डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे? Swadhar Scholarship Yojana maharashtra 2022

 

स्वाधार योजना काय आहे:-

स्वाधार योजना ही जे विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक मध्ये मोडतात.(Swadhar Scholarship Yojana Maharashtra 2022) अश्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी अश्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून स्कॉलरशिप ही देण्यात येत असते. या swadhar योजने मध्ये लाभ मिळविण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांना जेवण, राहण्याची सोय व शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत म्हणून या स्वाधर योजने अंतर्गत अश्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात आधार संलग्न बँक खात्यात आवश्यक रक्कम वितरित करण्यात येत असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे? Swadhar Scholarship Yojana maharashtra 2022

 

स्वाधार योजने अंतर्गत स्कॉलरशिप किती मिळते:-

जे विद्यार्थी मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचव, नागपूर या ठिकाणी शिकतात. अशा विद्यार्थ्यांना भोजन भत्ता ३२,००० रुपये तसेच निवास भत्ता हा २०,०००, निर्वाह भत्ता ८००० रुपये असे मिळून एकूण वार्षिक अनुदान हे ६०,००० रुपये देण्यात येते.

महसूल विभागीय शहर व  ‘क’ वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
भोजन भत्ता हा २८,०००
निवास भत्ता हा १५,०००
निर्वाह भत्ता हा ८,०००
असे मिळून वार्षिक अनुदान ५१,०००

हे नक्की वाचा:- समाज कल्याण हॉस्टेल योजना काय आहे? अर्ज कसा करायचा

उर्वरित शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी
भोजन भत्ता हा २५,०००
निवास भत्ता हा १२,०००
निर्वाह भत्ता हा ६,०००
असे मिळून एकूण वार्षिक अनुदान हे ४३,०००

स्वाधार योजना पात्रता काय आहे:-

१)अर्ज करणारा विद्यार्थी हा सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
२)स्वाधार योजनेसाठी अर्ज करणारा विध्यार्थी हा अनुसूचित जाती(schedule cast) व नवबौध्द या घटकातील असावा.
३)swadhar या योजने अंतर्गत अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही शासकीय किंवा समाजकल्याण वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा.
४)swadhar yojana अंतर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने ज्या कोर्स च्या अंतर्गत वसतिगृहात प्रवेश मिळतो अशा कोर्स मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
५) swadhar yojana अंतर्गत स्कॉलरशिप मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास दहावी, बारावी, पदवी, पदविकामध्ये कमीत कमी 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
६)तसेच या योजने मध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के इतके आरक्षण हे आरक्षित ठेवण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी 40 टक्के इतके गुण असावे.
७) वडिलांचे उत्पन्न हे 2.50 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
८)महाविद्यालय मधून ७५% उपस्थिती प्रमाण पत्र जोडावे.

हे नक्की वाचा:- विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट योजना अर्ज सुरू

वरील सर्व पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या swadhar yojna अंतर्गत स्कॉलरशिप मिळवू शकतात. आणि अर्ज केल्या नंतर मेरिट लिस्ट प्रमाणे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज कसा करायचा (how to apply for swadhar yojana):-

ज्या विद्यार्थ्यांना swadhar yojana साठी अर्ज करायचा असेल त्यांनी या
http://sjsa.maharashtra.gov.in किंव्हा http://maharashtra.gov.in या संकेतस्थळवर अर्जाचा नमूना हा उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच या वेबसाईट वर कागदपत्रांची यादी, अटी व पात्रता या विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. सदर swadhar yojana चा अर्ज डाउनलोड करून सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण येथे सादर करावा लागेल.

हे सुध्दा वाचा:- barti मार्फत मोफत प्रशिक्षण व स्कॉलरशिप योजना असा करा अर्ज