शेळी मेंढी, गाई म्हशी, कुक्कुट पालन अनुदान योजनांतर्गत निवड, आता कागदपत्रे अपलोड करा | Navinypurn Yojana 2022 document upload

शेळी मेंढी, गाई म्हशी, कुक्कुट पालन अनुदान योजनांतर्गत ज्यांनी अर्ज केला होता, अश्या अनेक लाभार्थ्यांची या योजने अंतर्गत निवड झालेली आहे, अश्या लाभार्थ्यांना आता कागदपत्रे अपलोड करायची आहेत. Navinypurn Yojana 2022 document upload, Navinypurn Yojana 2022 AH – mahabms

शेळी मेंढी, गाई म्हशी, कुक्कुट पालन अनुदान योजनांतर्गत निवड, आता कागदपत्रे अपलोड करा | Navinypurn Yojana 2022 document upload

 

 

राज्य शासनाच्या वतीने नाविण्यपूर्ण जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय वैयक्तीक लाभाच्या दुधाळ गाई- म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी, कुक्कुट पालन या नावीन्यपूर्ण योजने साठी अर्ज मागविण्यात आले होते, आता निवड झालेल्या लाभार्थ्यांना मुदतीत कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

 

 

हे सुध्दा नक्की वाचा:- शेळी मेंढी कुक्कुट पालन व गाय म्हैस गोठा योजना काय आहे? अर्ज कसा करायचा?

 
 

शेळी-मेंढी गट वाटप करणे, गाई म्हशी व कुक्कुट पालन या नावीन्यपूर्ण अनुदान योजना साठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविण्यात येत आहे.

 

या नावीन्यपूर्ण योजनेत ज्या लाभाथ्यांची निवड करण्यात आली आहे(प्रतीक्षा यादीवरील लाभार्थ्यांसह),अशा निवड झालेल्या लाभार्थ्यांनी आता दिलेल्या मुदतीत कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

 

कागदपत्रे अपलोड करायची तारीख ही दिनांक.12 जानेवारी 2022 (सकाळी 10.00 वाजता पासून) ते दिनांक 16 जानेवारी 2022 (रात्री 12.00 वाजता पर्यंत) आवश्यक कागदपत्रे ही पशुसंवर्धन विभागाच्या https//ah.mahabms.com या official वेबसाईट वर अपलोड करायची आहे.

हे नक्की वाचा:- कुसुम सोलर पंप योजना २०२२

 

 

Navinypurn Yojana 2022 अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

शेळी मेंढी, गाई म्हशी, कुक्कुट पालन अनुदान योजनांतर्गत निवड झालेल्या तसेच प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे अपलोड करायची आहे.

 

१) ७/१२ (अनिवार्य)

२) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

३) आठ -अ उतारा (अनिवार्य)

४) adhar card (अनिवार्य )

५) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

६) जर लाभार्थ्यांचे ७-१२ मध्ये नाव नसेल तर त्याला कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन जर भाडे तत्वावर घेतलेली असेल तर करारनामा (अनिवार्य अपलोड करायचा आहे)

७) जर या नावीन्यपूर्ण योजना साठी निवड झालेला लाभार्थी हा अनुसूचीत जाती/जमाती या प्रवर्गातील असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत जोडावी लागेल. (जर लाभार्थी वरील प्रवर्गातील असेल तर अनिवार्य आहे)

 

हे नक्की वाचा:- सरकारची नवीन योजना राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना काय आहे ? अर्ज कसा करायचा? 

८) रहिवासी प्रमाणपत्र (असेल तर अपलोड करणे अनिवार्य )

९)जर या योजने अंतर्गत निवड झालेला अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील असल्यास दारिद्य्र रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र हे जोडावे लागते.

१०) बँक पासबुक

११) रेशनकार्ड (एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला या योजने अंतर्गत लाभ घेता येतो)

१२) जर निवड झालेला लाभार्थी हा दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करावे लागते.

१३) जर या नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार हा बचत गटाचा सदस्य असेल तर त्याचे प्रमाणपत्र हे अपलोड करावे लागते.

१४) जन्म दाखला

१५) शिक्षणाची पात्रता असल्याचा दाखला

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत ही अपलोड करावी लागेल

 

 

 

Leave a Comment