फॉक्सकॉन वेदांत प्रोजेक्ट काय आहे? माहिती मराठी | Vedanta Foxconn Semiconductor Project Information Marathi

 

आपल्या महाराष्ट्र राज्यात फॉक्सकॉन कंपनी आणि वेदांत कंपनी(Vedanta Foxconn Semiconductor Project) यांच्या संयुक्त विद्यमाने सेमीकंडक्टर प्लाँट उभारणारण्यात येणार होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यात सेमीकंडक्टर चीप बनविण्यात येणार होत्या, आजच्या या पोस्टमध्ये आपण फॉक्सकॉन प्रकल्प संदर्भातील विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

फॉक्सकॉन वेदांत प्रोजेक्ट काय आहे? माहिती मराठी | Vedanta Foxconn Semiconductor Project Information Marathi
फॉक्सकॉन वेदांत प्रोजेक्ट काय आहे? माहिती मराठी | Vedanta Foxconn Semiconductor Project Information Marathi

 

 

 

फॉक्सकॉन वेदांत प्रकल्प माहिती मराठी vedanta foxconn semiconductor plant information Marathi

आपल्या महाराष्ट्र राज्यात सेमीकंडक्टर प्लाँट उभारण्यात येणार असल्याची चर्चा होती. हा प्लाँट दोन देशातील कंपन्या एकत्र येऊन उभारणार होत्या. यामध्ये तायवानची कंपनी फॉक्सकॉन आणि मुंबईतील वेदांत कंपनी यांचा समावेश होता. हा प्रोजेक्ट खूप महत्वपूर्ण होता. या प्रोजेक्ट अंतर्गत सेमीकंडक्टर चीप बनविण्यात येणार होत्या. या फॉक्सकॉन प्रकल्पामुळे १ लाख नवीन रोजगार निर्माण होणार आहे. Vedanta Foxconn Semiconductor Plant mahiti marathi

 

 

 

आपल्या भारत देशातील वेदांत कंपनी आणि तायवान या देशाची फॉक्सकॉन(Foxconn Project Mahiti Marathi) ही इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मिळून हा सेमीकंडक्टर प्लांट उभारणार होते. हा सेमीकंडक्टर प्लांट १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून इतक्या रुपयांमध्ये हा प्लांट उभारण्यात येणार होता. या प्रकल्प अंतर्गत जॉइंट वेंचरचं डिस्प्ले एफएबी मॅन्युफॅक्चरिंग युनिट, सेमिकंटक्टर असेंबलिंग आणि टेस्टिंग युनिट हे उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हा प्रकल्प आपल्या देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एक हजार एकर क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. 60:40 या प्रमाणात भागीदारी करून हा प्रकल्प दोन्ही कंपन्या उभारणार आहे. या प्रकल्पामुळे देशाच्या आणि राज्याच्या जीडीपी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील स्थानिक इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना चालना मिळणार आहे. Vedanta Foxconn Semiconductor Project Information Marathi

 

 

हे नक्की वाचा:- लंपी व्हायरस काय आहे? लक्षणे, उपचार, प्रसार व प्रतिबंध

 

 

फॉक्सकॉन, वेदांत सेमीकंडक्टर प्लाँट सध्या चर्चेत का आहे?

फॉक्सकॉन, वेदांत सेमीकंडक्टर प्लाँट( Foxconn Project Information Marathi) हा आपल्या महाराष्ट्र राज्यात उभारण्यात येणार असल्याची चर्चा होती, परंतु आता हा प्लाँट गुजरात मध्ये उभारण्यात येणार आहे. गुजरात च्या अहमदाबादमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे सध्या हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात ला शिफ्ट झाल्यामुळे चर्चेत आहे.vedanta foxconn semiconductor plant know everything about project

 

 

अश्याच महत्वपूर्ण अपडेट सर्वात पहिल्यांदा जाणून घेण्यासाठी आमच्या Teligram Channel ला जॉइन होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

फॉक्सकॉन प्रोजेक्ट महत्वपूर्ण का आहे? Why is the Foxconn project important?

फॉक्सकॉन कंपनी आणि वेदांत कंपनी(Foxconn Vedanta Project) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेला फॉक्सकॉन सेमी कण्डक्टर हा प्रकल्प आपल्या भारत देशाला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात अग्रेसर बनवणारा होता. या प्रकल्पामुळे भारताची ओळख इलेक्ट्रॉनिक हब म्हणून होणार होती. सध्या बाजारात डिस्प्ले आणि सेमी कंडक्टर ला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे हा प्रकल्प आपल्या देशाला इलेक्ट्रॉनिक हब बनविणार आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे पुढील दोन वर्षात सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लाँट सेटअप करणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणी करिता सरकारच्या वतीने अनेक बाबींवर सबसिडी देण्यात येणार आहे. आपल्या भारत देशात सेमी कंडक्टरची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. आपल्या देशाला सेमीकंडक्टर चीप करिता तैवान आणि चीन सारखे देशावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे जर आपल्या भारत देशात सेमीकंडक्टर चीप बनल्या तर याचा फायदा आपल्या देशाला खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या निर्णयामुळे चीन आणि तैवान सारख्या देशावरील आपले अवलंबन कमी होणार आहे, आणि आपला देश इलेक्ट्रॉनिक हब बनेल. Foxconn Vedanta Plant Information Marathi

 

 

हे नक्की वाचा:- मोफत एसटी बस योजना; या नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवास 

 

फॉक्सकॉन प्रोजेक्ट बद्दल ही माहिती तुम्हाला आवडल्यास मित्रांना देखील शेअर करा. अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.