अवेळी पाऊस नुकसान भरपाई मदत वितरित, 21 जिल्ह्यासाठी 98 कोटी मंजूर हे शेतकरी पात्र | Aveli Paus Nuksan Bharpai

शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्यात एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट तसेच अवकाळी पाऊस झालेला होता. या अवकाळी पाऊस व गारपीट मुळे राज्यातील मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील अनेक पिके नष्ट झाली होती. त्यामुळे अशा वेळेस नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना Aveli Paus Nuksan Bharpai 2023 देण्याची मागणी वेळोवेळी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत होती.

 

एप्रिल महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाई वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस नुकसान भरपाई करण्याचे आदेश संबंधित प्रशासकीय यंत्रणेला दिले होते. त्यामुळे आता अखेर या Aveli Paus Nuksan ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण असा एक शासन निर्णय प्रकाशित करून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 98 कोटी रुपये वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

 

 

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई:

महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले 98 कोटी रुपये हे एप्रिल महिन्यात झालेल्या अवेळी पावसाच्या नुकसान भरपाई साठी आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या वेळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि ज्या शेतकऱ्यांची पंचनामे प्रक्रिया पूर्ण झालेली होती अशा पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना ही Aveli Paus Nuksan Bharpai ची रक्कम वाटप करण्यात येत आहे. 21 जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार 135 बाधित शेतकऱ्यांना हे 98 कोटी रुपये वाटप करण्यात येत आहे.

अवेळी पाऊस नुकसान भरपाई मदत वितरित, 21 जिल्ह्यासाठी 98 कोटी मंजूर हे शेतकरी पात्र | Aveli Paus Nuksan Bharpai

कोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार याची माहिती येथे पहा

 

98 कोटी वितरणाचा शासन निर्णय जारी:

एप्रिल महिन्यात झालेल्या अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईच्या वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 17 मे 2023 रोजी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय प्रकाशित केलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य शासनाने एप्रिल महिन्यात झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 98 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून वाटप करण्यास मान्यता दिली आहे.

 

शासन निर्णय पहा

Leave a Comment