पी एम किसान योजना ई केवायसी मुदतवाढ | PM Kisan E-Kyc Date Extended

पी एम किसान योजना ई केवायसी मुदतवाढ | PM Kisan E-Kyc Date Extended

 

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकरी बांधवांसाठी निश्चित उत्पन्न मिळवून देणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत देशातील सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना 2 हजार रुपये प्रति हत्याप्रमाणे वर्षाला तीन हप्ते म्हणजेच एकूण ६०००/- प्रती वर्ष सन्मान निधी म्हणून देण्यात येत असतो. पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या वतीने देशातील शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ सुरू करण्यात आलेली महत्वपूर्ण योजना आहे. आता या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना लाभ घेण्याकरिता PM Kisan E-Kyc करणे अनिवार्य आहे. यापुढे ज्या शेतकऱ्यांची प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ई केवायसी पूर्ण नसेल अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत ई केवायसी(PM KISAN E-KYC) करण्याकरिता मुदत वाढ ही देण्यात आलेली आहे.

 

पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये हे थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत असतात. पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत डुप्लिकेट तसेच अपात्र लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवणे तसेच पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत सहज लाभ मिळाला पाहिजे याकरिता केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ई केवायसी(Pm Kisan E-Kyc) करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

 

पी एम किसान सन्मान निधी योजना ई केवायसी अंतिम तारीख:-

पी एम किसान सन्मान निधी योजना (Pm kisan sanman nidhi yojana) अंतर्गत E-KYC करण्याकरिता मुदत वाढ देण्यात आलेली , यापूर्वी केंद्र शासनाच्या वतीने पी एम किसान योजना ई केवायसी करण्याकरिता अंतिम तारीख ही 31 जुलै 2022 होती. परंतु आता पी एम किसान योजना ई केवायसी मुदत वाढ मिळाल्यामुळे आता Pm Kisan E-Kyc laste Date ही 31 ऑगस्ट 2022 आहे.

हे नक्की वाचा:- पी एम किसान सन्मान निधी योजना E-KYC घरबसल्या कशी करायची? संपूर्ण माहिती 

 

पी एम किसान योजना ई केवायसी:-

पी एम किसान इ केवायसी आपण csc सेंटर वर जाऊन करू शकतो. त्याचप्रमाणे आपण स्वतः सुद्धा पीएम किसान योजना अंतर्गत ई केवायसी करू शकतो. पी एम किसान योजना ई केवायसी करताना लाभार्थ्याच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबर वर ओटीपी येतो ओटीपी ची पडताळणी करून आपण सहज रित्या ई केवायसी करू शकतो.(Pm Kisan E-Kyc date extended)

 

हे नक्की वाचा:- रोजगार हमी योजना अर्ज सुरू

 

पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना आता पुढील हप्ते मिळवण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक असल्यामुळे, ज्या शेतकरी बांधवांनी अजून पर्यंत PM Kisan E-Kyc केलेली नसेल त्यांनी 31 ऑगस्ट 2022 पूर्वी आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ई केवायसी करण्याकरिता वारंवार केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ई केवायसी संदर्भातील ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याकरिता शेअर करा.