प्रधानमंत्री आवास योजना- शहरी “सर्वांसाठी घरे” अभियान 2024 पर्यंत मुदतवाढ | Sarvansathi Ghare Abhiyan

प्रधानमंत्री आवास योजना- शहरी “सर्वांसाठी घरे” अभियान 2024 पर्यंत मुदतवाढ | Sarvansathi Ghare Abhiyan

 

 

मित्रांनो केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणारे “सर्वांसाठी घरे” हे अभियान आता 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये “सर्वांसाठी घरे” अभियान ला आता 31 डिसेंबर 2024 पर्यंत. वाढविण्यास मंजुरी दिलेली आहे.

 

 

नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक ही आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली, त्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना-शहरी हे आता 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. आता ही योजना पुढे सुरू ठेवण्याकरिता भारत सरकारच्या वतीने प्रेस नोट सुद्धा काढण्यात आलेली आहे. त्याच 2022 पर्यंत प्रस्तावित सर्व घरांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 

 

हे नक्की वाचा:- पी एम आवास योजना 2022 नवीन घरकुल यादी जाहीर 

 

या प्रधानमंत्री आवास योजना– शहरी आंतर्गत संपूर्ण देशातील पात्र शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना पक्की घरे बांधण्यासाठी अनुदान हे देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत 2017 मध्ये 102 लाख घरे बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे काही घरांसाठीचे प्रस्ताव हे उशिरा प्राप्त झाल्यामुळे आता या प्रधानमंत्री आवास योजना- शहरी योजनेला 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आत्ता पर्यंत केंद्र सरकारच्या वतीने 31 मार्च 2022 पर्यंत 1,18,020.46 कोटी रुपये इतका निधी हा उपलब्ध करुन दिला आहे. आणि अंजून पुढे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत 85,406 कोटी रुपये इतका निधी हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

 

ही योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आत्ता पर्यंत 2.03 लाख कोटी रुपये इतका निधी हा खर्च केला आहे. प्रधानमंत्री आवास योजना- शहरी मुळे शहरी भागात राहणाऱ्या तसेच स्वतःची पक्की घरे नसलेल्या नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळत आहे. त्यामुळे आता या योजनेचा कालावधी वाढवल्यामुळे आता शहरी भागातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

 

ही माहिती महत्वपूर्ण वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला