कांदा चाळीच्या अनुदानात वाढ, आता कांदा चाळ योजने अंतर्गत 1 लाख 60 हजार रु अनुदान, असा करा अर्ज | Kanda Chal Anudan Yojana

मित्रांनो कांदा हे एक नाशिवंत पीक असते या कांदा पिकाला आपल्याला दीर्घकाळ टिकवायचे असल्यास त्याला योग्य पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी कांदा चाळीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते. आतापर्यंत राज्यात असणाऱ्या कांदा चाळ अनुदान योजनेअंतर्गत देण्यात येणारी Kanda Chal Anudan हे अतिशय कमी होते त्यामुळे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करत नव्हते किंवा अर्ज केला तर शेतकऱ्या कमी अनुदान असल्यामुळे शेतकरी कांदा चाळीशी उभारणी करत नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा हे पीक परवडत नसे.

 

त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाच्या मार्फत कांदा चाळी साठी तिने देणारे अनुदान वाढवून रोजगार हमी योजनेअंतर्गत आता कांदा चाळ अनुदान योजनेसाठी 1 लाख 60 हजार 367 रुपये इतकी अनुदान देण्यात येणार आहे. या संदर्भातील महत्त्वाची माहिती राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वरील Kanda Chal Anudan Yojana अंतर्गत कांदा चाळीसाठी अनुदान मिळवून गोदाम म्हणून कांदा चाळीचा वापर करता येणार आहे.

 

कांदा साठवणूक क्षमता वाढवणे गरजेचे:

मित्रांनो राज्यात असणारे कांदा साठवणीची क्षमता वाढवणे गरजेचे असून शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये कांदा पीक उत्पादन केल्यानंतर कांदा पिकाला मागणी असल्यामुळे लगेच शेतकरी कांदा पिकाची विक्री करतात. परंतु अनेक वेळा जर कांद्याला योग्य दर नसेल तर त्यावेळेस शेतकऱ्यांना कांदा पिकाची साठवणूक करावी लागते. परंतु अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे योग्य साठवणूक सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे योग्य पद्धतीने कांद्याची साठवणूक न केल्यास 45 ते 60 टक्के पर्यंत कांद्याचे नुकसान होते.

 

कांदा साठवणूक केल्यास योग्य दरात कांदा उपलब्ध होईल:

जर शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली तर कोणत्याही हंगामामध्ये कांद्याची मागणी वाढल्यानंतर कांद्याची योग्य प्रमाणात साठवणूक असल्यामुळे योग्य व माफक दरात सातत्याने कांदा उपलब्ध होऊ शकतो. कांदा हेच जिवंत पीक असते त्यामुळे त्याचे पाण्याचे उत्सर्जन आणि श्वसन चालू असते. जर कांदा चाळीच्या माध्यमातून कांदा साठवला गेला तर कांद्याच्या वजनात घट होणे कांदे खराब होणे इत्यादी कारणांपासून सुटका मिळेल.

 

कांदा चाळ अनुदानात वाढ Kanda Chal Anudan:

आता राज्यात मनरेगाच्या अंतर्गत Kanda Chal Anudan Yojana राबविण्यात येत असून या योजने करता लाभार्थ्यांना 1 लाख 60 हजार 367 रुपये अनुदान मिळेल, कांदा चाळ अनुदान योजनेसाठी एकूण खर्च 4 लाख 58 हजार 730 रुपये असून त्यापैकी एक लाख साठ हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळेल.

 

कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज कसा करायचा? How to Apply For Kanda Chal Yojana?

शेतकरी बांधवांना जर तुम्हाला कांदा चाळ योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्ही पूर्वीच्या योजना अंतर्गत अर्ज करू शकतात. नवीन योजना अंतर्गत 1 लाख 60 हजार अनुदान मिळण्यासाठी चे अर्ज सध्या सुरू झालेली नाही.

 

अर्ज कसा करायचा याची माहिती येते पहा

 

अशाप्रकारे राज्यात महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आता नवीन पद्धतीने नव्या स्वरूपात कांदा चाळ योजना राबवण्यात येत आहे.

Nuksan Bharpai: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, येत्या 10 दिवसात मिळेल सततचा पाऊस नुकसान भरपाई, मुख्यमंत्र्याचे आदेश