दुधाळ जनावरे वाटप योजना अंतर्गत 2022-23 करिता दुधाळ जनावरे (गाई-म्हशी) वाटप अर्ज सुरू झालेले आहेत. या योजने अंतर्गत दुधाळ जनावरे वितरण करण्यासाठी पॅनल तयार केले जात आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा जनावरे पुरवठादारांनी अर्ज करायचे आहेत. पशुसंवर्धन विभाग कोल्हापूर यांच्या अंतर्गत ही दुधाळ जनावरे वाटप अर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसंबंधी अर्ज करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे.Dudhal Janavare Arj Suru
दुधाळ जनावरे वाटप अर्ज सुरू, पशुसंवर्धन योजना | Dudhal Janavare Arj Suru |
दुधाळ जनावरे वाटप योजना अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख :-
या दुधाळ जनावरे वाटप(Dudhal Janavare Arj Suru) योजना अंतर्गत अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामध्ये करावयाचे आहेत. हे अर्ज जिल्ह्यातील जनावरे पुरवठादारांनी करायची आहे. दुधाळ जनावरे वाटप(Gay Mhais Yojana Maharashtra) योजना अंतर्गत अर्ज हे 8 सप्टेंबर पर्यंत करायचे आहे. संबंधित पुरवठादारांनी दुधाळ जनावरे वाटप (Gay Mahis Yojana Maharashtra) योजना पॅनल करिता तीस दिवसाच्या आत अर्ज करायचे आहेत. अर्जाचा नमुना हा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, कोल्हापूर येथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
हे नक्की वाचा:- पशू संवर्धन विभाग गाय, म्हैस, शेळी मेंढी पालन योजना
दुधाळ जनावरे वाटप योजना पॅनलसाठी निकष:-
1. दुधाळ जनावरे वाटप योजना(Dudhal Janavare Yojana) अंतर्गत पॅनलसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे जनावरे खरेदी आणि विक्री करण्याचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
2. दुधाळ जनावरे वाटप(Gay Mhais Watap Yojana Maharashtra) योजना अंतर्गत अर्ज करणारा पुरवठादार हा व्यक्ती/संस्था/कंपनी/ फार्म असू शकतो.
3. दुधाळ जनावरे वाटप योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या पुरवठादार कडे जनावरांच्या बाजारात सर्वांना कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत मिळालेला असायला पाहिजे.
4. दुधाळ जनावरे वाटप योजना अंतर्गत पुरवठादार यांनी सुद्धा जनावरांचा पुरवठा हा शासन ज्या दराने मंजूर करतील त्याच दराने करावा लागेल. जर वाढीव किमतीने जनावरांची खरेदी करण्याचे समितीने ठरवले असेल तर उर्वरित अधिकची रक्कम लाभार्थ्यांकडून वसूल करावी.
5. दुधाळ जनावरे वाटप योजना अंतर्गत जर पुरवठा दाराने अयोग्य जनावरे वाटप केल्यास अशा पुरवठा दाराचा करार रद्द करून त्याला काळया यादीत समाविष्ट करण्यात येईल.
6. जर एखाद्या पुरवठा दाराने दुधाळ जनावरांचा पुरवठा विहित कालावधीत केला नाही आणि दुसरा पुरवठादार हा दुधाळ जनावरांचा पुरवठा मंजूर दराने विहित कालावधीत करण्यास तयार असेल तर त्या पुरवठादाराकडून दुधाळ जनावरांची खरेदी करण्यात येईल.
7. दुधाळ जनावरे वाटप योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या पुरवठा दाराने 2018-19 आणि 2019-20 आणि 2020-21 चे आयकर विवरण पत्र हे सादर करणे आवश्यक आहे.
8. दुधाळ जनावरांचे लाभार्थ्यांना वाटप करताना पुरवठा दाराने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहेत.
9. पुरवठा दाराकडे दरवर्षी कमीत कमी 25 लाखांच्या दुधाळ जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार केला असल्याचा दाखला पाहिजे. त्याचप्रमाणे पुरवठा दाराला मागील तीन वर्षांमध्ये दुधाळ जनावरांच्या खरेदी केल्याबाबतची कागदपत्रे सादर करावी लागतात.
10. पुरवठा दराने दुधाळ जनावरांच्या संबंधित खर्च स्वतः करावा तसेच पुरवठ्याची साखळी ही अबाधित राहावी याकरिता जर आवश्यकता पडली तर इतर राज्यातून देखील दुधाळ जनावरे खरेदी करण्याची व्यवस्था पुरवठादारांनी करायला हवी.
11. दुधाळ जनावर योजना अंतर्गत दुधाळ जनावरे पुरवणाऱ्या पुरवठा दार यांनी विहित कालावधीत पुरवठा करणे बंधनकारक आहेत. जर पुरवठा दाराने विहित कालावधीत दुधाळ जनावरांचा पुरवठा न केल्यास त्याला दंड आकारण्यात येईल.
12. दुधाळ जनावरांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठा दाराला राज्य शासनाची तसेच केंद्र शासनाचे असणारे टॅक्स हे स्वतः भरावे लागतील.
13. दुधाळ जनावर वाटप योजना अंतर्गत पुरवठादारांनी लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचा पुरवठा केल्यानंतर त्याचे देयक/ बिल हे प्रिंटेड आणि अधिकृत स्वरूपाचे असायला पाहिजे.
ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.