आणीबाणी पेन्शन योजना महाराष्ट्र, 10,000 रू मासिक पेन्शन | Aanibani Pension Yojana Maharashtra

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणीबाणीच्या काळात ज्या लोकांनी तुरुंगवास भोगलेला होता अशा लोकांसाठी आणीबाणी पेन्शन योजना सुरू केलेली आहे. या आणीबाणी पेन्शन योजना अंतर्गत 10,000 रू मासिक पेन्शन हे मिळणार आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण Aanibani Pension Yojana Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

आणीबाणी पेन्शन योजना महाराष्ट्र, 10,000 रू मासिक पेन्शन | Aanibani Pension Yojana Maharashtra
आणीबाणी पेन्शन योजना महाराष्ट्र, 10,000 रू मासिक पेन्शन | Aanibani Pension Yojana Maharashtra

आपल्या भारत देशात दिनांक 25.06.1975 ते दिनांक 31.03.1977  या कालावधीत आणीबाणी(emergency)  लागू केली होती. या Aanibani(Emergency) च्या काळात ज्या महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनी बंदिवास सोसला होता. त्या नागरिकांना आता आणीबाणी पेन्शन योजना (Anibani- Emergency Pension Yojana Maharashtra) अंतर्गत पेन्शन मिळणार आहे.

सन 1975 ते सन 1977 या कालावधीमध्ये आणीबाणीच्या काळात महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनी लढा दिला होता अशा नागरिकांचा सन्मान आणि गौरव हा या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा ही योजना चालू होती परंतु कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या अपेक्षित उत्पन्नात घट झाल्यामुळे ही योजना तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही आणीबाणी पेन्शन योजना 31 जुलै, 2020 रोजी बंद करण्यात आली होती. Aanibani Pension Yojana

परंतु योजना पुन्हा सुरू करण्याचा विचार हा राज्य सरकारचा होता. त्याच अनुषंगाने ही आणीबाणी पेन्शन योजना आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. या आणीबाणी पेन्शन योजना Aanibani Pension Yojana Maharashtra अंतर्गत सन 1975 ते 1977 या कालावधीमध्ये तुरुंगवास भोगणाऱ्या नागरिकांना ही योजना लागू होणार आहे. 01 ऑगस्ट 2022 पासून या आणीबाणी पेन्शन योजना महाराष्ट्र ची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे.

हे नक्की वाचा:- मिनी ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र

आणीबाणी पेन्शन योजना ( Aanibani Pension Yojana )

आणीबाणी पेन्शन योजना(Aanibani Pension Yojana 2022 Maharashtra) अंतर्गत ज्या व्यक्तींना यापूर्वी मानधन देण्यात येत होते, अशा व्यक्तींना आता मानधन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ही योजना बंद झाल्याच्या कालावधीच्या दरम्यान थकीत असलेले मानधन सुद्धा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला परंतु आणीबाणी पेन्शन योजना अंतर्गत अर्ज केलेला नाही, अशा व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नवीन अर्ज करता येणार आहे.

आणीबाणी पेन्शन योजना महाराष्ट्र अर्ज कुठे करायचा?Where to apply aanibani Pension Yojana Maharashtra?

ज्या व्यक्तींनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला होता, अशा व्यक्तींना आणीबाणी पेन्शन योजना लागू आहे, त्यामुळे अजून पर्यंत अर्ज केलेला नसेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. Aanibani Pension Yojana 2022

हे नक्की वाचा:- अटल पेन्शन योजना

आणीबाणी पेन्शन योजना अर्ज करण्याची अंतिम तारीख:-

आणीबाणी पेन्शन योजना(Aanibani Pension Yojana 2022) महाराष्ट्र अंतर्गत पात्र व्यक्तींना अर्ज हा 31/10/2022 पर्यंत करता येणार आहे. Anibani Pension Yojana Last Date ही 31 ऑक्टोबर 2022 आहे.

आणीबाणी पेन्शन योजना अंतर्गत किती पेन्शन मिळणार?

ज्या व्यक्तींनी आणीबाणीच्या(Anibani Pension Yojana) काळामध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता,  अशा व्यक्तींना खालील प्रमाणे पेन्शन मिळणार आहे. ज्या व्यक्तींनी आणीबाणीच्या काळामध्ये एका महिन्यापेक्षा जास्त तुरुंगवास भोगला होता अशा व्यक्तींना मासिक 10,000 रुपये पेन्शन ही मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीला 5,000 रुपये मासिक मानधन मिळणार आहे. ज्या व्यक्तींनी एका महिन्यापेक्षा कमी कारावास भोगला होता, अशा व्यक्तींना दर महिन्याला 5,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. आणि त्या व्यक्तीच्या पश्चात त्याच्या पत्नीला 2,500 रुपये पेन्शन मिळणार आहे.

हे नक्की वाचा:- अपंग पेन्शन योजना

 

आणीबाणी पेन्शन योजना अर्ज कुठे मिळेल?

या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला आणीबाणी पेन्शन योजना (Aanibani Pension Scheme Maharashtra) अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करावयाचा अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिलेला आहे. अर्ज डाऊनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो अर्ज डाऊनलोड करू शकतात. तो अर्ज तुम्ही प्रिंट करून घ्यावा, त्यानंतर त्या अर्जाला  व्यवस्थितपणे भरून सादर करू शकतात. किंवा तुम्ही तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालया मधून अर्ज मिळवू शकतात. त्या अर्जासोबत एक शपथपत्र सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे भरून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करावयाचे आहे.

अर्ज डाऊनलोड करा – येथे क्लिक करा

हे नक्की वाचा:- विधवा पेन्शन योजना

 

अशाप्रकारे आपण आजच्या या पोस्टमध्ये आणीबाणी पेन्शन योजना संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांना देखील शेअर करू शकतात.