मेरी पेहचान पोर्टल असे करा रजिस्ट्रेशन | MeriPehchaan Portal Registration Process

 

मित्रांनो नवीन मेरी पेहचान पोर्टल हे लॉन्च झालेले आहे. विविध सरकारी सेवांचा लाभ घेण्याकरिता आपण या मेरी पेहचान पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून लाभ घेऊ शकतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण MeriPehchaan Portal Registration Process विषयी संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. meri pehchan portel information Marathi

मेरी पेहचान पोर्टल असे का रजिस्ट्रेशन | MeriPehchaan Portal Registration Process
मेरी पेहचान पोर्टल असे का रजिस्ट्रेशन | MeriPehchaan Portal Registration Process

 

मेरी पेहचान पोर्टल हे जन परिचय, ई-प्रमान आणि डिजीलॉकर या तीन प्लॅटफॉर्मचे व्यापक सहकार्य करून तयार करण्यात आलेले आहे. या मेरी पेहचान पोर्टलच्या माध्यमातून आपण फ्री मध्ये आयडी बनवून विविध सरकारी योजनांचा एकाच ठिकाणाहून लाभ मिळवू शकतो. घरबसल्या आपण सर्व सरकारी कामे करू शकतो. या पोस्टमध्ये आपण समोर फ्री मध्ये आयडी कशी मिळवायची हे पाहणार आहोत. मेरी पेहचान हे  National single sign on पोर्टल आहे.

या मेरी पहचान(meri pehchan portel mahiti marathi) पोर्टलच्या अंतर्गत अनेक शासकीय सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. जर आपल्याकडे मेरी पेहचान पोर्टलचा आयडी पासवर्ड असेल तर आपण विविध शासकीय सेवांचा लाभ सहजरित्या मिळवू शकतो. या पोर्टलमुळे आपला वेळ आणि पैसा वाचणार आहे.

हे नक्की वाचा:- आपले सरकार सेवा केंद्र (CSC Centre) काय आहे? कसे मिळवायचे?

मेरी पेहचान पोर्टल रजिस्ट्रेशन प्रोसेस | Meri Pehchaan Portel Registration Process

मेरी पेहचान(Meri Pehchaan Portel) पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याचप्रमाणे मेरी पेहचान आयडी पासवर्ड मिळवण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

1. सर्वप्रथम मेरी पेहचान पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा.

ऑफिशियल वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

2. आता या ठिकाणी तुम्हाला लॉगिन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी आपण जन परिचय, ई-प्रमान आणि डिजीलॉकर यापैकी कुठल्याही एका पद्धतीने लॉगिन करू शकतो. पण तू जर आपल्याकडे हे नसेल तर आता आपल्याला रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागेल.
3. मेरी पेहचान रजिस्ट्रेशन करण्यासाठी Register Now या ऑप्शन वर क्लिक करा.
4. आता आपल्यासमोर मेरी पेहचान रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे.
5. आता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
6. मोबाईल नंबर टाकून Generate otp या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी आलेला असेल.
7. त्यानंतर खालील बॉक्समध्ये आलेला ओटीपी प्रविष्ट करा. आणि verify otp या पर्यायावर क्लिक करा. आता तुमचा ओटीपी सक्सेसफुली व्हेरिफाय झालेला असेल.
8. आता तुम्हाला Given name मध्ये तुमचं नाव टाकायचं आहे.
9. त्यानंतर खाली युजरनेम आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर पासून पुन्हा टाकून कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे.
10. आता तुम्ही तुमचे जेंडर सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमची जन्मतारीख प्रविष्ट करा. तुम्ही पर्सनल मेसेज सुद्धा सेट करू शकता.
11. आता दिलेल्या टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करून घ्या, आणि Sign Up या पर्यायावर क्लिक करा.

हे नक्की वाचा:- आधार कार्ड केंद्र अर्ज प्रक्रिया

अशाप्रकारे आपण मेरी पेहचान पोर्टलवर (meri pehchaan portel information Marathi) रजिस्ट्रेशन करू शकतो. आता आपण युजरनेम आणि पासवर्ड टाकून लगीन करू शकतो. किंवा बऱ्याच जणांकडे डिजीलॉकर असेल आपण या ठिकाणी डिजीलॉकर द्वारे सुद्धा लॉगिन करू शकतो. आता आपण मेरी पेहचान पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. यामध्ये आपल्याला शासनाच्या अनेक सेवा, सुविधा व योजना दिसत असतील. डाव्या बाजूला ऑल सर्विसेस या ऑप्शन वर क्लिक करून आपण शासनाच्या सर्व सेवा या ठिकाणी पाहू शकतो. तसेच प्रत्येक राज्यानुसार उपलब्ध असणाऱ्या सेवा सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपण महाराष्ट्र या ऑप्शनवर क्लिक करून महाराष्ट्र राज्याच्या सर्व सेवा या ठिकाणी पाहू शकतो आणि त्यांचा लाभ घेऊ शकतो. सध्या हे पोर्टल नवीन आहे यामध्ये बऱ्याच सेवा आणखीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment