घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड | Gharkul Yadi 2022 Maharashtra

 

मित्रांनो पी एम आवास योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीब लोकांना घरकुल देण्यात येत आहेत. ही घरकुल योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. जे व्यक्ती ग्रामीण भागात राहतात आणि ते घरकुल योजना अंतर्गत घरकुल मिळण्याची वाट पाहत आहेत, अश्या नागरिकांना आता खुशखबर मिळालेली आहे. घरकुल यादी 2022 महाराष्ट्र ( Gharkul Yadi 2022 Maharashtra) ही आता जाहीर झालेली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण घरकुल यादी 2022 पाहण्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत. घरकुल योजना यादी 2022, Gharkul Yadi 2022

घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड | Gharkul Yadi 2022 Maharashtra
घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड | Gharkul Yadi 2022 Maharashtra

 

घरकुल यादी 2022-23 महाराष्ट्र जाहीर:-

पंतप्रधान आवास योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या pm awas yojna gramin ची घरकुल यादी 2022-23 ही जाहीर करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी या योजने अंतर्गत घरकुल वितरित करण्यात येत असते. घर बांधण्यासाठी अनुदान देणारी ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. आता आपण Gharkul Yadi 2022 पाहण्याची प्रोसेस जाणून घेणार आहोत.

हे नक्की वाचा:- फळ पीक विमा योजना याद्या जाहीर

ज्या व्यक्तींनी ग्राम पंचायत अंतर्गत घरकुल योजना अंतर्गत अर्ज केले होते, आणि त्यांचा सर्वे करण्यात आला होता, अश्या नागरिकांना आता घरकुल योजना अंतर्गत अनुदान देण्यात येत आहेत. यापूर्वी सुद्धा घरकुल योजना अंतर्गत याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आणि आता घरकुल यादी 2022 जाहीर झालेली आहे.

घरकुल यादी 2022 डाऊनलोड करण्याची प्रोसेस Gharkul Yadi 2022-23 Download:-

Gharkul Yadi 2022 download करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये खाली दिलेली पी एम आवास योजना ची अधिकृत वेबसाईट ओपन करून घ्या.

घरकुल योजना वेबसाईट – https://pmayg.nic.in/

2. आता तुम्हाला नवीन dashbord हा दिसत असेल, त्या मध्ये तुम्हाला awaassoft या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
3. आता तुम्हाला report ह्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
4. आता तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यापैकी social audit report या पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
5. त्यानंतर घरकुल योजना पात्र यादी पाहण्यासाठी Beneficiary details for verification या ऑप्शन वर क्लिक करा.
6. आता तुम्ही या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्य वर क्लिक करा, त्या नंतर जिल्हा व तालुका हे सिलेक्ट करून घ्या.
7. आता तुम्हाला ज्या गावाची घरकुल यादी पहायची आहे, ते गाव इथे निवडा. त्यानंतर वर्ष 2022-23 वर क्लिक करा.
8. आता तुम्हाला पी एम आवास योजनेंतर्गत घरकुल यादी पाहण्यासाठी Pradhanmantri awas Yojana Gramin या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
9. त्यानंतर तुमच्या समोर गणितीय प्रक्रिया आहे, ते सोडवून त्याचे उत्तर खालच्या बॉक्स मध्ये लिहा, आणि submit या ऑप्शन वर क्लिक करा.

आता आपल्या समोर नवीन घरकुल योजना यादी 2022-23 ही दिसत असेल, ही यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी Download pdf या ऑप्शन वर क्लिक करून ती घरकुल यादी 2022-23 download करून घ्या.

हे नक्की वाचा:- घरकुल योजना अंतर्गत घरकुल मिळाले नाही, अशी करा तक्रार ऑनलाईन

जर तुमच्या गावची Gharkul Yadi 2023 जाहीर झालेली असेल,तर ती यादी आपण डाऊनलोड करू शकतात. याव्यतिरिक्त घरकुल यादी आपल्याला आपल्या गावाच्या ग्राम पंचायत मध्ये देखील उपलब्ध असते. घरकुल यादी ग्राम पंचायत मधून देखील आपण मिळवू शकतात.

अश्या प्रकारे आपण आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये आपल्या गावातील नवीन घरकुल यादी ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या डाऊनलोड करू शकतो. ही माहिती इतरांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment