PM Kisan yojana ही आपल्या देशातील केंद्र शासनाच्या अंतर्गत चालवण्यात येणारी एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत आपल्या देशातील शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रूपयांची मदत ही करण्यात येत असते. दर चार महिन्याला दोन हजार रुपयाचा एक हप्ता असे तीन हप्ते एका वर्षाला म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये मदत हे शेतकरी बांधवांना या PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत करण्यात येत असते.PM Kisan
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना; संपूर्ण माहिती | pm kisan yojana details
|
केंद्र शासनाच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या या प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना मध्ये शेतकऱ्यांना नोंदणी केल्यानंतर वर्षाला सहा हजार रुपये मदत देण्यात येत आहे. या पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत आत्तापर्यंत शेतकरी बांधवांना एकूण दहा हप्ते ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. आता पुढील 11 वा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये थेट ट्रान्सफर करण्यात येणार आहे. PM Kisan 11th Installment Date
पीएम किसान सम्मान निधि योजना नोंदणी:-
पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी नोंदणी करावयाची असल्यास तुम्ही तुमच्या तहशिल केंद्रामध्ये किंवा तलाठी कार्यालयात संपर्क करून नवीन नोंदणी करू शकतात. तसेच csc सेंटर वर जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात.
हे नक्की वाचा:- कृषी कर्ज मित्र योजना
जर तुम्हाला स्वतः नोंदणी करायचे असल्यास.
सर्वात प्रथम पीएम किसान सम्मान निधि योजना च्या खालील अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
Pmkisan.gov.in
आता तुमच्या समोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये तुम्ही माय कॉर्नर या ऑप्शनवर क्लिक करा. तिथे नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा. नोंदणीचा फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर तलाठी कार्यालयात जाऊन तलाठी यांना भेट देऊन इतर आवश्यक कागदपत्रे जमा करा.
जर तुम्ही पात्र ठरलात तर तुमचे नाव पात्र पी एम किसान यादी मध्ये समाविष्ट केले जाते
PM Kisan योजने साठी पात्रता:-
पीएम किसान सम्मान निधि योजना ही एक शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना असल्यामुळे आपल्या देशातील कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबांना या योजने अंतर्गत लाभ मिळविता येतो. कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले होय. कुटुंबातील एका लाभार्थ्यास लाभ मिळतो.
हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र २०२२
पीएम किसान योजनेचे स्टेटस असे तपासा?
पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नोंदणी केल्या नंतर तुमच्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
१) पी एम किसान सन्मान निधी योजना ची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ओपन करा.
२) आता या संकेतस्थळामध्ये ’माय कॉर्नर’ हा पर्याय निवडा.
३) आता तुम्हाला लाभार्थी स्टेटस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
४) आता आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक भरा व नंतर खालील कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ’डेटा प्राप्त करा’ या पर्यायावर क्लिक करा.
५) आता तुमच्या समोर स्टेटस आले असेल.
हे नक्की वाचा:- बांधकाम कामगारांसाठी तीन नवीन योजना सुरू
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आता PM Kisan Yojana KYC करणे आवश्यक आहे. पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत येणारे पुढील हप्ते मिळविण्यासाठी केवायसी करणे आवश्यक झाले आहेत. केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे की, लाभ घेण्यासाठी pm Kisan kyc आवश्यक आहे. Pm kisan sanman nidhi yojana अंतर्गत ११ वा हप्ता मिळविण्यासाठी kyc करणे आवश्यक आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना ई-केवायसी कशी करायची:-
पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी e-kyc करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.
१) सर्वप्रथम Pmkisan.gov.in ही पी एम किसान ची वेबसाईट ओपन करा.
२) आता त्या वेबसाईट मध्ये eKYC हा पर्याय निवडा.
३) आता तुमचा आधार कार्ड नंबर आणि तिथे दिसत आलेला कॅप्चा कोड टाका. आता सर्च करा.
४) मोबाईल नंबर एंटर करा. आणि मोबाईल वर आलेला otp टाका. आणि सबमिट वर क्लिक करा.
आता तुमची pm Kisan yojana e-kyc पूर्ण झालेली आहे.
हे नक्की वाचा:- जिल्हा परिषद योजना २०२२
अश्या पद्धतीने आपण आजच्या पोस्ट मध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना विषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटत असल्यास नक्की शेअर करा.