अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र काय आहे? अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे | Apang Yojana Maharashtra

 

आजच्या या लेखामध्ये आपण अपंग पेन्शन योजना 2022 महाराष्ट्र या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र साठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागतात, पात्रता काय आहे? आणि लाभ काय मिळणार ? या विषयी सविस्तर माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळणार आहे, त्यामुळे ही पोस्ट शेवट काय नक्की वाचा.

 

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र काय आहे? अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे | Apang Yojana Maharashtra

 

 

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र :-

मित्रांनो आपले राज्य सरकार तसेच केंद्र सरकार हे देशातील तसेच राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल तसेच गरीब व गरजू आणि शारीरिक दृष्ट्या कमजोर लोकांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवित असते.

याच प्रकारातील एक योजना जी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील अपंग व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून सुरू करण्यात आलेली आहे. या Apang pention Yojana Maharashtra अंतर्गत राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा पेन्शन हे देण्यात येत असते. या अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र च्या अंतर्गत लोकांना पेन्शन मिळाल्यामुळे त्यांचे जीवनमान हे सुधारणार आहे. अपंग व्यक्ती हा परावलंबी असतात. ते स्वतः काम करू शकत नाहीत. त्यामुळेच आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागाकडून दिव्यांग पेन्शन योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आलेली आहेत. आपल्या राज्यातील अपंग व्यक्तींना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करता यावी यासाठी अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र ही एक महत्त्वाची योजना आहे. राज्यातील अपंग व्यक्तींना सन्मानाने जगता यावे यासाठी अपंग पेन्शन योजना ही महत्वपूर्ण ठरणार आहेत. अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र 2022, Apang Pention Yojana Maharashtra 2022

 

 

हे नक्की वाचा:- संजय गांधी निराधार योजना काय काय? अर्ज कसा करायचा.

 

या Apang pention Yojana 2022 Maharashtra च्या अंतर्गत पात्र असणाऱ्या अपंग लाभार्थ्यांना दर महिन्याला

600 ते 1000 रुपये इतकी रक्कम ही पेन्शन म्हणून देण्यात येत असते. जर तुम्ही सुद्धा पात्र असाल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखामध्ये खाली आपण अर्ज करण्याची पद्धत सुद्धा समजावून सांगितलेली आहे.

 

 

 

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र पात्रता:-

महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना(Handicapped Pension Scheme Maharashtra) अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता खालीलप्रमाणे आहेत.

१) अपंग पेन्शन योजना अंतर्गत अर्ज करणारा लाभार्थी हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो.

२) वयाची मर्यादा ही वर्ष १८ ते ६५ वर्षे यादरम्यान असावे लागते.

३) अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे एकूण वार्षिक उत्पन्न हे रुपये ३५,००० पेक्षा जास्त नसावे.

४) अर्ज करणारा अपंग व्यक्ती हा सरकारी कर्मचारी नसावा.

५) अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करणाऱ्या अपंग व्यक्तीचं अपंगत्व हे 40 टक्के पेक्षा जास्त असावे लागते.

 

 

 

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-

१) अर्जदाराचे आधार कार्ड

२) मोबाईल नंबर

३) अपंगत्व प्रमाणपत्र(४० % व त्यापेक्षा जास्त)

४) उत्पन्नाचा दाखला

५) ओळखपत्र

६) बँक पासबुक

७) वयाचा दाखला

८) पासपोर्ट साईज् चा फोटो

 

हे सुद्धा वाचा:- राष्ट्रीय वयोश्री योजना काय आहे? अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

वरील सर्व कागदपत्रे अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.

 

 

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारे लाभ :-

आपल्या महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत दर महिन्याला 600 ते 1000 रुपयांची आर्थिक मदत ही पेन्शन म्हणून देण्यात येत असते. Apang Yojana Maharashtra अंतर्गत देण्यात येणारी ही अपंग पेन्शन ही लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत असते.

 

 

अपंग पेन्शन योजना अर्ज कसा करायचा? ( How to apply for Apang Pention Yojana Maharashtra ) :-

 

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्यासाठी अपंग व्यक्तींना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्जदाराने त्यांच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला किंवा तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल. इथे लाभार्थ्यांना अर्ज मिळतो, तो अर्ज व्यवस्थित पद्धतीने अचूक भरावा लागेल त्यानंतर त्या अर्जाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज जमा करावा लागेल. अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी करण्यात येईल व त्या नंतर तुम्हाला अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र ची पेन्शन मिळणे सुरू होईल.

 

हे नक्की वाचा:- विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र