मित्रांनो सध्या आपल्या संपूर्ण भारत देशात लंपी व्हायरस चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा लंपि व्हायरस(Lampi Virus) चा धोका वाढलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या जनावरांचे या लंपी विषाणू पासून संरक्षण कसे करायचे? हे आपल्याला माहीत असले पाहिजे. या व्हायरस ची लक्षणे, उपचार, प्रसार व प्रतिबंध या विषयी विस्तृत माहिती (Lampi Virus Information Marathi) आपण जाणून घेणार आहोत. Lumpy Virus in Marathi,lampi virus mahiti marathi
लंपी व्हायरस काय आहे? Lampy माहिती मराठी, लक्षणे, उपचार, प्रसार व प्रतिबंध | Lumpi Virus in Marathi |
लंपी व्हायरस काय आहे? Lampi Virus in Marathi
लंपी व्हायरस(Lampi Virus) हा एक विषाणूजन्य त्वचारोग आहे, जो गो व महिष या वर्गातील जनावरांना होत आहे. हा आजार कॅप्री पॉक्स या विषाणू प्रवर्गातील आहे. लंपी हा आजार ज्या जनावरास होतो, त्या जनावरांच्या शरीरावर गोल आकाराच्या गाठी येतात. त्या कड्क गाठी असतात, लंपी हा आजार सर्व वयाच्या गाई व म्हशी यांना होत आहे. लहान जनावरांना हा आजार जास्त प्रमाणात होत आहे. हा आजार मानवास होत नाही, तसेच शेळ्या मेंढ्या यांना सुद्धा हा आजार होत नाही.Lampi Virus in Marathi,Lampi Virus Mahiti
लंपी आजार संक्रमण, प्रसार Lumpy Disease Infection, Spread
लंपी आजार ज्या जनावरास होतो, त्या जनावरांच्या रक्तात लंपी विषाणू हा 1 ते 2 आठवडे राहतो. लंपी या आजाराचा संक्रमण कालावधी हा 4 ते 14 दिवस असतो. हा विषाणु शरीराच्या सर्वच भागात पसरतो. हा आजार ज्या जनावरास होतो, त्या जनावरांपासून हा आजार दुसऱ्या जनावरास संक्रमण होऊन पसरतो. हा विषाणू जनावरांची लाळ, त्यांच्या डोळ्याला येणारे पाणी आणि नाकातील खाव यांच्या माध्यमातून जनावरांना देण्यात येत असलेल्या चारा खाद्य पाणी याच्या माध्यमातून दुसऱ्या जनावरांना होत आहे. जनावरांच्या वीर्यामधूनही या आजाराचे संक्रमण होत आहे. Lampi Virus in Marathi
लंपी आजार रोगाची लक्षणे Symptoms of Lumpy Disease
लंपी आजाराची जनावरांमध्ये खालील लक्षणे दिसतात.
1. ज्या जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रसार होतो त्या जनावरास 105 ते 106 फॅ. एवढा मध्यम ताप येतो. हा ताप जनावरांच्या शरीरामध्ये दोन ते तीन दिवस राहतो.
2. जनावरांच्या शरीरावर गाठी येतात, आणि चट्टे उमटतात या गाठी आणि चट्टे बऱ्याच काळात जनावरांच्या शरीरावर राहतात किंवा कायमचा राहू शकतात.
3. Lampi हा आजार झालेल्या जनावरांच्या तोंड, अन्न नलिका, श्वसन नलिका व फुफ्फुसामध्ये पुरळ व अल्सर तयार होतात.
4. Lampi हा आजार झालेल्या जनावरांच्या तोंडातून लाळ गळते. जनावरांच्या जननेंद्रियामध्ये तसेच मानेवर आणि पायावर सूज येते.
5. Lampi आजार ग्रस्त जनावरांना भूक कमी लागते त्यांच्यामध्ये अशक्तपणा निर्माण होऊन त्यांची वजन कमी होते.
6. लंपी आजार ग्रस्त जनावरांच्या डोळ्यांमध्ये जखमा होतात, तसेच त्यांच्या पायावर सूज निर्माण होते.
7. जे जनावर लंपी आजार ग्रस्त आहे, आणि गाभण म्हणजेच गरोदर आहे अश्या जनावरांचा गर्भपात होण्याची शक्यता आहे.
हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 जिल्हा निहाय यादी जाहीर
लंपी आजार माहिती मराठी Lampi Virus Information Marathi
लंपी(Lampy) हा आजार विषाणूजन्य संसर्गजन्य आहे. हा आजार जनावरांना एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात या लंपी आजाराचे प्रमाण वाढत असून धोका सुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे हा आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा हा आजार होऊ न देणे याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. कारण की आपल्याकडे जर जास्त जनावर असतील आणि त्यापैकी एका जनावराला सुद्धा हा आजार झाल्यास तो आजार तुमच्या सर्व जनावरांना होऊ शकतो, त्यामुळे आपण शक्यतो हा आजार आपल्या कोणत्या जनावराला होऊन न देणे याकडे लक्ष दिले पाहिजे. Lampi Virus in Marathi, Lampi Virus Information Marathi
लंपी आजारावरील उपचार Lumpy disease treatment
जर तुमच्या जनावरांवर लंपी विषाणूचे लक्षणे दिसल्यास किंवा हा आजार झाल्यास खालील प्रमाणे उपचार करायला पाहिजे.
1. लंपी हा आजार जनावरांमधील प्रतिकारशक्ती कमी करते त्यामुळे जनावरांच्या त्वचेवर गाठी येतात त्याचप्रमाणे प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे इतर जिवाणूजन्य आजारांची बाधा सुद्धा होऊ शकते त्यामुळे जनावरांना प्रतिजैविके देणे आवश्यक आहे. ही प्रतिजैविके पाच ते सात दिवस देण्यात यावी.
2. जनावरांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन A, विटामिन B आणि विटामिन E या औषधाचा उपचार द्यावा. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होईल.
3. बाधित जनावरांना मऊ आणि हिरवा चारा खायला द्यावा आणि जनावरांना पाण्याची कमतरता भासू देऊ नये.
4. जनावरांच्या त्वचेवर गाठी आणि फोडे झाल्यामुळे जनावरांवर मलम लावावा त्याचप्रमाणे अँटी हिस्टॅमिनिक औषधांचाही वापर करावा.
5. लंपी या रोगाची लक्षणे दिसतात बाधित जनावरांना तात्काळ इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे.
हे नक्की वाचा:- मुख्यमंत्री किसान योजना; आता शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 12,000 रुपये मिळणार
लंपी या रोगावरील लसीकरण Vaccination against Lumpy Disease
शासनाच्या वतीने लंपी(Lumpy) या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी(लाभ जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या वतीने राज्य सरकारांना लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या जनावरांना लंपी या रोगाची बाधा होण्यापूर्वी त्यांचे लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून आपल्या जनावरांना लंपी या रोगाचा धोका निर्माण होणार नाही. जनावरांना रोग होण्यापूर्वी आपल्या जनावरांना रोग न होऊ देण्याची दक्षता घेतली पाहिजे. गोट पॉक्स उत्तर काशी स्ट्रेन लस हे सध्या जनावरांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. Lampi Virus In Marathi, Lampi Virus Mahiti Marathi
हे नक्की वाचा:- जनावरांचा गोठा शेड बांधकाम अनुदान योजना अर्ज सुरू
मित्रांनो Lampi हा व्हायरस दिवसेंदिवस आपले मोठ्या प्रमाणात पाय पसरत आहे. म्हणजेच या विषाणूचा प्रसार हा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे सरकारने सुद्धा आता पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जनावरांना Lumpy Virus पासून सुरक्षित केले पाहिजे. लंपी व्हायरस संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना देखील शेअर करा. या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त ही माहिती इतरांना कळली पाहिजे आणि लोकं जागृत झाले पाहिजे.