भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नवीन अर्ज सुरू | Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2022

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना फळबागाची लागवड करण्याकरिता अनुदान देणारी योजना सुरू करण्यात आलेली आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असते. या योजनेमध्ये बरेच लाभार्थी पात्र होऊ शकत नाहीत त्यामुळे अशा शेतकऱ्यांकरिता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना(Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2022) ही राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत सन 2022-23 करिता फळबाग लागवड अनुदान योजनेचे नवीन अर्ज मागविण्यात येत आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नवीन अर्ज सुरू | Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2022
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नवीन अर्ज सुरू | Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2022

 

आपल्या महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी रोजगार हमी फळबाग लागवड योजना बरोबरच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाही सुरू होती परंतु मागील तीन वर्षांपासून ही योजना बंद करण्यात आलेली होती. परंतु आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना(Bhausaheb Fundkar Falbag lagvad Yojana Maharashtra)सुरू करण्यात आलेली आहे. मागील तीन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे ही योजना राज्यात राबविणे शक्य झाले नाही. त्यामुळे ही योजना बंद होती परंतु आता या योजनेअंतर्गत नवीन अर्ज मागविणे सुरू झाले आहे. Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2022

आपल्या महाराष्ट्र राज्यात सन 1990 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना सुरू आहे परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांकडे रोजगार हमी योजनेचा लाभ मिळविण्याकरिता आवश्यक असलेले जॉब कार्ड नाही. त्यामुळे असे लाभार्थी फळबाग लागवड योजनेचा लाभ मनरेगा अंतर्गत मिळू शकत नव्हते त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही जॉब कार्ड नसणाऱ्या शेतकऱ्यांकरिता सुद्धा अनुदान उपलब्ध करून देत आहे. Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2022

Bhausaheb Fundkar Falbag lagvad Yojana 2022 Maharashtra ही पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली असून महाराष्ट्र शासनाने या योजनेला मंजुरी दिलेली आहे. त्याचप्रमाणे या योजनेच्या अंमलबजावणी करता शासनाच्या वतीने निधीची तरतूद देखील केलेली आहे. ही Bhausaheb Fundkar Falbag lagvad Yojana  राज्यात सन 2018-19 पासून सुरू करण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या फळबागांचे लागवड करण्याकरिता अनुदान देण्यात येत असते. आपल्या महाराष्ट्र राज्यातील फळबाग लागवडीचे प्रमाण वाढावे व शेतकरी बागायतदार व्हावा या उद्देशाने ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 16 प्रकारच्या विविध फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला असून या पिकांच्या लागवडीकरिता आपल्याला अनुदान वितरित करण्यात येत असते. Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2022

फळबाग लागवड योजनेच्या अटी व शर्ती :-

मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना(Bhausaheb Fundkar Falbag lagvad Yojana) अंतर्गत लाभ मिळवायचे असल्यास खालील अटी व शर्तींची पूर्तता करायला हवी. अटी व शर्ती खाली दिलेल्या आहेत.

1. या योजनेअंतर्गत जमीन मर्यादा ठेवण्यात आलेली असून कोकण विभागामध्ये किमान दहा गुंठे ते जास्तीत जास्त दहा हेक्टर अशी मर्यादा आहे.
2. उर्वरित इतर विभागांमध्ये जमीन मर्यादा आहे कमीत कमी वीस गुंठ्यांपासून सहा हेक्टर पर्यंत ठेवण्यात आलेली आहे.
3. या योजनेअंतर्गत आपण एकापेक्षा जास्त फळ पिके लावू शकतो.
4. ज्याला भारत त्यांनी मनरेगाच्या फळबाग लागवड योजना अंतर्गत लाभ मिळवलेला आहे, अशांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार नाही.

वरील प्रमाणे अटी व शर्ती प्रमाणे आपण पात्र असाल तर या योजनेअंतर्गत लाभ मिळवू शकतो.

महत्वाचं अपडेट: आता प्रत्येकाला मिळणार घरकुल! नवीन योजना सुरू 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अर्ज प्रक्रिया Bhausaheb Phundkar Falbag Lagwad Yojana Application Process

शेतकरी मित्रांनो या फळबाग लागवड(Falbag Lagwad Yojana Maharashtra) योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

1. या फळबाग लागवड योजना अंतर्गत अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जाऊन महाडीबीटी असं सर्च करायचं आहे.
2. आता आपल्यासमोर महाडीबीटी शेतकरी योजनांची एक वेबसाईट आलेली असेल त्यावर क्लिक करायचं आहे.
3. महाडीबीटी पोर्टल वर जाण्याची वेबसाईट आम्ही खाली तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहेत.
4. आता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही जर अजून पर्यंत नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी करून घ्या.
5. त्यानंतर लॉगिन करा आता तुम्हाला या वेबसाईटच्या होम पेजवर अर्ज करा हा ऑप्शन दिसेल त्यामध्ये फळबाग लागवड हा पर्याय तुम्हाला शोधून त्यावर क्लिक करायचं आहे.
6. आता ही योजना तुमच्यासमोर असेल त्यावर क्लिक करून या योजनेचा संबंधित अर्ज भरून तो ऑनलाइन सबमिट करा.
7. महाडीबीटी फार्मर्स पोर्टलवर योजनेचा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस प्राप्त होईल.

हे नक्की वाचा: रब्बी पिक विमा 2022 मंजूर! आत्ताच नाव चेक करा 

या योजने अंतर्गत लाभ वितरण प्रक्रिया

या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना(Bhausaheb Fundkar Falbag lagvad Yojana 2022 Maharashta) अंतर्गत ठरवून दिलेल्या लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी काढण्यात येत असते. त्या लॉटरीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड होईल त्यांना या योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यात येईल. त्यांना एक पूर्व संमती पत्र महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त होईल नंतर त्यांनी फळबाग लागवड करून संबंधित कागदपत्रे पोर्टलवर वर सबमिट करायची. त्यानंतर मोका तपासणी करण्यात येईल व लाभार्थ्यांना अनुदान वितरण करण्यात येईल.