ग्रामपंचायत निवडणूक गावात उभे असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती अशी पहा ऑनलाईन | Gram Panchayat Nivadanuk Maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामपंचायत च्या निवडणुका होत आहेत. बऱ्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत बऱ्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत उमेदवारांनी त्यांचे अर्ज सादर केलेले आहेत. आपल्या गावात सुद्धा ग्रामपंचायतची निवडणूक होत असेल किंवा निवडणूक प्रक्रिया सुरू असेल तर आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांची संपूर्ण माहिती आपण चेक करू शकतो. ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat Nivadanuk Maharashtra) अर्ज करताना आपल्याला आपली संपूर्ण माहिती जशी संपत्ती व इतर प्रकारचे अनेक माहिती सादर करावी लागते. ही उमेदवाराची माहिती आपल्याला चेक करण्याची सुविधा उपलब्ध आहेत. तर चला जाणून घेऊया ग्रामपंचायत निवडणूक मध्ये आपल्या गावात उभे असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती जाणून घेण्याची प्रक्रिया.

ग्रामपंचायत निवडणूक गावात उभे असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती अशी पहा ऑनलाईन | Gram Panchayat Nivadanuk Maharashtra
ग्रामपंचायत निवडणूक गावात उभे असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती अशी पहा ऑनलाईन | Gram Panchayat Nivadanuk Maharashtra

 

मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये उभे राहण्याकरिता उमेदवाराला affidavit सादर करावे लागत असते. त्यामध्ये तो उमेदवार त्याची संपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करत असतो. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराची माहिती जाणून घेण्याची सुविधा आपल्याला राज्य निवडणूक आयोगाने(Gram Panchayat Election Maharashtra) उपलब्ध करून दिलेली आहे. gram panchayat election maharashtra

ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांची कोणती माहिती आपण जाणून घेऊ शकतो?

ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उभ्या असलेल्या उमेदवारांची ही माहिती तुम्हाला जाणून घेता येते. Gram Panchayat Election Maharashtra

मित्रांनो आपण आपल्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीत(gram panchayat election) उभे असलेल्या उमेदवारांच्या माहितीमध्ये त्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच तो उमेदवार कोणता व्यवसाय किंवा कोणता काम धंदा करतो तसेच त्याच्याकडे असलेली मालमत्ता त्यांचा तपशील व त्याचे मत्ता व दायित्व तसेच त्याच्याकडे असलेली एकूण स्थावर मालमत्ता यांचा तपशील. ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांची शासकीय तसेच निमशासकीय किंवा विविध संस्थांमधील दायित्व किंवा थकीत यांचा तपशील अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारांची जाणून घेऊ शकतो.

महत्त्वाचं अपडेट:- आता आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार! असा पहा ग्रामपंचायत निवडणूक निकाल ऑनलाईन

ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांची माहिती अशी पहा?

तुमच्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये(gram panchayat election) उभे असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.gram panchayat maharashtra online

1. सर्वप्रथम राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट
2. आता या वेबसाईटवर तुम्हाला “Affidavit by the final contesting candidates” हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
3. आता तुमच्या गावातील सर्व ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये उभे असणाऱ्या उमेदवारांची माहिती जाणून घेण्याकरिता सर्वप्रथम लोकल बॉडी या पर्यायात ग्रामपंचायत हा ऑप्शन निवडून घ्या.
4. आता तुमच्यासमोर डिव्हिजन हा एक ऑप्शन आहे त्यामध्ये तुमचा विभाग निवडून घ्या. जसे की अमरावती, औरंगाबाद याप्रकारे
5. आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तो डिस्ट्रिक्ट ऑप्शन मध्ये निवडून घ्या. तुम्हाला ज्या जिल्ह्यातील गावातील उमेदवारांची माहिती जाणून घ्यायची तो जिल्हा निवडा.
6. त्यानंतर तुमचा तालुका निवडा व विलेज ऑप्शन मध्ये ज्या गावातील उमेदवारांची माहिती जाणून घ्यायची ते गाव निवडा.
7. आता इलेक्शन प्रोग्राम नेहमी ऑप्शन मध्ये निवडणूक कार्यक्रमाचे नाव सिलेक्ट करा.
8. त्यानंतर वार्ड मध्ये ज्या वॉर्ड मधील उमेदवाराची माहिती जाणून घ्यायची ते वॉर्ड या ठिकाणी निवडून घ्या.
9. आता खाली असलेल्या सर्च या ऑप्शन वर क्लिक करा.
10. आता तुमच्यासमोर तुमच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उभे असलेल्या उमेदवारांचे नाव आणि त्यांचा नोंदणी क्रमांक तुम्हाला दिसत असेल.
11. आता तुम्हाला त्यांची संपूर्ण माहिती डाऊनलोड करण्याकरिता म्हणजे जाणून घेण्याकरिता View Affidavit ऑप्शन वर क्लिक करायचे आहे आणि त्यांचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करायचे आहे.
12. जर आपल्याला त्या उमेदवारांच्या समोर “NA” हा ऑप्शन दिसत असेल तर त्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झालेला आहे असे समजावे.
13. आता आपल्यासमोर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती आपल्यासमोर आलेली असेल.

हे नक्की वाचा: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पगार वाढ झाली. आता चक्क एवढा पगार मिळणार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना!

अशाप्रकारे आपण आपल्या आपल्या गावात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे असलेल्या सर्व उमेदवारांची महत्त्वपूर्ण अशी विविध माहिती ऑनलाईन पद्धतीने जाणून घेऊ शकतो. ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. सर्वांच्या उपयोगाची महत्त्वपूर्ण अशी ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.