आजच्या या लेखा मध्ये आपण फ्री टॅबलेट योजना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाज्योती संस्था नागपूर मार्फत ही free tablet yojana राबविण्यात येत आहे. महाज्योती म्हणजेच (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) होय. ही महाज्योती संस्था आपल्या महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्ग व बहुजन प्रवर्गासाठी कार्य करते. (महाज्योती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची ही स्वायत्त संस्था आहे.) Free Tablet Yojana Maharashtra application started
महाज्योती म्हणजेच (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) यांच्या कडून विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या कोर्स साठी नि:शुल्क ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण हे देण्यात येणार आहेत.
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra Registration |
कोर्स जसे MH-CET/IEL/NEET या आता येणाऱ्या परीक्षा ज्या परीक्षा आता 2023 मध्ये येणार आहे त्या परीक्षांच्या पूर्व तयारी करण्यासाठी नोंदणी ही महाज्योती(महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) कडून करून घेण्यात येत आहे.
महाज्योती(महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) फ्री टॅबलेट योजना साठी अर्ज कसा करायचा:-
जे विद्यार्थी इतर मागास प्रवर्ग (other backward class), वि.जा.भ.ज.(भटक्या जाती-जमाती) Vimukta Jati and Nomadic Tribes.(vjnt), वि.मा.प्र(विशेष मागास प्रवर्ग) SBC (Special Backward Classes) या प्रवर्ग मधून येतात, आणि या मधील नॉनक्रिमिलेअर ज्यांच्या कडे आहे अश्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज हे मागविण्यात येत आहेत.
ज्या इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी
या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना तसेच अर्ज संबंधीचा सर्व तपशील उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Free Tablet Yojana Maharashtra application process
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती). महाराष्ट्र राज्य, नागपूर तर्फे जे विद्यार्थी इतर मागास प्रवर्ग (other backward class), वि.जा.भ.ज.(भटक्या जाती-जमाती) Vimukta Jati and Nomadic Tribes.(vjnt), वि.मा.प्र(विशेष मागास प्रवर्ग) SBC (Special Backward Classes) या प्रवर्ग मधून येतात अशा विद्यार्थ्यांना jee, neet, cet या परीक्षांसाठी फ्री मध्ये मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे. आपल्या राज्यात अनेक विद्यार्थी असतात, जे हुशार असतात त्यांना 10th आणि 12th ला चांगले percentage असतात. आणि त्यांची इच्छा ही इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्रात काम करण्याची चांगली जॉब मिळविण्याची त्यांची इच्छा असते. परंतु त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने ते मेडिकल आणि इंजिनिअरिंग या सारख्या महागड्या कोर्स मध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. ते महागडे क्लासेस लावू शकत नाही त्यामुळेच महाज्योती(महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) मार्फत जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत, अशा दहावी पास विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहेत.
हे नक्की वाचा:- (barti)बार्टी मार्फत मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप असा करा अर्ज
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) टॅबलेट योजना पात्रता (Eligibility of Tablet Yojana Mahajyoti):-
ज्या विद्यार्थांना महाज्योती टॅबलेट योजना साठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे खालील पात्रता असावी लागते.
सर्व प्रथम तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावे लागते. त्याचबरोबर तुमची दहावी या वर्षी उत्तीर्ण /पास झालेली असावी लागते. आणि आता अकरावीसाठी science शाखेत प्रवेश घेतलेला असावा. म्हणजेच विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंग करत असल्यामुळे तो विज्ञान शाखेतून शिकलेला असावा लागतो. तसेच या वर्षी उत्तीर्ण झालेल्या दहावी च्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला जर विद्यार्थी शहरी भागात शिकला असेल तर त्या विद्यार्थ्याला दहावी मध्ये ७०% गुण पाहिजे, जर विद्यार्थी ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील किंवा नक्षलग्रस्त भागातील शिकलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना ६०% गुण असणे आवश्यक आहे. आणि अर्ज करणारा विद्यार्थी हा obc, sbc, vjnt या प्रवर्गातील असावा लागतो.
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) फ्री टॅबलेट योजना कागदपत्रे
(Documents of Free Tablet Yojana Maharashtra):-
10 th ची markshit
11th हे science या field मधून करत असल्या संबंधी म्हणजेच सायन्स मध्ये प्रवेश घेतल्यासंबंधी कागदपत्रं जसे की बोनाफाईड किंवा इतर डॉक्युमेंट.
जातीचे प्रमाणपत्र(cast certificate)
नॉन क्रिमी लेअर
महाज्योती योजने अंतर्गत मिळणारा लाभ:-
जे विद्यार्थी महाज्योती फ्री टॅबलेट योजना साठी पात्र ठरतील त्या विद्यार्थ्यांना JEE, NEET, CET इत्यादी या परीक्षांसाठी मोफत पने ऑनलाईन प्रशिक्षण हे देण्यात येणार आहेत. आणि या पात्र विद्यार्थांना
या बरोबरच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुस्तके, टॅबलेट आणि प्रतेक विद्यार्थ्याला प्रत्येक दिवसाला 6 gb इतक net free मध्ये देण्यात येणार आहेत.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा.