Mofat Jamin Watap Yojana: या भूमिहीन व शेतमजुरांना जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान, असा करा अर्ज

मित्रांनो वेळोवेळी विविध राज्य सरकारे तसेच केंद्र सरकार देशातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविवते. शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे योजना केंद्र व राज्य सरकार राबवून ते परंतु ज्यांच्याकडे शेत जमीन नाही, जे शेतमजूर आहेत लोकांच्या शेतामध्ये मजुरी करतात, अशा समाजातील घटकाकडे उत्पन्नाचा स्त्रोत कमी असल्यामुळे यांना समाजाच्या घटकाबरोबर आणण्यासाठी राज्य शासनाने 100 टक्के अनुदानावर Mofat Jamin Watap Yojana सुरू केलेली आहे.

 

कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार 100 टक्के अनुदानावर जमीन?

राज्यातील शेतमजुरांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी तसेच स्वयंरोजगार व कमाईचा वेगळा स्त्रोत निर्माण व्हावा यासाठी राज्य शासनाने कर्मवीर Dadasaheb Gaykawad Sabalikaran Yojana सुरू केलेली आहे. योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील तरुणांना व शेत मजुरांना जमिनीचे मोफत वाटप करण्यात येत आहे.

 

योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर किती जमीन मिळते?

या Dadasaheb Gaykawad Sabalikaran Yojana अंतर्गत नवबौद्ध घटकातील भूमिहीन व्यक्तींना 4 एकर जिरायती जमीन किंवा 2 एकर बघायची जमीन 100 टक्के अनुदानवर मिळते. म्हणजे त्या जमिनीचे वाटप संबंधित लाभार्थ्यांना मोफत करण्यात येते.

आवश्यक पात्रता:

या Mofat Jamin Watap Yojana अंतर्गत तुम्हाला लाभ मिळण्यासाठी तुमच्याकडे खालील पात्रता असायला पाहिजे.

1. संबंधित अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा.

2. या योजनेच्या माध्यमातून परितक्‍त्या असणाऱ्या महिलांना तसेच विधवा महिलांना प्राधान्य मिळणार आहे.

3. संबंधित अर्जदार हा जमीन नसलेला म्हणजेच भूमिहीन असायला पाहिजे.

4. लाभार्थी व्यक्तींचे वय हे 18 ते 60 या दरम्यान असायला पाहिजे.

 

100 टक्के अनुदानावर शेत जमीन खरेदीचा शासन निर्णय येथे पहा

 

100 टक्के अनुदानावर शेत जमीन खरेदी करण्याचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

मोफत शेतजमीन खरेदी करण्याच्या योजने संदर्भात विस्तृत माहिती करिता तुम्ही वरील लिंक चा वापर करू शकतात. आतापर्यंत अनेक भूमिहीन शेतमजुरांनी या योजनेचा लाभ मिळालेला असून तुम्ही सुद्धा वरील घटकातील पात्र लाभार्थी असाल तर अर्ज करू शकतात.