शेतकरी मित्रांनो यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. शेतकऱ्यांना कापसाच्या बाजारभावातून असणाऱ्या सर्व अपेक्षांचा भंग झालेला असून शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे. आता अनेक शेतकऱ्यांसमोर मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असून शेतकऱ्यांनी कापूस पीक उत्पादन करण्यासाठी केलेला cotton market price खर्च सुद्धा सध्याच्या बाजार भावतून निघत नाही आहे.
सध्या असणारी कापसाच्या बाजारभावाची स्थिती? Cotton market Rates:
शेतकरी बांधवांनो गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे यावर्षी सुद्धा चांगला भाव मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी इतर पिकांची लागवड न करता कापसाची लागवड केली होती. सुरुवातीला कापसाचे भाव दहा हजार रुपयांपर्यंत गेले होते, परंतु मध्यंतरी हे बाजार भाव काही दिवस नऊ हजार ते दहा हजार दरम्यान होते. त्यानंतर हे CottonMarket Rates बाजार भाव आठ हजार रुपये पर्यंत आले आणि आता चक्क बाजारभाव सात हजार ते सात हजार पाचशे रुपये या दरम्यान आहे.
कापसाला पांढरे सोने म्हटले जाते, परंतु या पांढऱ्या सोन्याने यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चक्क रडवले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणीचा डोंगर निर्माण झालेला आहे. कापसाचे दर मोठ्या प्रमाणात Cotton Rate Down घसरले आहे. परंतु आता शेतकरी कापूस घरात साठवून ठेवून कंटाळले असून शेवटी अतिशय कमी दराने कापसाची विक्री करत आहे.
शेतकऱ्यांकडून नाईलाजाने कापसाची विक्री:
शेतकरी बंधूंनो आता लवकरच अवघ्या काही दिवसात खरीप हंगाम 2023 सुरू होणार असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी तसेच मशागतीसाठी त्याचबरोबर शेतीच्या विविध कामांसाठी पैशाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. आतापर्यंत आणि शेतकऱ्यांनी Kapus Bajarbhav वाढतील यापेक्षाही कापूस विकला नव्हता परंतु आता शेतकऱ्यांवर खरीप हंगाम जवळ आल्यामुळे कापूस विकण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे नाईलाजाने सर्व शेतकरी Kapus अतिशय कमी दरात विकत आहे.
एवढा कमी घरामध्ये शेतकऱ्यांनी कापूस विकल्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात एक रुपयाही शिल्लक राहणार नसून कापसाच्या पिकावर केलेल्या खर्च सुद्धा निघण्याची शक्यता कमी आहे. आता अवघ्या पंधरा दिवसात नवीन खरीप हंगाम सुरू होणार असून शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.
क्विंटल मागे 5 हजाराचे नुकसान:
शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये कापसाला जास्तीत जास्त 13 हजार रुपये पर्यंतचा दर मिळत होता त्यामुळे आजच्या कापसाच्या बाजार भावाचा गेल्या वर्षीच्या बाजारभावाची तुलना केल्यास शेतकऱ्यांना क्विंटल मागे पाच हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. एका क्विंटल मध्ये पाच हजार रुपये शेतकऱ्यांना कमी मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा तर गेलाच परंतु केलेला खर्च सुद्धा या पैशातून निघणार नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर निराशेची वेळ आलेली आहे.