आंबिया बहार फळ पिक विमा योजना निधी वितरित | Falpik vima 2022-23 Nidhi Vitarit

 

मित्रांनो आपल्या भारत सरकारच्या वतीने फळ पिक विमा योजना हे राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या फळ पिकांना संरक्षण प्रदान करण्यासाठी ही फळ पिक विमा योजना राबवण्यात येत असते. हवामानाच्या विविध धोक्यामुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई प्रदान करण्याकरिता ही फळ पिक विमा योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात आलेली होती. फळ पिक विमा योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी पिक विमा काढलेला होता, आणि ज्या फळ पिक पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले होते, अशा शेतकरी बांधवांना आता फळ पिक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने फळ पिक विमा योजना(Fal Pik Vima Yojana) करिता राज्य शासनाच्या शासनाच्या हप्त्याची रक्कम विमा कंपनीस वितरित केलेली आहे. ambiya bahar fal pik vima yojana

आंबिया बहार फळ पिक विमा योजना निधी वितरित | Falpik vima 2022-23 Nidhi Vitarit
आंबिया बहार फळ पिक विमा योजना निधी वितरित | Falpik vima 2022-23 Nidhi Vitarit

फळ पिक विमा 2022 कोणाला मिळणार?

ज्या फळ पीक(Fal Pik Vima) पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी वर्ष 2021 – 22 मध्ये त्यांच्या शेतांचा फळ पिक विमा काढलेला होता, अशा शेतकऱ्यांना ज्यांची नुकसान झालेली होती त्यांना फळ पीक विमा मिळणार आहे. फळ पीक विमा योजना अंतर्गत संत्रा, मोसंबी , काजू, डाळिंब , आंबा,  केळी, द्राक्ष व प्रायोचगीक तत्वावर स्ट्राबेरी या फळ पिकांचा ज्यांनी विमा काढलेला होता त्यांना फळ पिक विमा मिळणार आहे. 2021- 22 चा आंब्या बहराचा फळ पिक विमा मिळणार आहे.  fal pik vima 2022 yadi, fal pik vima list 2022-23

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई जिल्हा निहाय याद्या जाहीर 

आंबिया बहार फळ पीक विमा योजना:-

फळ पिक विमा(Fal Pik Vima 2022 Maharashtra) योजना अंतर्गत आंबिया(Fal Pik Vima Yojana Nidhi) बहराच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फळ पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने निधी जाहीर करण्यासंदर्भात शासन निर्णय काढलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये पिक विमा करिता रू.16.88 कोटी इतका निधी विमा कंपनीस देण्यात आलेला आहे.

आंबिया बहार फळ पिक विमा योजना अंतर्गत निधी वितरित करण्यासंदर्भातील शासन निर्णय आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे, शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही खाली लिंक वर क्लिक करून तो डाउनलोड करून घेऊ शकतात.

हे नक्की वाचा:- मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना आता शेतकऱ्यांना मिळणार 12,000 रुपये दरवर्षी

8 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

शासन निर्णय

अशाप्रकारे आता ज्या शेतकरी बांधवांनी वर्ष 2021-22 या कालावधीमध्ये फळ पिकांचा पिक विमा काढलेला होता, अशा शेतकरी बांधवांना निधी वितरित करण्यासंदर्भातील माहिती आपण जाणून घेतलेली आहे. ही माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि तुमच्या प्रश्नांची नक्कीच निरसन करू.