घरगुती वीजग्राहकांसाठी रुफटॉप सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी योजना | Roof top solar yojana

आजच्या या लेखा मध्ये आपण रुफटॉप सौर ऊर्जा यंत्रणा योजना काय आहे? अनुदान किती व कसे मिळणार? अर्ज कसा करायचा या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

रुफटॉप सौर ऊर्जा योजना काय आहे?:-

केंद्र सरकारच्या वतीने महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना 40 % अनुदान देण्यात येत आहे. या केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली योजना ही रुफटॉप सौर ऊर्जा यंत्रणा योजना आहे. या योजने अंतर्गत रुफटॉप सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी अनुदान हे देण्यात येणार आहे.

घरगुती वीजग्राहकांसाठी रुफटॉप सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी योजना | Roof top solar yojana

 

 

या Roof top solar anudan yojana अंतर्गत खालील प्रमाणे अनुदान हे देण्यात येणार आहेत.

 

हे नक्की वाचा:- कुसुम सौर पंप योजना २०२२ काय आहे? अर्ज कसा करायचा?

गृहनिर्माण संस्थांना तसेच निवासी संघटनांना २० टक्के अनुदान हे देण्यात येणार आहेत तसेच या Roof top solar anudan yojana अंतर्गत सुमारे ४ वर्षांत परतफेडीची संधी ही देण्यात येणार आहे. तसेच या योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे अश्या लाभार्थ्याकडून नेटमिटरिंगद्वारे ग्राहकांची वीज ही महावितरण द्वारे विकत घेण्यात येणार आहेत. Roof top solar anudan 2022

 

जे व्यक्ती महावितरण ची वीज वापरतात, अशा महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने अनुदान हे देण्यात येणार आहेत. या Roof top solar anudan yojana अंतर्गत 40 % पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजने मुळे लाभार्थ्यांना दर महिन्याला येत असलेल्या वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

 

हे नक्की वाचा:- प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मिळालं नाही? अशी करा तक्रार

त्याच प्रमाणे या Roof top solar anudan yojana अंतर्गत देण्यात येत असलेली एक महत्वपूर्ण सोय म्हणजे या मध्ये जी वीज वर्षाच्या शेवटी शिल्लक राहील ती वीज महावितरण ग्राहकाकडून विकत सुद्धा घेणार आहेत.

 

 

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या रुफटॉप सौर योजना यंत्रणेच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यासाठी मंजुरी ही आता देण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत महावितरण साठी २५ मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे.ग्राहकांना या योजनेमधून किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा ही बसवून देण्यात येणार आहेत.

रुफटॉप सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी देण्यात येणारे अनुदान:-

या योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांना १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के इतके अनुदान हे देण्यात येणार आहेत आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत असल्यास २० टक्के इतके मिळणार आहेत. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांना देण्यात येणार असलेले अनुदान हे २० टक्के इतके आहे.

 

हे सुध्दा वाचा:- राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना

महावितरणच्या अंतर्गत एजंन्सीजची नियुक्ती ही करण्यात आलेली आहेत.

रुफटॉप सौर ऊर्जा यंत्रणा योजना अर्ज कसा करायचा?:-

Roof top solar panel yojana साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हीं खालील लिंक च्या माध्यमातून अर्ज करू शकतात किंवा इतर माहिती मिळविण्यासाठी खलील लिंक चा वापर करू शकतात.

 

https://solarrooftop.gov.in

 

रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती Roof top solar panel यंत्रणेसाठी खालील प्रमाणे किमती ह्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

 

१ किलोवॅट रुफ टॉप सोलर यंत्रणा – ४६,८२०, रुपये

१ ते २ किलोवॅट रूफ टॉप सोलर यंत्रणा- ४२,४७० रुपये

२ ते ३ किलोवॅट रूफ टॉप सोलर यंत्रणा- – ४१,३८० रुपये

३ ते १० किलोवॅट रूफ टॉप सोलर यंत्रणा – ४०,२९० रुपये

तसेच १० ते १०० रूफ टॉप सोलर यंत्रणा बसविण्यासाठी ३७,०२० रुपये

प्रति किलोवॅट किंमत ही या योजने अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहेत.

 

 

वरील किमती ह्या अनुदान वगळता देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ४०% इतके अनुदान हे वजा करून ग्राहकास त्या किमती पडणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने मिळणारे या योजने साठी सबसिडी वजा करून उर्वरित रक्कम ही लाभ घेण्यासाठी ग्राहकास पेड करावयाची आहे.

 

 

केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी महावितरण च्या वतीने आव्हान हे करण्यात आलेले आहेत. ह्या Roof top solar panel yojana अंतर्गत लाभ घेतल्या नंतर घरगुती वीजबिलात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच ही योजना पर्यावरण पूरक आहे. या योजने अंतर्गत येणाऱ्या खर्चाची परतफेड ही 3 वर्ष ते 5 वर्षात होणार आहेत. तसेच या योजने अंतर्गत वर्ष आखेर शिल्लक राहणारी वीज ही ग्राहकांकडून महावितरण खरेदी करणार असल्याने ग्राहकांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा हा होणार आहेत.

हे नक्की वाचा:- शेळी पालन शेड बांधकाम योजना काय आहे? अर्ज कसा करायचा

अश्या पद्धतीने Roof top solar panel yojana ही राबविण्यात येणार आहे. या योजने चा फायदा नक्कीच महावितरण च्या ग्राहकांना होणार आहे.

 

 

 

Leave a Comment