बँक खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या खात्यात असणाऱ्या पैशांवर कोणाचा हक्क असतो? जाणून घ्या कायद्यानुसार कोणाला मिळणार पैसे | Bank Balance

मित्रांनो आपल्या मनात अनेक वेळा प्रश्न निर्माण झालेला असेल किंवा तुम्ही हा विषय चर्चेमध्ये ऐकला असेल की जर एखाद्या बँक खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या खात्यामध्ये असणारे पैसे कायद्याच्या दृष्टीने कोणाला मिळाला पाहिजे. खातेधारकाच्या बँक खात्यातील पैसे मिळवण्यासाठी कोणता व्यक्ती पात्र असेल तो त्याच्या कुटुंबातील असेल का? जर त्याला कोणी वारस नसेल तर त्याचे चुलत नातेवाईक किती पैसे काढू शकतात का असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतात. त्यामुळे आपण आजच्या लेखात बँक खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर ते पैसे कोणत्या व्यक्तीला मिळतात त्याकरिता प्रक्रिया काय आहे या Bank Balance संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

या वेबसाईटच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेती संदर्भातील बातम्या तसेच महत्त्वाच्या टॉपिक वर चर्चा करत असतो त्याचबरोबर विविध योजनांचे सुद्धा माहिती वेळोवेळी जाणून घेत असतो आजच्या या पोस्टमध्ये आपण एका वेगळ्या व महत्त्वाच्या असणाऱ्या टॉपिक बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो आजकाल प्रत्येकाचे बँक खाते आहे अगदी गरीब घरातील व्यक्तीपासून ते श्रीमंत घरातील व्यक्तीपर्यंत तसेच लहान मुलांपासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाचे बँकेत खाते आहे. आजकाल शासनाच्या माध्यमातून देखील सर्व प्रकारच्या योजनांचे अनुदान तसेच शासनाच्या माध्यमातून मिळणारे पैसे हे केवळ बँक खात्यातच मिळते त्यामुळे जवळपास सर्वच जणांचे बँक खाते आहे. बँक खाते हे शून्य रुपयात उघडून मिळत असल्यामुळे अनेकांनी बँक खाते काढलेले आहे, परंतु कालांतराने लोकांना बँकेमध्ये पैसे टाकण्याची सवय झालेली असल्यामुळे अनेकांच्या बँक खात्यामध्ये लाखो रुपयांची व्यवहार असतात.

 

परंतु जर एखाद्याच्या बँक खात्यामध्ये लाखो रुपये असतील आणि तो व्यक्ती जर मृत झाला तर अशा वेळेस त्याच्या बँक खात्यातील पैसे कोणता व्यक्ती काढू शकतो. नियमाप्रमाणे कोणत्या व्यक्तीला ते पैसे मिळाला पाहिजे, आपण आपल्या आयुष्यामध्ये केलेली कष्टाची कमाई बँकेमध्ये टाकत असतो त्यामुळे बँकेतील पैसे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

 

बँकेच्या नियमाप्रमाणे या व्यक्तीला मिळते खातेदाराचा मृत्यू झाल्यास पैसे:

मित्रांनो आपल्या देशात भारतीय Reserve Bank आहे जी बँकांची बँक म्हणून ओळखण्यात येते सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य भारतीय रिझर्व बँकेच्या माध्यमातून करण्यात येते. भारतीय रिझर्व बँकेचे असे अनेक महत्त्वाचे नियम आहेत, जे प्रत्येक बँकांना आणि तिच्या ग्राहकांना पाळावे लागते. त्यामुळे बँक आपल्याला नवीन खाते उघडताना किंवा जुने खाते असले तरीसुद्धा नॉमिनेशन करून घेते म्हणजेच आपल्या अकाउंटला एक व्यक्ती नॉमिनी म्हणून ऍड करते. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण आपल्या सातबारावर वारसाची नोंद करतो तसेच आपल्या बँक खात्यावर नॉमिनी ची नोंद करतो.

 

नॉमिनी ची नोंद करत असताना त्या ठिकाणी आपल्याला जर आपला मृत्यू झाल्यानंतर नॉमिनी ला किती रुपये मिळेल किती टक्के हिस्सा नॉमिनीला मिळेल याची सुद्धा माहिती त्यामध्ये असते. मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला शंभर टक्के मिळतील अशी तरतूद केली तर तुम्ही ज्या व्यक्तीला तुमच्या खात्यामध्ये नोंदणी मधून ऍड केलेले आहे त्या व्यक्तीला तुमच्या खात्यातील शंभर टक्के रक्कम तुमच्या मृत्यूनंतर मिळते.

 

महत्वाची माहिती नक्की वाचा :Property Rights: पतीच्या संपत्तीवर पत्नीचा किती अधिकार असतो? संपत्तीत पत्नी ला अधिकार मिळतो का? कसा व केव्हा?

 

जर बँक खात्यात नॉमिनी ऍड नसेल तर पैसे कोणाला मिळतात?

मित्रांनो जर एखाद्या खातेधारकांनी त्याच्या बँक खात्यामध्ये कोणतेच व्यक्तीला नॉमिनी म्हणून ऍड केलेले नसेल तर त्याच्या कायदेशीर वारसाला हे पैसे मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने जर एखाद्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात त्याची पत्नी किंवा त्याची मुले हे त्याचे कायदेशीर वारस असतात.

 

महत्वाची माहिती नक्की वाचा :Property Rights: पतीच्या संपत्तीवर पत्नीचा किती अधिकार असतो? संपत्तीत पत्नी ला अधिकार मिळतो का? कसा व केव्हा?

 

अशा परिस्थितीत तुम्हाला त्या संबंधित व्यक्तीचा मृत्यू दाखला घ्यावा लागेल तसेच तुम्ही त्याचे वारस असल्याचे प्रमाणपत्र घेऊन तसेच शंभर रुपयांचा किंवा पाचशे रुपयांचा बॉण्ड हे सर्व कागदपत्रे तयार करून तुम्हाला बँकेतून हे पैसे काढता येतील.