आजच्या या लेखा मध्ये आपण विधवा पेन्शन योजना काय आहे? या विधवा पेन्शन योजना साठी अर्ज कसा करायचा? या योजने साठी लागणारी कागदपत्रे या Vidhwa Pension Yojana Maharashtra 2022 साठी पात्रता, या विषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र काय आहे? :-
विधवा पेन्शन योजना ही महाराष्ट्र सरकारने म्हणजेच आपल्या राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना ज्या आर्थिक दुर्बल आहे अशा महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली होती. या Vidhwa Pension Yojana Maharashtra अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला ६०० रुपयांची आर्थिक मदत ही करण्यात येत असते.
या विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीब विधवा महिलांना स्वावलंबी तसेच आर्थिक दृष्ट्या प्रगत करण्यासाठी मदत केली जाते. या विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत महिलांना सशक्त करण्यात येत असते. जेणेकरून या विधवा महिलांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये. या विधवा पेन्शन योजना साठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वतंत्र २३ लाखांचे बजेट हे तयार केलेले आहे. Vidhwa Pension Yojana Maharashtra 2022
अशा विधवा महिलांना तिचा पती हयात नसल्यामुळे कुणाचाही आधार नसतो, त्यामुळे या योजनेतून जे काही मदत सरकारतर्फे देण्यात येत असते, त्या माध्यमातून ह्या महिला स्वत:चे आयुष्य जगू शकतील, या विधवा महिलांना कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
विधवा पेन्शन योजना लाभ कोणत्या महिलांना मिळतो:-
राज्यातील ज्या महिला विधवा आहे. जर त्या महिला लाभ घेण्यासाठी इच्छुक असतील तर त्या महिला या विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करून लाभ घेऊ शकतात. या विधवा पेन्शन योजना अंतर्गत देण्यात येत असलेली रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येत असते. Vidhwa Pension Yojana 2022 Maharashtra
महाराष्ट्र विधवा निवृत्तीवेतन योजना पात्रता तसेच अटी:-
● अर्ज करणारा अर्जदार हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा लागतो.
● अर्ज करणाऱ्या विधवा महिलेचे वय हे 65 वर्ष पेक्षा कमी असावे.
● कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 21000 पेक्षा जास्त नसले पाहिजे.
● अर्ज करणाऱ्या अर्जदार जवळ अधिकृत बँकेचे बँक खाते असले पाहिजे, ते बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असले आवश्यक आहे.
वरील सर्व पात्रता तसेच अटी ची पूर्तता होत असेल तर विधवा पेन्शन योजना साठी अर्ज हा करता येतो.
विधवा पेन्शन योजना अंतर्गत लाभ कोणते कोणते मिळतात:-
🛑 विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला ६०० रुपये इतकी रक्कम देण्यात येत असते.
🛑 जर विधवा पेन्शन योजना अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबात लाभार्थी महिलेला जर एकापेक्षा जास्त मुले असतील, तर त्या कुटुंबातील महिलेला प्रत्येक महिन्याला ९००/- रुपये इतकी रक्कम ही मदत म्हणून राज्य सरकार तर्फे देण्यात येत असते.
🛑जर लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विधवा महिलेला मुलगा नसेल फक्त मुलीच असतील तर, त्या महिलेची मुलगी ही २५ वर्षांची किंवा तिचे लग्न झाल्यापासूनही हा फायदा सुरूच राहील.
🛑या योजने अंतर्गत देण्यात येणार असलेली रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येत असते.
विधवा पेन्शन योजना आवश्यक कागदपत्रे:-
🛑अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असावे लागते.
🛑उत्पन्न दाखला जोडावा (income certificate)
🛑 बँक खाते पासबुक(bank passbook)
🛑पासपोर्ट फोटो
🛑मोबाइल नंबर (mobile number)
🛑 वय प्रमाणपत्र(age certificate)
🛑जातीचे प्रमाणपत्र cast certificate(अनुसूचित जाती जमातीची असल्यास )
🛑पती च मृत्यू प्रमाणपत्र
विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा? :-
विधवा पेन्शन योजना साठी अर्ज करण्याची पद्धत आपण पाहणार आहोत. विधवा पेन्शन योजना साठी अर्ज करावयाचा असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या विधवा पेन्शन योजना ही राज्य सरकार व केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असते. या विधवा पेन्शन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 600 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जात असतात.
या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला अर्ज डाऊनलोड करण्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करू शकतात. त्याची प्रिंट काढून तुम्हीं तो अर्ज तहसील कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालय इथे तुम्ही अर्ज करू शकतात.
विधवा पेन्शन योजना अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.