ई-पिक पाहणी केली असेल तर, असे करा स्टेटस चेक; नाहीतर कोणताच लाभ मिळणार नाही | E-Pik Pahani Status Check Online

 

शेतकरी मित्रांनो आपल्या सातबारावर पिकांच्या नोंदी आता, ई-पीक पाहणी(E-Pik Pahani) करून स्वतःच नोंदवायच्या आहे. आपल्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी (E Pik Pahani) करून आपल्या साताऱ्यावर आपल्या पिकांची नोंद होईल. त्यामुळे जर आपण ई पिक पाहणी केली असेल, तर आपण केलेली ई-पिक पाहणी झाली की नाही? ते आपण चेक केले पाहिजे. कारण की आता आपल्याला मिळणारा पिक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई ची मदत ही तुम्ही केलेल्या ई-पीक पाहणी(E-Pik Pahani) वरूनच वितरित करण्यात येत असते. त्यामुळे सध्या ई-पीक पाहणी(E-Pik Pahani) करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण आजच्या या पोस्टमध्ये ई पीक पाहणी चे स्टेटस कशे चेक करायचे? How to check the status of E-Peek Pahani? या विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

ई-पिक पाहणी केली असेल तर, असे करा स्टेटस चेक; नाहीतर कोणताच लाभ मिळणार नाही | E-Pik Pahani Status Check Online
ई-पिक पाहणी केली असेल तर, असे करा स्टेटस चेक; नाहीतर कोणताच लाभ मिळणार नाही | E-Pik Pahani Status Check Online

 

 

 

शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तुमच्या शेताची ई पीक पाहणी केलेली असेल; तर तुम्ही ई पीक पाहणी केली आणि त्याची नोंद तुमच्या सातबारावर झाली तरच खऱ्या अर्थाने तुमची ई पीक पाहणी यशस्वी झाली आहे. E-Pik Pahani केल्यानंतर आपल्या पिकांची नोंद सातबारा वर झाली आहे का ? हे जाणून घेतले पाहिजे. जर तुमच्या सातबारा वर तुम्ही केलेल्या ई पीक पाहणीच्या माध्यमातून नोंदविलेल्या पीक पेऱ्याची माहिती (E Pik Pahani Status Check Online)आलेली नसेल तर, तुम्हाला ई पीक पाहणी पुन्हा करावी लागेल. आता आपण केलेली ई पीक पाहणी चे स्टेटस कसे पाहायचे हे जाणून घेणार आहोत. E-Pik Pahani Status Check Online ,how to check e pik pahani online,e pik pahani status check

 

 

शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी अत्यंत गरजेचे आहे. इथून पुढे ई पीक पाहणी च्या आधारावर शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत वितरित होईल. त्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीने ई पीक पाहणी करावी लागते. त्याचप्रमाणे e pik pahani केल्या नंतर आपण केलेल्या e pik pahani status ची नोंद आपल्या सातबारावर होणे अत्यंत गरजेचे आहे. आता ही नोंद ई पाहणीच्या माध्यमातून होणार असल्यामुळे e pik pahani करावी लागते. E-Pik Pahani Status Check Online, how to check pahani online,E-Pik Pahani Status Check. मित्रांनो शासनाच्या अनेक योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता तसेच विविध सरकारी बाबींसाठी ई पिक पाहणी करण्याची अट असल्यामुळे शासन कोणतेही अनुदान किंवा निधी वितरीत करीत असताना ई पीक पाहणी चा डाटा विचारात घेतो. त्यामुळे सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने पिक पेरा नोंद करून घ्यावी.

 

हे नक्की वाचा:- कृषी सेवा केंद्र लायसन्स कसे काढावे?

 

आपण केलेली ई-पिक पाहणी यशस्वीरित्या अपलोड झालेली आहे, किंवा नाही हे आपण मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकतो. यासाठी आपण ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर करू शकतो. how to check pahani online, e pik pahani status check

 

 

ई- पीक पाहणी स्टेटस असे चेक करा ? E-Pik Pahani Status Check

ई- पीक पाहणी स्टेटस (E-Pik Pahani Status Check) ऑनलाइन पद्धतीने चेक करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहेत.

 

1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये ई पिक पाहणीचे नवीन ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या.

2. आता ई पिक पाहणीचे मोबाईल ॲप ओपन करा.

3. आता त्या मध्ये महसूल विभाग हा पर्याय निवडा. आता जर तुम्ही यापूर्वी ई पीक पाहणी केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी खातेदार निवड असा पर्याय दिसेल.

4. तुम्हाला तुमच्या शेत जमिनीचा खाते क्रमांक टाकायचा आहे.

5. त्यानंतर तुम्हाला एसएमएस वर प्राप्त झालेला संकेतांक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे.

6. आता तुम्हाला या ठिकाणी गावाचे खातेदारांची पीक पाहणी हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

7. आता आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांची नावे या ठिकाणी तुम्हाला दिसतील. या शेतकऱ्याचे नाव हिरव्या रंगांमध्ये असेल त्या शेतकऱ्याची ई पीक पाहणी झालेली आहे.

8. आता तुम्हाला तुमच्या नावासमोर एक डोळ्याचे चिन्ह असेल त्या पर्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर तुम्ही केलेल्या ई पीक पाहणी ची संपूर्ण माहिती ओपन झालेली असेल.

9. ई पीक पाहणीच्या माध्यमातून तुम्ही कोणते पीक नोंदविलेले आहे. तुमचे एकूण लागवड क्षेत्र किती आहे? तुमचा खाते क्रमांक तसेच तुम्ही नोंदवलेल्या पिकांची सर्व माहिती दिसेल.

 

 

हे नक्की वाचा:- नियमित कर्जमाफी योजना अंतर्गत 50000 अनुदानाची नवीन यादी जाहीर

 

अशाप्रकारे आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या ई पीक पाहणीचे स्टेटस चेक करू शकतो. म्हणजेच आपण केलेली ई पीक पाहणी सातबारावर नोंदवलेली आहे किंवा नाही ते चेक करू शकतो.

 

पिक पाहणी संदर्भातील ही माहिती इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या या वेबसाईटवर भेट देत राहा.