मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक प्रकारच्या शेतकरी योजना राबविण्यात येत असतात. अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण अशी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या जमिनीला तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला भटक्या जनावरांपासून तसेच जंगली प्राण्यांपासून संरक्षण करता यावे, याकरिता शेतकऱ्यांना त्याच्या शेताला तार कुंपण करण्याकरिता अनुदान देणारी महत्त्वपूर्ण अशी योजना म्हणजे तारबंदी योजना महाराष्ट्र होय. आजच्या या पोस्टमध्ये आपण तार बंदी योजना 2023 महाराष्ट्र संदर्भात विस्तृत माहिती तसेच Tarbandi Yojana 2023 Maharashtra अंतर्गत आवश्यक कागदपत्रे व इतर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो शासनाच्या वतीने अल्पभूधारक तसेच अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना म्हणजे तारबंदी योजना महाराष्ट्र होय. ही Tarbandi Yojana Maharashtra सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय राज्य शासनाच्या वतीने 2015-16 मध्ये घेण्यात आलेला होता. मित्रांनो ही तार बंदी योजना 2023 डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना अंतर्गत आपल्या राज्यात राबविण्यात येत आहे. गावातील गावकऱ्यांची वनावरील असलेली निर्भरता कमी करून त्यांना शेती व्यवसायावर आधारित जोडधंदे उपलब्ध करून देणे हा एक शासनाचा प्रयत्न असतो.
तार बंदी योजना राबविण्या मागचे उद्दिष्ट Objectives of Tarbandi Yojana Maharashtra :-
मित्रांनो Tarbandi Yojana 2023 राबविण्यात मागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे भटक्या जनावरांपासून शेतकऱ्यांच्या शेती पिकांची संरक्षण व्हावे याकरिता शेतकऱ्यांना तार कुंपण करण्याकरिता अनुदान उपलब्ध करून देणे. मित्रांनो जंगल तसेच वनाच्या लगत असलेले शेत यांना जंगली प्राणी तसेच मोकाट जनावरे यांचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक या जंगली तसेच मोकाट प्राण्यांमुळे संपूर्णतः नष्ट होते. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होते आणि शेतकरी कर्जबाजारी सुद्धा होऊ शकतो. याच अनुषंगाने शासनाच्या वतीने वनालगतच्या क्षेत्राला कुंपण करण्याकरिता अनुदान देण्यात येत आहे.
हे नक्की वाचा: कोणत्या शेतकऱ्याला किती नुकसान भरपाई मिळाली? असे चेक करा.
तारबंदी योजना अंतर्गत अनुदान किती? Tarbandi Scheme Maharashtra Anudan :-
मित्रांनो तार बंदी योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के पर्यंत अनुदान ते जास्तीत जास्त 90 टक्के पर्यंत अनुदान वितरित करण्यात येत आहे. या Tarbandi Yojana Maharashtra अंतर्गत अनुदान वगळता उर्वरित खर्च शेतकऱ्यांना स्वतः करायचा असतो. या तार बंदी योजना महाराष्ट्र अंतर्गत अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असते.
तार बंदी योजना अंतर्गत कोण लाभ मिळवू शकतो?
तारबंदी योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांना सामूहिक रित्या समिती तयार करून अनुदान मागणी करावी लागते. सामूहिक रित्या तयार केलेली समिती या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरविण्यात येत असते. शेतकऱ्यांच्या समितीमध्ये दहा शेतकऱ्यांचा समावेश असावा लागतो. दहा शेतकरी आपली स्वतःची समिती तयार करून तारबंदी योजना महाराष्ट्र अंतर्गत एकत्रितपणे अनुदान मागणी करू शकतात. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत कमीत कमी 0.5 पाच एकर शेत जमीन किंवा त्यापेक्षा जास्त शेत जमीन असणारे शेतकरी लाभ मिळवू शकतात. या Tarbandi Yojna 2023 अंतर्गत सलग क्षेत्राची कमाल लांबी 1000 मीटर राहील.
महत्वाचं अपडेट: नावीन्य पूर्ण योजना लाभार्थी यादी जाहीर; आत्ताच डाऊनलोड करा
तारबंदी योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे Required Documents For Tarbandi Yojana 2023
1. संबंधित शेत जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा
2. त्या जमिनीचा नकाशा
3. ज्या जमिनी अंतर्गत लाभ मिळवायचा आहे त्या जमिनीची एकापेक्षा जास्त मालक असतील तर त्याबाबत प्रमाणपत्र
4. शेतकऱ्यांचे बँक पासबुक
5. ग्रामपंचायत चा दाखला
6. वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र
7. समितीचा ठराव
8. अर्जदाराचा रहिवासी दाखला तसेच रेशन कार्ड
9. अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे फोटो
तारबंदी योजना महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया? How to apply for Tarbandi yojana Maharashtra
मित्रांनो तार बंदी योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. या योजनेअंतर्गत अर्ज सुरू झाल्यानंतर अर्जदारांना योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असतो किंवा जवळच्या सीएससी किंवा आपले सरकार सेंटर वरून देखील हा अर्ज करता येऊ शकतो. योजनेच्या अर्ज प्रक्रिया संदर्भात विस्तृत माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी किंवा जवळील वन क्षेत्रातील अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकतात.
या योजने संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून प्रश्न देखील विचारू शकतात. कमेंट करण्याचा ऑप्शन खाली दिलेला असून तुमच्या प्रश्नांची नक्कीच उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.