्ही परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील वाहन मालकाची माहिती चेक करू शकतात.
1. आता तुमच्या मोबाईल मध्ये परिवहन विभागाचे ॲप ओपन करा किंवा Parivahan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
2. आता या ठिकाणी तुम्हाला RC Status नावाचा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे.
3. आता तुम्हाला ज्या वाहनाची माहिती पाहिजे असेल ज्या गाडी च्या मालकाची माहिती पाहिजे त्या गाडीचा क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करा.
4. आता तुमच्यासमोर असलेला कॅपच्या कोड प्रविष्ट करा आणि सर्च नावाच्या ऑप्शन वर क्लिक करा.
5. आता तुम्ही जो गाडी क्रमांक टाकलेला आहे त्या गाडीची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन झालेली असेल.
6. यामध्ये तुम्हाला त्या गाडीचा नंबर तसेच गाडी मालकाचे नाव त्या गाडी मालकाचा ऍड्रेस तसेच गाडीची नोंद कधी झाली इन्शुरन्स किती वर्षाचा आहे तसेच संपूर्ण माहिती दिसत असेल.
कोणती गाडी कोणाच्या नावावर आहे हे चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
अशाप्रकारे आपण घरबसल्या केवळ वाहनाच्या नंबरच्या माध्यमातून त्या वाहन मालकाची संपूर्ण माहिती चेक करू शकतो.