कृषी सेवा केंद्र (कृषी केंद्र) लायसन्स ऑनलाईन प्रक्रिया | Krushi Seva Kendra Licence Maharashtra Online

 

रासायनिक खते, कीटकनाशके, बी बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कृषी सेवा केंद्र होय. जर आपल्याला शेतीसंबंधीत तसेच शेतीतील पिकांसंबंधी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी आपल्याला बाहेर कुठेही मिळत नाहीत. या गोष्टी आपल्याला कृषी सेवा केंद्र म्हणजेच कृषी केंद्र मधूनच आणावे लागतात. त्यामुळे जर आपले स्वतःचे कृषी सेवा केंद्र असले तर आपण या सेवा गावातील इतर नागरिकांना देऊन चांगला नफा उत्पन्न मिळवू शकतो. याकरिता आपल्याला कृषी सेवा केंद्राचा परवाना काढावा(krushi seva kendra licence kase kadhave) लागत असतो. कृषी केंद्राचे लायसन्स आपण ऑनलाइन पद्धतीने काढू शकतो. आपण ऑनलाईन पद्धतीने कृषी केंद्र लायसन(krushi kendra licence maharashtra) करिता अर्ज केल्यानंतर कृषी विभागामार्फत हे लायसन्स प्रदान करण्यात येत असतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण कृषी केंद्र लायसन्स करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा(how to open krishi seva kendra) याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. krushi seva kendra information in marathi,Krushi Kendra Licence Maharashtra

कृषी सेवा केंद्र (कृषी केंद्र) लायसन्स ऑनलाईन प्रक्रिया | Krushi Seva Kendra Licence Maharashtra Online
कृषी सेवा केंद्र (कृषी केंद्र) लायसन्स ऑनलाईन प्रक्रिया | Krushi Seva Kendra Licence Maharashtra Online

 

कृषी सेवा केंद्र परवाना कागदपत्रे 2022 Required Documents For Krushi Seva Kendra 2022

krishi seva kendra licence documents marathi खालील प्रमाणे आहे.कृषी सेवा केंद्र परवाना कागदपत्रे कृषी सेवा केंद्र परवाना कागदपत्रे 2022 खालील प्रमाणे आहेत.Krishi Seva Kendra Licence Documents marathi PDF

1. पॅन कार्ड
2. आधार कार्ड
3. मतदान कार्ड
4. शैक्षणिक पात्रता
5. बँक अकाउंट (राष्ट्रीयकृत बँकेचे)
6. वीज बिल
7. रेशन कार्ड
8. पत्रक ४
9. ग्रामपंचायत मधील ना हरकत प्रमाणपत्र
10. टीसी
11. कृषी केंद्र ज्या ठिकाणी टाकायचे आहे, त्या जागेचा गाव नमुना आठ
12. ऑनलाईन चलन फॉर्म
13. उद्यम प्रमाणपत्र
14. जर कृषी सेवा केंद्र उभारायची जागा ही भाड्याने घेतलेली असल्यास त्या जागेचा शंभर रुपयांच्या बॉण्ड वर ऍग्रिमेंट

krushi seva kendra licence documents वरील प्रमाणे तुम्हाला आवश्यक आहेत. हे असल्यास आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो. krushi seva kendra information in marathi

केंद्र सेवा केंद्र लायसन्स काढण्यासाठी फी(Krushi Seva Kendra licence Fee)

कृषी सेवा केंद्र लायसन्स काढण्यासाठी आपल्याला फी पेड करावी लागते. त्यामध्ये आपल्याला रासायनिक खते, कीटकनाशके आणि बियाणे यांचे लायसन्स मिळते. त्यामुळे   प्रत्येक परवाना करिता फी वेगवेगळी आहे.krushi seva kendra information in marathi

1. बियाणे लायसन्स – 1000 रू फी
2. रासायनिक कीटकनाशके  – 7500 रू फी
3. रासायनिक खते – 450 रू फी

कृषी सेवा केंद्र चालू करण्याकरिता जागा कशी निवडावी?

कृषी सेवा केंद्र हे शेतकऱ्यांशी निगडित असल्यामुळे आपल्याला कृषी सेवा केंद्र चालू करताना ते जास्तीत जास्त चालले पाहिजे अशा ठिकाणी निवडायचे आहे. जसे की एखादी खेडेगाव ज्या गावात कृषी केंद्र नसेल. त्याचप्रमाणे आपण तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा एखादी चांगली जागा ज्या ठिकाणी जास्त कृषी केंद्र नसतील परंतु शेतकऱ्यांचे ये जा असेल अशा ठिकाणी. कोणत्याही चौकामध्ये अशा ठिकाणी आपण कृषी सेवा केंद्र चालू करू शकतो. जेणेकरून आपले कृषी सेवा केंद्र जास्त चालेल आणि आपल्याला जास्त नफा मिळू शकेल.krushi seva kendra information in marathi

हे नक्की वाचा:- शॉप ऍक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे?

कृषी सेवा केंद्र मार्जिन/नफा

जर तुम्ही कृषी सेवा केंद्र चालू करायच्या विचारात असाल तर त्यासाठी तुम्हाला कृषी सेवा केंद्र मधून आपण किती नफा/मार्जिन कमवू शकतो. हे माहीत असणे गरजेचे आहे. आपण जर krushi seva Kendra सुरु केले तर खालील प्रमाणे नफा कमवू शकतो. Krushi Seva Kendra licence maharashtra

बी बियाणे – यामध्ये आपण  बी बियाणे  विक्रीतून 20% ते 30 % पर्यंत नफा कमवू शकतो.
ब्रँडेड कीटकनाशके – यामध्ये आपण ब्रँडेड कीटकनाशके विक्रीतून 5.6 % पर्यंत नफा कमवू शकतो.
लोकल कीटकनाशके – यामध्ये आपण लोकल कीटकनाशके विक्रीतून 15% ते 25 % पर्यंत नफा कमवू शकतो. लोकल मध्ये नवीन कंपन्या असल्यामुळे त्यांचा प्रॉडक्ट लवकर आणि जास्त सेल व्हावा म्हणून ते जास्त नफा देतात.
रासायनिक खते – रासायनिक खतांच्या विक्रीतून आपण  2% ते 5% पर्यंत नफा कमवू शकतो.

 

कृषी सेवा केंद्र अर्ज करण्यासाठी पात्रता(krushi seva kendra licence qualification)Fertilizer licence qualification Maharashtra in marathi

कृषी सेवा केंद्र लायसन्स काढण्यासाठी आपल्याकडे खालील पात्रता(krushi seva kendra licence qualification) असावी लागते. Fertilizer licence qualification Maharashtra in marathi

कृषी सेवा केंद्र लायसन्स काढण्यासाठी तुम्ही कृषी पदविका 2 वर्षे ( पिक संरक्षण, पिक संवर्धन) पूर्ण केले पाहिजे किंवा B.S.C (Agree) किंवा बी. टेक.  बी.एस.सी.(रसायन शास्त्र या विषया सह) ही शैक्षणिक अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला पाहिजे.

वरील अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असल्यास आपण ऑनलाईन पद्धतीने कृषी सेवा केंद्र करिता अर्ज करू शकतो. आणि कृषी सेवा केंद्र लायसन्स मिळवू शकतो.

 


हे नक्की वाचा:- demat account काय आहे? फ्री डिमॅट अकाउंट कसे ओपन करायचे?

कृषी सेवा केंद्र लायसन्स ऑनलाईन काढण्याची प्रोसेस

कृषी सेवा केंद्र परवाना ऑनलाइन पद्धतीने काढण्याकरिता खालील प्रमाणे krushi seva kendra registration प्रोसेस पूर्ण करावी. krushi seva kendra license process खालील प्रमाणे आहे.

1.सर्वप्रथम आपल्याला आपले सरकार महाराष्ट्राच्या खालील वेबसाईटवर जायचे आहे.

वेबसाईट लिंक

ही वेबसाईट तुम्ही तुमच्या कंप्यूटर मध्ये ओपन करून घ्या.

2. आता तुम्हाला या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे. त्याकरिता तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करून. तुमची नवीन युजर प्रोफाईल तयार करून घ्या.
3. आता तुम्ही तुमची रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचे आहे, लॉगिन करण्याकरिता तुम्ही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर, तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून घ्या आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव  व  खाली दिलेला कॅपच्या कोड लॉगिन करा.
4. आता तुमच्यासमोर आपले सरकारचे नवीन पेज ओपन झालेले आहे. जर तुम्हाला या ठिकाणी भाषा चेंज करायची असेल तर तुम्ही ती चेंज करू शकतात. या ठिकाणी मराठी भाषेचा पर्याय निवडून घ्यावा.
5. आता तुम्हाला या पोर्टलवर शासन पुरवीत असलेल्या सर्व ऑनलाईन सुविधा दिसत असेल. त्यापैकी आपल्याला कृषी केंद्र साठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता “कृषी” हा पर्याय निवडायचा आहे.
6. आता उजव्या साईडला तुम्हाला उपविभाग या ऑप्शन मध्ये “कृषी परवाना सेवा” हा पर्याय निवडून घ्यायचा आहे.
7. आता तुम्हाला कृषी परवाना सेवा अंतर्गत विविध परवाने दिसत आहेत,

किटकनाशके उत्पादन /विक्री परवाना (राज्यस्तर)
मृद व पाणी नमुने तपासणी
बियाणे नमुने तपासणी
किटकनाशके नमुने तपासणी
ठिबक संच उत्पादक नोंदणी
खत निर्मिती/ विक्री प्रमाणपत्र देणे (राज्यस्तर)
बियाणे विक्री परवाना (राज्यस्तर)
खते उत्पादक परवाना नोंदणी
कीटकनाशके निर्माता परवाना नोंदणी
खते नमुने तपासणी
कॉटन डीलर लायसन्स रजिस्ट्रेशन
कीटकनाशके विक्रेता परवाना नोंदणी
बियाणे विक्रेता परवाना नोंदणी
खते विक्रेता परवाना नोंदणी

8. आपण ऑनलाईन पद्धतीने वरीलपैकी कोणतेही परवाने काढू शकतो. परंतु आता आपल्याला जो परवाना करायचा असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. आता आपल्याला कृषी सेवा केंद्र अंतर्गत कृषी केंद्र मध्ये खते विकायची असतात. त्यामुळे आपण खत विक्री करण्यासाठीचा परवाना काढण्याकरिता “खते विक्रेता परवाना नोंदणी”  या पर्यावर क्लिक करायचे आहे.

9. आता आपल्यासमोर महा परवाना पोर्टल ओपन झालेले आहे. या ठिकाणी आपल्याला विविध पर्याय दिसत आहेत. त्यापैकी आपल्याला Fertilizer Dealer License” या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आपल्याला राज्य लेव्हलचा परवाना काढायचा असल्यामुळे.New License (State Level) या पर्यायावर क्लिक करा.
10. आता आपल्यासमोर माहिती भरणे करिता एक नवीन पेज ओपन झालेले आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण आपले आपले महाराष्ट्र राज्य निवडून घ्यायचे आहे, त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे. लायसन्स होल्डर या ऑप्शन मध्ये न्यू यूजर हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही होलसेल लायसन काढणार असाल तर होलसेल निवडा किंवा जर रिटेल लायसन काढणार असेल तर रिटेल डीलर लायसन हा पर्याय निवडा.
11. आता आपल्याला अर्ज धरायची वैयक्तिक माहिती भरायची आहे, त्यामध्ये अर्जदाराचे नाव असेल अर्जदाराचे आडनाव, वय, जन्म तारीख, शैक्षणिक माहिती, आधार कार्ड नंबर तसेच पॅन कार्ड नंबर आणि पदनाम ही सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे.
12. त्यानंतर अर्जदाराचा पत्ता भरायचा आहे. अर्जदाराची संपर्क माहिती भरायची आहे.
13. आता तुम्हाला Firm Information, Fertilizer Type and Grade, Sales Address Details,Responsible Person Details,Storage Address Details हे सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर पेमेंट पूर्ण करायचे आहे.
14. हे सर्व माहिती भरून तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे.

अश्या प्रकारे आपण कृषी सेवा केंद्र लायसन्स करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. कृषी सेवा केंद्र विषयी अधिक माहिती करिता आपण तालुका कृषी अधिकारी यांना भेटून माहिती जाणून घेऊ शकतो.

कृषि सेवा केंद्र ऑनलाइन रजिस्ट्रेशन:

कृषी सेवा केंद्र परवाना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे असल्यास तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र च्या पब्लिक लॉगिन करून करता येते. कृषी केंद्र लायसन्स ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर फी पेमेंट केल्यास आपल्याला परवाना प्राप्त होतो.

Leave a Comment