शासकीय वाळू बुकिंग करणे सुरू, 600 रुपयात वाळू मिळवण्यासाठी अशी करा नोंदणी | Online Sand Booking Maharshtra

मित्रांनो शासनाच्या नवीन शासकीय वाळू धोरणानुसार आता राज्यात अवैध वाळू उत्खनन बंद झाली असून आता सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त वाळू मिळत आहे. त्यामुळे अतिशय माफक दरात चांगल्या प्रतीची वाळू मिळत असून त्या करिता संबंधित व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करायची आहे. या नवीन शासकीय वाळू धोरण बद्दलची माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Online Sand Booking Maharshtra करण्याची प्रोसेस सुद्धा आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सर्वसामान्य नागरिकांना वितरित करण्यात येणारे स्वस्त दरातील वाळू योजनेची अंमलबजावणी ही महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाच्या निर्देशनानुसार जिल्हा प्रशासन करणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळूचे डेपो निर्माण झाल्यानंतर त्या भागातील सर्व सामान्य नागरिकाना ऑनलाइन पद्धतीने Online Sand Booking वाळू नोंदणी करून स्वस्त वाळू मिळणार आहे. राज्यातील रेतीची अवैध वाहतूक थांबवणे तसेच रेतीच्या अवैध उत्खनन मुळे राज्यात निर्माण होणारी गुन्हेगारी पार्श्वभूमी थांबवण्यासाठी राज्य शासनाने हे नवीन शासकीय वाळू धोरण लागू केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार वाळूचे उत्खनन तसेच वाळूची वाहतूक तसेच वाळूची विक्री ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत.

 

प्रत्येक तालुक्यावर ज्या ठिकाणी बंधारे आहेत किंवा रेतीचा स्त्रोत आहेत त्या ठिकाणी तपासणी करण्यात येणार असून त्या ठिकाणी वाळू डेपो निर्माण होत आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना शासनाच्या माध्यमातून स्वस्थ दरात होती मिळणे शक्य झाले आहे. या भागामध्ये लवकरात लवकर वाळू डेपो निर्माण होतील तसेच सर्व प्रक्रिया जलद गतीने पार पडल्या जाईल त्या ठिकाणी नागरिकांना लवकरात लवकर स्वस्त वाळू मिळणार आहे.

 

ऑनलाइन वाळू बुकिंग करण्यासाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

 

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वच सर्वसामान्यांना घर बांधण्यासाठी स्वस्तात वाळू मिळणार असून टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्वच भागात योजना सुरू होत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन वाळू धोरण लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले असून संबंधित विभागाला सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 

ऑनलाइन वाळू बुकिंग करण्यासाठी अर्ज कसा करायचा? याची माहिती येथे पहा

 

वरील लिंक वरून तुम्ही sand booking करण्याची प्रोसेस जाणून घेऊ शकतात, टप्या टप्याने राज्याच्या सर्वच भागात वाळू डेपो तयार झाल्या नंतर सर्व सामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू मिळेल. ही माहिती इतरांना देखील शेअर करा, अश्याच माहिती करिता या वेबसाईट वर भेट देत रहा