डिमॅट अकाउंट म्हणजे काय? Demat खाते कसे ओपन करावे? | Demat Account Information Marathi

 

मित्रांनो आपण पाहत आहोत की दिवसेंदिवस शेअर मार्केट हे प्रसिद्ध होत आहे. आजच्या या आधुनिक डिजिटल युगात प्रत्येक जण सहजतेने शेअर खरेदी व विक्री करू शकतो. तसेच ipo मध्ये सुद्धा investment करू शकतो. आणि यासाठी आवश्यक असते ते म्हणजे demat account . तुम्ही आजपर्यंत डिमॅट अकाउंट हा शब्द ऐकला असेल. आजच्या या लेखा मध्ये आपण डिमॅट अकाउंट काय आहे? डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे? कागदपत्रे कोणती लागतात. Demat account ओपन करण्यासाठी खर्च किती येतो? या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. Demat Account Information in Marathi

 

डिमॅट अकाउंट काय आहे, कसे ओपन करावे, कागदपत्रे फी सर्व माहिती | what is demat account in marathi, demat account opening process in marathi
डिमॅट अकाउंट काय आहे, कसे ओपन करावे, कागदपत्रे फी सर्व माहिती

 

डिमॅट अकाउंट काय आहे? What is Demat Account in Marathi ?

डिमॅट अकाउंट हे असे खाते आहे, ज्याच्या माध्यमातून शेअर्स ची तसेच ipo तसेच इतर securities ची खरेदी विक्री ही डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून केली जाते. demat account kay aahe,डिमॅट अकाउंट माहिती मराठी,Demat Account Information Marathi

 

 

हे सुध्दा वाचा:- शेअर मार्केट IPO(Initial Public Offering) काय आहे? Ipo साठी कसे apply करायचे.

 

 

डिमॅट अकाउंट ओपन केल्यास आपल्याला खालील गोष्टी डिजिटली करता येतात, जसे की शेअर ची खरेदी विक्री करणे, बॉन्ड्स मध्ये investment करणे, तसेच सरकारी सिक्युरिटीज व mutual funds, या मध्ये आपण डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून invest करू शकतो. Demat Account शिवाय आपण शेअर बाजारात गुंतवणूक करू शकत नाही. ज्या प्रमाणे आपल्याला पैशाच्या व्यवहारासाठी बँकेची आवश्यकता असते. त्याच प्रमाणे शेअर संबंधित व्यवहारांसाठी आपल्याला डिमॅट खाते(Demat Account) ची आवश्यकता असते.

 

डिमॅट हा “DEMATERIALLISATION” या शब्दाचा short form आहे. शेअर्स चे रूपांतर भौतिक स्वरूपात करते आणि या प्रक्रियेस DEMATERIALLISATION असे म्हटले जाते.

 

 

डिमॅट अकाउंट कसे कार्य करते | How Demat Account Works:-

सुरुवातीला शेअर खरेदी विक्री करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कागदपत्रे हाताळावी लागत होती. जेव्हा जेव्हा आपण शेअर खरेदी किंवा विक्री करत होतो तेव्हा तेव्हा तुम्हाला व्यवहार केल्याची कागदपत्रे ही तयार करून ठेवावी लागत होती. या सर्व कागदपत्र पासून सुटका मिळविण्यासाठी आपल्या भारत सण १९९६ मध्ये NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) ची सुरुवात करण्यात आली. तसेच BSE ( Bombay stock exchange) याची सुद्धा सुरुवात करण्यात आली.

 

आता तुम्हाला या nse किंवा bse मध्ये शेअर खरेदी किंवा विक्री करावयाचे असल्यास तुमच्याकडे demat account असणे गरजेचे आहे.

 

 

जेव्हा तुम्ही डीमॅट अकाऊंट ओपन करता तेव्हा तुम्ही ज्या ब्रोकर कडे डिमॅट अकाउंट ओपन केले आहे तो ब्रोकर nsdl किंवा cdsl कडे तुमचे शेअर्स हे deposit करत असतात. Demat account हे stock broker हे आपले मध्यस्थी म्हणून काम करत असतात. तुम्ही ज्या ब्रोकर कडे डिमॅट अकाउंट ओपन कराल तो तुमचा मध्यस्थ असतो.

 

डिमॅट अकाउंट ओपन केल्या नंतर तुम्हाला dp id देण्यात येत असते. Unique client code आणि demat account number किंवा BOID देण्यात येत असतो.

 

फ्री डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

उदाहरणार्थ जर तुम्हाला, “XYZ” कंपनीचे शेअर खरेदी करायचे असल्यास जेव्हा आपण शेअर खरेदी करतो तेव्हा ते शेअर आपली शेअर खरेदी ची ऑर्डर place झाल्या नंतर लगेच आपल्या डिमॅट खात्यात जमा केले जातात. त्यानंतर तुम्हाला शेअर खरेदी केल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच confirmation मिळतो.

 

हे नक्की वाचा:- शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची? 

तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन केल्या नंतर तुम्हाला एक संकेतांक देण्यात येतो ज्याच्या माध्यमातून तुम्ही डिमॅट खात्यात एंटर होऊ शकतात. तसेच शेअर खरेदी विक्री करण्यासाठी तुम्हाला एक transaction password सुद्धा तयार करावा लागतो.

 

 

डिमॅट अकाउंट कश्या प्रकारे ओपन करावे | How to open demat account in Marathi :-

तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने डिमॅट अकाउंट ओपन करावयाचे असल्यास तुम्ही angel one, upstox pro, Zerodha किंवा grow, five paisa, Groww या ब्रोकर कडे तुम्ही तुमचे डिमॅट अकाउंट ओपन करू शकतात.

 

सध्या Angel One हे free मध्ये डिमॅट अकाउंट ओपन  करून देत आहेत. त्यामुळे आपण angle one चे अकाउंट ऑनलाईन कसे ओपन करायचे हे पाहणार आहोत.

 

Step 1: angle one या वेबसाईट ला ओपन करा. आता इथे एक खाते उघडा किंवा ‘Open An Account’ किंवा creat new account या पर्याय वर क्लिक करा.

 

Step 2: आता इथे तुम्ही तुमची basic माहिती प्रविष्ट करा. जसे की पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी ही माहिती प्रविष्ट करा.

 

Step 3: आता पुढील माहिती तुम्हाला भरावी लागेल ज्या मध्ये बँक डिटेल, personal details, तुमचा आधार क्रमांक पॅनकार्ड क्रमांक, त्यानंतर otp टाकून verify करून घ्यावे लागेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा face video record करून अपलोड करावा लागेल.

 

Step 4: तुम्ही ज्या वेळेस अकाउंट ओपन करत असाल त्यावेळेस जर डिमॅट अकाउंट फ्री असेल तर तुम्हाला पैसे जमा करण्याची गरज पडत नाही. जर अकाउंट ओपनिंग फ्री नसेल तर पैसे पेड करावे लागते.

 

Step 5: सर्व Documents सादर केल्यानंतर आपले डिमॅट अकाउंट kyc प्रक्रिया पूर्ण होऊन ३-४ दिवसात approve होणार आहे.

 

सध्या Angel One हे फ्री मध्ये demat account ओपन करून देत आहेत. त्यामुळे खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही डिमॅट अकाउंट फ्री मध्ये ओपन करू शकतात.

 

फ्री डिमॅट अकाउंट लिंक:-

 

 

कृपया डिमॅट अकाउंट ओपन करते वेळेस कंपनीच्या term आणि conditions वाचून तसेच चार्जेस पाहूनच अकाउंट ओपन करावे. वरील फ्री डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या. यामध्ये हे फ्री असून यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारण्यात येणार नाही.

 

 

Demat Account ओपन करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :-

The following documents are required for opening a demat account

१) पॅन कार्ड / Pan Card

२) आधार कार्ड / Aadhaar Card

३) पासपोर्ट आकाराची फोटो (Passport size Photo)

४) रद्द केलेला चेक (Cancelled Cheque)

५) सेव्हिंग्ज बँक खाते पासबुक (Savings PassBook)

 

 

Demat Account उघडण्यासाठी किती पैसे लागतात?

Demat account ओपन करण्यासाठी तुम्हाला 400 रुपये ते 500 रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो. आपण अगदी सहज एवढ्या रुपयात डिमॅट अकाउंट ओपन करू शकतो. एकादी कंपनी फ्री मध्ये सुध्दा डिमॅट अकाउंट ओपन करून देते. कधी कधी कंपन्या ऑफर आणून डिमॅट अकाउंट फ्री मध्ये ओपन करून देत असतात.

 

डिमॅट अकाउंट ओपन केल्या नंतर आपल्याला विविध प्रकारचे चार्जेस द्यावे लागते. जसे की amc(account maintenance charges) प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी फी आकारली जाते. शेअर खरेदी विक्री करताना brockrage चार्जेस अश्या प्रकारे अनेक प्रकारच्या चार्जेस असतात. आणि हे चार्जेस कंपनी नुसार बदलत असतात. काही कंपन्या फी मध्ये सुट देत असतात.

 

डिमॅट अकाउंट कोण ओपन करू शकतो?Who can open demat account?

Demat Account हे कोणताही भारतीय व्यक्ती जो 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा आहे. आणि ज्याच्या कडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड तसेच बँक अकाउंट आहेत, आहे व्यक्ती Demat Account ओपन करू शकतात.

आपण किती डिमॅट अकाउंट ओपन करू शकतो? How many demat accounts can we open?

आपल्याकडे किती डिमॅट अकाउंट असावे, याबाबत काही नियम नाहीत, आपण ऐका पेक्षा जास्त डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो. परंतु आपण एकाच स्टॉक ब्रोकर कडे एका पेक्षा जास्त डिमॅट खाते ओपन करू शकत नाही.

 

 

डिमॅट अकाउंटचे फायदे Benifits Of Demat Account:-

आपल्याकडे डिमॅट अकाउंट असल्यास खालील फायदे आपल्याला मिळतात. Demat Account Information Marathi

1. डिमॅट खात्याचा वापर करून आपण शेअर्स मध्ये आणि इतर सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करू शकतो.

2. डिमॅट खात्याच्या माध्यमातून आपण शेअर संबंधित सर्व व्यवहार करू शकतो.

3. डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून आपण स्टॉक, म्युच्युअल फंड, बाँड्स, एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) इत्यादीं आपल्या खात्यात होल्ड करू शकतो.

4. डिमॅट खाते आपण ऑनलाइन ओपन करू शकतो.

 

 

डिमॅट अकाउंट चा वापर भारतात केव्हापासून सुरू झाला?

शेअर बाजारातील सर्व व्यवहार हे आपल्याला डिमॅट अकाउंट(Demat Account) च्या सहाय्याने करता येते. आपल्या भारत देशात डिमॅट अकाउंट चा वापर हा राष्ट्रीय शेअर बाजारात 1996 पासून सुरू झाला.

 

डिमॅट अकाउंट ओपन करतांना या गोष्टी लक्षात ठेवाव्या :-

मित्रांनो बाजारामध्ये डिमॅट अकाउंट ओपन करून देणारे अनेक ब्रोकर्स आहेत. परंतु डिमॅट अकाउंट ओपन करताना आपण त्या ब्रोकर बद्दल माहिती जाणून घेतली पाहिजे. जसे की ज्या ब्रोकर कडे आपण डिमॅट अकाउंट ओपन करणार आहोत. तो ब्रोकर किती वर्षापासून डिमॅट अकाउंट ओपनिंग सेवा उपलब्ध करून देत आहेत. डिमॅट अकाउंट ओपनिंग चे ओपनिंग चार्जेस आहेत का? डिमॅट अकाउंट amc charges आहेत का? तसेच काही छुपे चार्जेस आहेत का? व तो ब्रोकर आपल्याला इतर ब्रोकर पेक्षा कोणत्या सुविधा जास्त पुरवीत आहेत. या गोष्टीचा विचार डिमॅट अकाउंट ओपन करताना करावा.

 

 

डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट यातील फरक

ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण शेअर्स, भाग ची खरेदी विक्री चे व्यवहार करत असतो, वेगवेगळ्या शेअर बाजारातील ऑर्डर आपण ट्रेडिंग अकाउंट मध्ये करत असतो, तर डिमॅट खात्यात आपण खरेदी केलेले शेअर हे जमा करण्यात येते. आणि शेअर हे विक्री केल्यास डिमॅट खात्यातून कमी केले जातात. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण विविध व्यवहार करतो, तर डिमॅट अकाउंट मध्ये शेअर जमा करण्यात येत असतात.demat account meaning in marathi, Demat Account Information Marathi

 

मित्रांनो डिमॅट अकाउंट हे आपल्याला शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, आजकाल अनेक लोकं शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत आहेत, अनेक लोकांनी गुंतवणूक सुद्धा केलेली आहे. त्यामुळे आजच्या काळात ज्याप्रमाणे प्रत्येकाकडे बँक खाते आहे, त्याच प्रमाणे प्रत्येकाचे demat account सुद्धा आहे.

Demat Account संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट भेट देत चला.