आजच्या या लेखा मध्ये आपण कांदा चाळ अनुदान योजना काय आहे? कांदा चाळ अनुदान योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती आणि पात्रता या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
कांदा चाळ योजना 2022 काय आहे? | kanda chal anudan yojana 2022 maharashtra |
कांदा चाळ योजना 2022 संपूर्ण माहिती (Kanda Chal Yojana 2022)
kanda chal anudan yojana कांदा हे पीक पिकविण्यामध्ये आपला भारत देश हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो. त्यामुळे आपल्या भारत देशात कांदा या पिकाचे उत्पन्न जास्त असल्यामुळे आपल्या भारत देशातून मोठ्या प्रमाणात कांदा या पिकाची निर्यात करण्यात येते. त्यामुळे आपल्या भारत देशाला मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. त्याच बरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा कांदा पीक हे एक महत्त्वाचे पीक आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यात कांदा हे पीक काही भागात जास्त प्रमाणात पिकविण्यात येते. परंतु कांदा पीक हे आपल्या कडे जास्त दिवस साठून आपण ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागते. कारण की कांदा हे नाशिवंत पीक आहे. त्यामुळे ते लवकर खराब होते. त्यामुळे या कांदा चाळ योजना (Kanda Chal Yojana) अंतर्गत या कांदा पिकांना सुरक्षित करता येणार आहे.
आणि याच कारणामुळे कांदा हे पीक दीर्घकाळ साठवून ठेवता आले पाहिजे, याच साठी शेतकरी त्यांचे कांदा पीक टिकविण्यासाठी कांदा चाळ चा वापर करत असतात. आणि याच उद्देशाने कांदा चाळ ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरु आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. या योजने अंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज करावा. असे आव्हान सुद्धा करण्यात येत आहे.
कांदा चाळ योजना अर्ज कसा करावा(how to apply for kanda chal yojana):-
आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना महा डी बी टी पोर्टल वर अर्ज हे मागविण्यात येत असतात. या maha dbt portal च्या माध्यमातून कांदा चाळ योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या कांदा चाळ या योजनेत 5,10,15,20,25 व 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. कांदा चाळी साठी अर्ज Maha Dbt Portal वर ऑनलाईन पध्धतीने करावा लागतो. महा डी बी टी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने कांदा चाळ (Kanda Chal) अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम महा डी बी टी फार्मर्स पोर्टल वर नोंदणी करावी लागते. त्यानंतर अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असल्यास तुमची माहिती टाकून अर्ज ऑनलाईन करू शकतात.
कांदा चाळ अटी व पात्रता:-
जर तुम्हाला maha dbt portal च्या अंतर्गत kanda chal yojana साठी अर्ज करायचा असल्यास, जो शेतकरी अर्ज करणार आहे,त्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा या पिकांची नोंद असणे आवश्यक आहे.
या कांदा चाळ या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 100 मेट्रिक टना पर्यंत कांदा चाळ बांधण्यासाठी लाभ हा देण्यात येत आहे. सहकारी संस्थांसाठी मर्यादा ही 500 मॅटिक टन आहे.
जर शेतकऱ्याकडे 1 हेक्टर पर्यंत क्षेत्र असेल तर ५ ते ५० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळसाठी लाभ मिळतो. जर क्षेत्र हे 1 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर ५० ते १०० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी लाभ हा शेतकऱ्यास maha dbt portal वर अर्ज करून मिळविता येतो.
Maha dbt portal अंतर्गत कांदा चाळ या योजने साठी अर्ज करण्यासाठी जो शेतकरी अर्ज करणार आहे त्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असावी लागते. तसेच त्याच्या जमिनीच्या सातबारा वर कांदा या पिकांची नोंद असणे आवश्यक आहे.
कांदा चाळ या योजने साठी अर्ज करतेवेळी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा सातबारा वर आठ – अ उतारा हा अपलोड करावा लागतो.
कांदा चाळ या योजने साठी महा डी बी टी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर तुमची लॉटरी पद्धतीने सोडत होत असते. ही पद्धत ऑनलाईन असणार आहे. जर तुमचे नाव आले तर तुम्हाला पुढील प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागते. संबंधित कागदपत्रे उपलोड करावी लागतात. kanda chal anudan yojana मध्ये तुमचा अर्ज पात्र झाल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या शेतामध्ये येऊन योजनेविषयी स्थळ पाहणी करून जातील.
हे नक्की वाचा:- पोक्रा योजना काय आहे? पूर्व संमती मिळणे सुरू
त्यानंतर तुमच्या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर जिओ टॅगिंग करण्यात येईल. तुम्ही काम पूर्ण केल्याचे पाहण्यात येईल. त्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम ही थेट ट्रान्स्फर करण्यात येणार आहेत.
अशा प्रकारे तुम्ही कांदा चाळ योजना साठी महा डी बी टी पोर्टल अंतर्गत अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला. आमच्या teligram channel ला सुद्धा जॉईन होऊ शकतात.