पेरणीपूर्वी या शेतकऱ्यांना एका एकरासाठी 10 हजार अनुदान, जाणून घ्या काय म्हणाले कृषी मंत्री अब्दुल सत्तार | Perni Anudan

शेतकरी बांधवांना यावर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका एकरासाठी दहा हजार रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडून शासन दरबारी पाठवण्यात आलेला होता. शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या दहा हजार अनुदानाच्या प्रस्तावा बाबत शासन देखील सकारात्मक असून त्या Perni Anudan बाबत महत्त्वाची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे.

 

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चिंचणी येथील शेतकरी मेळाव्यामध्ये त्यांनी या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहे. यावेळी कृषिमंत्री म्हणाले की राज्यात सध्या बळीराजाचे सरकार असून शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व त्या बाबी आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ. त्याचप्रमाणे यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. या Perni Anudan Yojana साठी सरकार कटीबद्ध असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल.

 

 

शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार अनुदान देणारी योजना नेमकी काय आहे? याची माहिती येथे क्लिक करून पहा

 

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची कामे केलेली असून त्यापैकी महत्त्वाचे कार्य म्हणजे शेतकऱ्यांना आता पिक विमा साठी केवळ एक रुपया लागेल म्हणजेच शेतकऱ्यांच्या वतीने भरण्यात येणारी पिक विम्याची रक्कम आता शासन स्वतः भरणार असून शेतकरी केवळ स्वतःचा एक रुपया भरून पिक विमा काढू शकतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेच्या धर्तीवर वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहे. अशी देखील महत्त्वाची माहिती अब्दुल सत्तार यांनी सांगितलेली आहे.

 

कोणत्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार रुपये मिळणार व केव्हा मिळणार याची माहिती येथे पहा

 

 

याव्यतिरिक्त ही अनेक प्रकारच्या मदती शेतकऱ्यांना करण्यात येत असून शासनाकडे शेतकऱ्यांना पेरणीसाठी दहा हजार अनुदान देण्याचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे त्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे.