Loan For Business: उद्योजक आणि व्यवसायिकांना कर्ज मिळविण्यासाठी नवीन अर्ज सुरू, या तारखे अगोदर सर्वांनी अर्ज करा

मित्रांनो राज्यातील अनुसूचित जातीतील नव उद्योजक आणि नवीन व्यवसायिकांना आपला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच त्याकरिता आवश्यक असणारे बीज भांडवल आणि अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्याची आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यातील अनुसूचित जातीतील नव उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते. त्याकरिता आता नवीन अर्ज सुरू झालेल्या असून त्या Loan For Business संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया.

 

कर्ज योजनेचा लाभ कोणाला मिळेल?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राज्यात अनुसूचित जाती या प्रवर्गातील तसेच त्या प्रवर्गातील 12 पोटजातीतील नवोद्योजकांना कर्ज देण्यात येत असते. त्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग बीज भांडवल योजना आणि कर्ज अनुदान योजना चे अर्ज स्वीकारते.

 

कोणत्या योजने अंतर्गत कर्जासाठी अर्ज करायचा?

अनुसूचित जाती या प्रवर्गातील नवोद्योजकांनी महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान योजनेअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज मिळण्यासाठी अर्ज करायचा आहे. त्या Loan For Business Scheme अर्ज करण्याची महत्त्वाची आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकांनी केलेले आहे.

 

कोणत्या प्रवर्गांना लाभ मिळेल?

मित्रांनो या कर्ज योजना अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील मांग/ मातंग/मिनी, मदारी/राधेमांग/मांग गारुडी/मादींग/दानखणी मांग/मांग महाशी/ मांग गारोडी/ मदारी/मादगी या बारा पोट जातीतील अर्जदारांना अर्ज करून लाभ मिळेल.

 

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळावे तसेच ते कर्ज मिळवून त्यांना त्यांचा नवीन व्यवसाय स्थापन करता यावा या दृष्टीने अनेक प्रकारचे महामंडळ आणि योजना सुरू केलेल्या आहेत. त्यापैकीच एक महत्वाची महामंडळाचे मार्फत राबविण्यात येणारी योजना आहे.

 

अर्ज कसा व कुठे करायचा?

योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या संबंधित अर्ज करू इच्छिणाऱ्यांना व उद्योजकांनी जिल्हा कार्यालय, मुंबई उपनगर शहर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर संपर्क करून त्यांचे अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

या व्यतिरिक्त तुम्हाला या योजनेच्या संदर्भात इतर कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयाला भेट देऊन अधिक माहिती विचारू शकतात.

 

अवेळी पाऊस नुकसान भरपाई मदत वितरित, 21 जिल्ह्यासाठी 98 कोटी मंजूर हे शेतकरी पात्र संपूर्ण माहिती पहा

 

अर्ज करण्यासाठी अटी शर्ती व पात्रता:

1. अर्जदार हा वरील 12 पोट जाती पैकीच असावा.

2. अर्जदाराची वयोमर्यादा ही 18 ते 50 वर्षे दरम्यान आहे.

3. संबंधित अर्जदाराने यापूर्वी असा कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

4. वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांच्या कमी असावे.

5. अर्जदाराला ज्या व्यवसायासाठी कर्ज पाहिजे त्या व्यवसायाबद्दल त्याला ज्ञान असावे.

6. एका कुटुंबातून केवळ एकच व्यक्ती लाभ मिळवण्यास पात्र असेल.

 

अशाप्रकारे या कर्ज योजनेअंतर्गत काही अटी व शर्ती आणि पात्रता ठरवून देण्यात आलेल्या आहेत.

Mofat Jamin Watap Yojana: या भूमिहीन व शेतमजुरांना जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान, असा करा अर्ज