Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता मे महिन्यात जमा होणार पीएम किसान व नमो शेतकरी चे 4000; फक्त यांना मिळणार लाभ

शेतकरी बांधवांनो केंद्र व राज्य सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत. त्यातील अतिशय महत्त्वाची असणारी शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप फायदेशीर असणारी व केंद्र सरकारने सुरू केलेली योजना म्हणजे पी एम किसान योजना होय. तसेच आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या Farmers Scheme 2023 संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा अपडेट प्राप्त झालेल्या असून त्या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया.

 

देशातील कोट्यावधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवत आहे. महाराष्ट्र राज्यातील सुद्धा अनेक शेतकरी या योजनेचा लाभ मिळवत आहेत, महाराष्ट्र शासनाने PM Kisan Yojana च्या धर्तीवर Namo Shetkari Yojana सुरू केलेली असून आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता असे तीन हप्ते म्हणजेच एका वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहे.

 

दोन्ही योजनांचे पैसे मिळणार मे महिन्यात:

शेतकरी बांधवांना नमो शेतकरी सन्मान योजना चा पहिला हप्ता आणि पीएम किसान सन्मान योजना 14 वा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना एकाच वेळेस म्हणजेच पुढच्या महिन्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मे महिन्यामध्ये 4 हजार रुपये मिळणार आहे.

म्हणजेच आता इथून पुढे शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहे.

 

केव्हा सुरू झाली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना:

मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना Pradhanmantri Kisan Sanman Yojana या प्रमाणे राज्यातील एखाद्या योजने अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये मिळावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर या योजने करिता आर्थिक तरतूद देखील करण्यात आलेली आहे. आणि आता ही namo shetkari yojana शासन निर्णय काढून राबविण्यात मान्यता दिली आहे.

 

शेतकऱ्यांनो तो दिवस जवळ येतोय, राज्यात या तारखेपासून मान्सून लावणार हजेरी; हवामान अभ्यासक पंजाब डख यांची माहिती

 

खालील शेतकऱ्यांना मिळेल लाभ:

मित्रांनो आता लवकरच नमो शेतकरी योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना मिळणार असून नेमके राज्यातील कोणती शेतकरी बांधव या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळण्यासाठी पात्र असतील असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी लाभ मिळू शकणार आहे. त्यानंतर योजनेअंतर्गत इतर कोणत्याही शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात येणार का या संदर्भातील माहिती योजनेची हप्ते सुरू झाल्यानंतर प्राप्त होईल.

 

शासकीय वाळू बुकिंग करणे सुरू, 600 रुपयात वाळू मिळवण्यासाठी अशी करा नोंदणी