नाविन्यपूर्ण योजना नवीन अर्ज सुरू; गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन योजना | Navinya Purna Yojna Maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पशुपालन करावे, व पशुपालनाच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नाचा एक वेगळा स्त्रोत निर्माण करावा. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असते. या Navinya Purna Yojna  Maharashtra अंतर्गत पात्र व्यक्तींना गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन योजना करिता यांचे गट वाटप करण्यात येत असते तसेच याकरिता अनुदान वितरित करण्यात येत असते. नाविन्यपूर्ण योजना 2022-23 करिता नवीन अर्ज सुरू झालेल्या असून नाविन्यपूर्ण योजना संदर्भात संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया.

नाविन्यपूर्ण योजना नवीन अर्ज सुरू; गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन योजना | Navinya Purna Yojna Maharashtra
नाविन्यपूर्ण योजना नवीन अर्ज सुरू; गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन योजना | Navinya Purna Yojna Maharashtra

 

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांकरिता त्यांना शेळी, मेंढी तसेच गाय व म्हैस व कुक्कुटपालन यांचे गट वाटप करणारी नाविन्यपूर्ण योजना(Navinya Purna Yojna) ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना असून या योजनेअंतर्गत नवीन अर्ज मागविणे सुरू झालेले आहे. नाविन्यपूर्ण योजना 2022-23 महाराष्ट्र अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत करावयाचा अर्ज आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे त्याचबरोबर या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज करण्याची तारखा या संदर्भात विस्तृत माहिती सुद्धा खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

नाविन्यपूर्ण योजनेचे स्वरूप:

मित्रांनो नावीन्यपूर्ण योजना महाराष्ट्र (Navinya Purna Yojana  Maharashtra)अंतर्गत खालील जनावरे तसेच पशूंचे गट वाटप करण्यात येत आहे.

1. शेळी मेंढीचा गट वाटप करणे यामध्ये दहा शेळ्या व एक बोकड तसेच दहा मेंढ्या व एक मेंढा यांचा समावेश आहे.
2. दुधाळ गाई म्हशींचे वाटप करणे
3. कुक्कुटपालनामध्ये 1000 मांसल कुकुट पक्षी यांचे वाटप करणे.
4. तलंगाच्या 25 माद्या आणि 3 नर वाटप करणे.

अशा प्रकारच्या अनेक योजना या Navinya Purn Yojana महाराष्ट्र अंतर्गत राबविण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नाविन्यपूर्ण योजना संदर्भात महत्त्वाच्या तारखा Navinyapurn Yojana

1. नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 11 जानेवारी 2023 आहे.
2. 25 डिसेंबर पर्यंत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल तसेच डेटाचे बॅकअप घेण्यात येईल.
3. नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल त्यांना कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याकरिता 26 डिसेंबर २०२२ ते 9 जानेवारी 2023 पर्यंत वेळ देण्यात येईल.
4. आता ज्याला भारताने या नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत त्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केलेली आहे ती कागदपत्रे चेक करण्यात येईल त्यांची पडताळणी करण्यात येईल.
5. त्यानंतर 22 जानेवारी 2023 च्या नंतर जिल्हा भरती कागदपत्रांची पडताळणी करून पात्र ठरतील त्यांना लाभ वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

अशाप्रकारे या नावीन्यपूर्ण योजना 2022-23 महाराष्ट्र(Navinya Purna Yojana 2022-23 Maharashtra) अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

 

हे नक्की वाचा: शेळी व मेंढी तसेच कूकुट पालन करीत 50 लाख रुपये अनुदान अर्ज सुरू 

नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्र अंतर्गत अनुदान किती मिळते? Navinya Purna Yojna Maharashtra Anudan

मित्रांनो नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत तुम्हाला कॅटेगिरी नुसार अनुदान मिळणार असून ते खालील प्रमाणे मिळणार आहे. Navinya Purna Yojna अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार हा अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्यास त्याला 75 टक्के अनुदान मिळते. नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार हा ओपन प्रवर्गातील असल्यास त्याला पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे.

अशाप्रकारे या महत्त्वाच्या योजनेअंतर्गत शेळी व मेंढी, गाय, म्हैस व कुक्कुटपालन याकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे.

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत अर्ज कुठे व कसा करायचा?

मित्रांनो नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. नाविन्यपूर्ण योजना(navinya purn yojana)  अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शेळी व मेंढी, गाय, म्हैस व कुक्कुटपालन याकरिता अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून हा अर्ज तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन वरून सुद्धा घरबसल्या सादर करू शकतात. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता खालील प्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

1. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम ah.mahabms या वेबसाईटवर जा किंवा यांचा मोबाईल ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा.
2. अर्ज करण्याच्या वेबसाईटवर जाण्याची लिंक
3. आता या ठिकाणी या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या अर्ज करण्याकरिता नोंदणी करा.
4. योजने संदर्भात करायचा ऑनलाईन अर्ज भरून घ्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.

मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणाऱ्या गाई, म्हशी, शेळी व मेंढी तसेच कुकुट पालन करिता या नाविन्यपूर्ण योजना(navinya Purn Yojana) अंतर्गत अर्ज करायचा आहे.

हे नक्की वाचा: कृषी यांत्रिकीकरण योजना अर्ज सुरू 

या योजने संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या योजना विषयी माहिती करता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहा.