Gharkul Yojana FTO Check: या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुल योजनेचे पैसे जमा, तुम्हाला मिळाले का? लगेच चेक करा

मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुल योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जे लाभार्थी पात्र ठरलेले आहेत अशा पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना राज्य शासन तसेच केंद्र शासन यांच्या वरील रक्कम खात्यात जमा करत आहे. त्यामुळे आपल्या खात्यात घरकुल योजनेचे पैसे आले का, आले नसतील तर घरकुल योजनेचा हप्ता आपल्याला केव्हा मिळेल हे चेक करण्याची प्रक्रिया Gharkul Yojana Money Check या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

 

घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वितरण सुरू:

यावर्षी नवीन घरकुल मंजूर झालेले होते अशा लाभार्थ्यांनी घराची pm awas yojna अंतर्गत बांधकाम सुरू केल्यानंतर आता त्यांच्या खात्यातून घरकुल योजनेअंतर्गत पहिला दुसरा व तिसरा हप्ता वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत आपल्याला घरकुल योजनेचे किती हप्ते मिळाले, पुढील हप्ता केव्हा मिळणार, या Gharkul Yojana संदर्भात माहिती आता आपल्याला ऑनलाइन पाहता येत आहे. तर चला जाणून घेऊया घरकुल योजनेच्या पैश्या संदर्भात माहिती.

 

 

असे चेक करा घरकुल योजनेचे पैसे:

जर तुम्हाला सुद्धा तुमच्या खात्यात घरकुल योजनेचे पैसे आलेले आहे का हे चेक करायचे असेल तर त्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. Fto म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट झाल्यानंतर लाभार्थ्यांना Gharkul Yojana Installment मिळत असतात.

 

1. सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे अधिकृत वेबसाईटवर जा.

2. आता awasoft नावाचा एक ऑप्शन दिसेल त्यावर जा.

3. आता report नावाच्या पर्यावर जा.

4. आता तुम्हाला fto transaction summary या पर्यावर क्लिक करायचा आहे.

5. आता तुमच्यासमोर एक नवीन ऑप्शन आहे त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडा.

6. त्यानंतर चालू आर्थिक वर्ष निवडा तसेच आपला महाराष्ट्र राज्य निवडा.

7. आता तुमचा जिल्हा तसेच तुमचा तालुका आणि तुम्हाला ज्या गावातील माहिती पाहिजे ते गाव या ठिकाणी निवडा.

8. आता या ठिकाणी पूर्ण जनरेट झालेले fto हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला जी गणिते क्रिया दिलेली आहे त्याचे उत्तर त्याखालील रकान्यात सबमिट करा.

9. आता तुम्हाला तुमचा समोर चालू आर्थिक वर्षात जनरेट झालेले संपूर्ण fto दिसत असेल.

10. आता एखाद्या fto वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो fto ओपन झाल्या नंतर तो कोणत्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याच्या खात्यात पैसे जमा झाले का ? कोणत्या तारखेला जमा झाले. याची संपूर्ण माहिती दिसते.

11. त्याचप्रमाणे जर एखाद्या fto किती तारखेपर्यंत जमा होऊ शकतो याची सुद्धा अंदाज आपल्याला काढता येते पुढील घरकुल हप्ता कोणत्या तारखेला मिळणार याची सुद्धा माहिती तिथे मिळते.

 

घरकुल योजनेचे पैसे जमा झाले का चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

घरकुल योजना यादी 2023 जाहीर; अशी करा डाऊनलोड

 

अशाप्रकारे आपण अगदी सहज पद्धतीने घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली का ती झाली असेल तर कोणत्या तारखेला झाली किती हप्तापर्यंत मिळालेले आहे तसेच पुढील हप्ता केव्हा मिळणार याची माहिती मिळवू शकतात.

घरकुल योजना यादी 2023 जाहीर; अशी करा डाऊनलोड | Gharkul Yadi 2023 Maharashtra