अटल पेन्शन योजना काय आहे? Atal Pension Yojana 2022 Information Marathi

अटल पेन्शन योजना काय आहे? Atal Pension Yojana 2022 Information Marathi

 

 

केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणार येत असलेली अटल पेन्शन योजना ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. ही योजना असंघटित क्षेत्रातील लोकांना पेन्शन पुरविणारी योजना आहे. आता या अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana 2022) मध्ये महत्वपूर्ण बदल केलेले आहेत. आता अटल पेन्शन योजना मध्ये कर भरणाऱ्यांना सहभागी होता येणार नाही. त्यामुळे आता करदात्यांना सहभागी होता येत नसल्यामुळे त्यांना मोठा झटका बसला आहे. आता या अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme 2022) मध्ये आयकर भरणाऱ्याना आता १ ऑक्टोबर २०२२ पासून सहभागी होता येणार नाही. या संबंधी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचना देखील जाहीर केलेली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण अटल पेन्शन योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत.

 

Table of Contents

 

अटल पेन्शन योजना काय आहे? (Atal Pension Yojana Information Marathi)

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) ही केंद्र सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. ही योजना असंघटित क्षेत्रातील लोकांना पेन्शन पुरविणारी ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या अटल पेन्शन योजना अंतर्गत लाभार्थ्यास ६० वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येक महिन्याला 1 हजार रुपये ते 5 हजार रुपये पेन्शन मिळत असते. या करिता तुम्हाला या अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana Mahiti Marathi) मध्ये गुंतवणूक करावी लागते. गुंतवणूक ही किमान २० वर्षे असावी लागते.

 

अटल पेन्शन योजना(Atal Pension Yojana Information Marathi) अंतर्गत १८ वर्षे ते ४० वय असलेल्या वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करून पेन्शन मिळवू शकतात. जर एखाद्या अटल पेन्शन योजना लाभार्थ्यांनी या योजनेत 40 व्या वर्षी सहभाग हा नोंदविला तर त्या व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 292 रुपये ते 1454 रुपये इतकी गुंतवणूक करावी लागते. या योजने अंतर्गत आपण जेवढे जास्त मासिक गुंतवणूक करू, तेवढी जास्त आपल्याला पेन्शन मिळेल.

 

 

हे नक्की वाचा:- संजय गांधी निराधार पेन्शन योजना

 

 

या Atal Pension Yojana योजने अंतर्गत सहभागी खाते धारकाचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या जोडीदाराला समान पेन्शन ही देण्यात येत आहे. आणि जर दोघांचाही मृत्यू झाला तर ज्या व्यक्तीला नामनिर्देशित केले आहे. त्यांना पेन्शन रक्कम ही परत करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत जर सहभागी लाभार्थ्यांच्या त्याची 60 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच मृत्यू झाल्यास त्या सहभागी लाभार्थ्यांचा जोडीदार ही रक्कम भरून योजना पुढे सुरू ठेवू शकतो.

 

 

अटल पेन्शन योजना 2022 बदल

आता या अटल पेन्शन योजना 2022 मध्ये १ ऑक्टोबर पासून कर भरणाऱ्या सहभागी होता येणार नाही. त्याच प्रमाणे जर जर एखादा ग्राहक १ ऑक्टोबर किंवा त्यानंतर या योजनेत सहभागी झाला आणि जर तो आयकरदाता निघाल्यास त्याला या योजने अंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. त्या व्यक्तीचे खाते बंद करून त्या व्यक्तीने जमा केलेली पेन्शन रक्कम त्यांना परत केली जाईल. ज्या व्यक्तींना सेवा निवृत्ती( 60 वर्ष) नंतर उत्पन्नाचा स्रोत नाही, अश्या व्यक्तींना या योजने अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

 

 

हे नक्की वाचा:- अपंग पेन्शन योजना संपूर्ण माहिती 

 

अटल पेन्शन योजना हप्ता कसा भरणार?

या अटल पेन्शन योजना(Atal Pension Yojana Mahiti Marathi) अंतर्गत सहभागी गुंतवणूकदार हे मासिक, त्रैमासिक किंवा अर्ध-वार्षिक पद्धतीने गुंतवणूक करू शकतात. म्हणजेच हप्ता हा आपण प्रत्येक महिन्याला किंवा 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला हप्ता भरू शकतो. या योजने अंतर्गत सहभागी झाल्यास हप्ता म्हणजेच गुंवणुकीचे पैसे हे तुमच्या बँक खात्यातून ॲाटो-डेबिट केले जाईल.

 

 

 

अटल पेन्शन योजना खाते कसे उघडणार?

अटल पेन्शन योजना(Atal Pension Yojana Information Marathi) अंतर्गत लाभ घेण्यासाठी आपण कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत जाऊन आपले अटल पेन्शन योजना खाते उघडून त्यामध्ये गुंतवणूक करून निवृत्ती नंतर पेन्शन मिळवू शकतो. आत्ता पर्यंत या अटल पेन्शन योजना अंतर्गत  ४ कोटीं पेक्षा जास्त खाती उघडण्यात आलेली आहे.

 

 

अश्या प्रकारे अटल पेन्शन योजना ही राबविण्यात येत आहे, आणि या अटल पेन्शन योजना अंतर्गत आता नवीन बदल सुद्धा करण्यात आलेले आहे. ही माहिती महत्वपूर्ण वाटत असल्यास नक्की शेअर करा.