पी एम किसान सन्मान निधी योजना e-kyc अशी करा घरबसल्या | PM Kisan Samman Nidhi Yojana E-KYC Process Online

पी एम किसान सन्मान निधी योजना e-kyc अशी करा घरबसल्या | PM Kisan Samman Nidhi Yojana E-KYC Process Online

 

 

आजच्या या पोस्टमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत ई केवायसी ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या कशी करायची? याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आपल्या देशातील पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपये इतकी सन्मान राशी प्रदान करण्यात येत असते. आता या पी एम किसान योजना अंतर्गत पुढील हप्ते मिळण्याकरिता शेतकरी बांधवांनी Pm Kisan E-Kyc करणे बंधनकारक आहे.

 

एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आपण ई केवायसी स्वतः घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आधारे करू शकतो. PMKisan OTP Based eKYC. पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत ई केवायसी करण्याचे आवाहन हे वारंवार केंद्र तसेच राज्य सरकार करत आहे. त्याचप्रमाणे पी एम किसान ई केवायसी करण्यासंदर्भात नोटिफिकेशन सुद्धा पी एम किसान योजना अधिकृत पोर्टलवर करण्यात आलेले होते. आता पीएम किसान योजना अंतर्गत  pm kisan yojna e-kyc करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2022 आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ई केवायसी पूर्ण केलेली नसेल तर, खालील प्रमाणे प्रोसेस पूर्ण करून e kyc करून घ्यावी. pm kisan adhar base e kyc, pm kisan otp base e kyc

हे नक्की वाचा:- पीक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई करिता असा करा पीक विमा क्लेम 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना E-KYC करण्याची प्रोसेस (Pm Kisan E-Kyc Process)

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने eKYC करण्याची प्रक्रिया(pm kisan OTP Based eKYC)  खालील प्रमाणे आहे.

1. सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना च्या ऑफिसियल वेबसाईटवर जा.

वेबसाईटवर जाण्याकरिता येथे क्लिक करा.

2. आता या वेबसाईटवर तुम्हाला Farmers Corner हा पर्याय दिसेल. त्यामध्ये E KYC या ऑप्शन वर क्लिक करा.(PMKisan Aadhar eKYC)
3. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्यानंतर सर्च या ऑप्शन वर क्लिक करा.
4. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे.
5. आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येणार आहे, त्याकरिता तुम्हाला Get OTP या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
6. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी प्रविष्ट करून सबमिट करायचा आहे.
7. आता तुमची pm kisan e-kyc ची pm kisan adhar base e kyc ही पूर्ण झालेली आहे. pm kisan e-kyc पूर्ण झाल्या नंतर “Ekyc has been done successfully.” असा एसेमेस तुम्हाला आलेला असेल.

हे नक्की वाचा:- असा करा सातबारा उतारा दुरुस्त ऑनलाईन

 

 

टीप:- pm kisan e-kyc स्वतः ऑनलाईन करायची असेल तर तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे. जर नसेल तर तुम्ही CSC सेंटर वर जाऊन बायोमेट्रिक ई केवायसी पूर्ण करून घेऊ शकतात.

अशा पद्धतीने आपण पीएम किसान सन्मान निधी योजना(PM KISAN E-KYC ) घरबसल्या पूर्ण करू शकतो. ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.