खरीप पीक विमा योजना 2022 महाराष्ट्र निधी वितरीत | Kharip Pik Vima Yojana 2022 Nidhi Vitarit

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला संरक्षण प्रदान करणे करिता प्रधानमंत्री पिक विमा योजना ही राबविण्यात येत आहे. या प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा योजनेचे फॉर्म हे भरलेले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी खरीप पिक विमा योजना 2022 (Kharip Pik Vima Yojana 2022) अंतर्गत अर्ज केलेले होते, अशा शेतकऱ्यांनी आपल्या पिक विमा नुकसानीचे दावे हे पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने केलेले आहे.

 

खरीप पीक विमा योजना 2022 महाराष्ट्र निधी वितरीत | Kharip Pik Vima Yojana 2022 Nidhi Vitarit
खरीप पीक विमा योजना 2022 महाराष्ट्र निधी वितरीत | Kharip Pik Vima Yojana 2022 Nidhi Vitarit

 

 

त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी Kharip Pik Vima Yojana 2022 अंतर्गत पीक विमा क्लेम केलेले आहेत, अशा शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातच आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांकरिता आनंदाची बातमी प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाच्या वतीने पीक विमा करिता भरायची राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम (50 टक्के रक्कम) ही आगाऊ स्वरूपात विमा कंपनीस वितरित केलेले आहे. यासंबंधी जीआर हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे.

 

 

हे नक्की वाचा:- शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची दुप्पट रक्कम

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 842,17,84,541/  इतकी रक्कम पिक विमा हप्ता अनुदानापोटी विमा कंपन्यास वितरित केलेली आहे. kharip Pik vima yojana 2022 आपल्या महाराष्ट्र राज्यात पाच विमा कंपन्यांमार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरील निधी पीक विमा कंपन्यांना (Kharip Pik Vima Yojana 2022) वितरित केल्यामुळे आता शेतकरी बांधवांना 25 टक्के पिक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पिक विमा कंपन्या लवकरात लवकर त्यांना मिळालेली रक्कम ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता आणि त्यांचे नुकसान झालेले आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करील अशी अपेक्षा आहे.kharip pik vima 2022, Maharashtra Kharip Pik Vima Yojana 2022

 

 

हे नक्की वाचा:- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरि 15 हजार रुपये अनुदान मंजूर

 

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, आयसीआयसीआय लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषी विमा कंपनी या पाच पिक विमा कंपन्या मार्फत आपल्या महाराष्ट्र राज्यात खरीप पीक विमा योजना ही राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज प्रकाशित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची लिंक खाली दिलेली आहे. Kharip Pik Vima Yojana 2022 Nidhi Vitarit

 

GR Download करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अशा पद्धतीने आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिक विमा कंपन्यांना राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. त्यामुळे नुकसान ग्रस्त पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना लवकरच 25% पिक विमा मिळेल अशी अपेक्षा आहे.