गणेश चतुर्थी 2022 तारीख, शुभ मुहूर्त | Ganesh Chaturthi 2022 Date, Shubh Muhurt

 

गणेश चतुर्थी आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी करीत असतो. गणेश चतुर्थी हा सण पवित्र सण आहे. हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्लपक्ष असणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी साजरा करण्यात येत असतो. गणेश चतुर्थीच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. आपल्या संपूर्ण भारत देशात गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या घरांमध्ये गणपतीची स्थापना करीत असतो. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असते. संपूर्ण भारत देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने आपण गणेशोत्सव साजरा करीत असतो. गणेशोत्सव दहा दिवसांचा देखील असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना करण्यात येत असते. तसेच अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असतो. म्हणजेच अनंत चतुर्थीला मूर्तीची विसर्जन ही करण्यात येत असते.गणपती स्थापना मुहूर्त 2022 मराठी ganesh chaturthi 2022 information marathi

 

गणेश चतुर्थी 2022 तारीख, शुभ मुहूर्त | Ganesh Chaturthi 2022 Date, Shubh Muhurt
गणेश चतुर्थी 2022 तारीख, शुभ मुहूर्त | Ganesh Chaturthi 2022 Date, Shubh Muhurt

 

 

 

 

गणेश चतुर्थी 2022 तारीख (Ganesh Chaturthi 2022 Date):-

 

वर्ष 2022 मध्ये गणेश चतुर्थी ही (Ganesh Chaturthi 2022 ) ही 31 ऑगस्टला आहे. बुधवार या दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थी च्या दिवशी या वर्षी गणेश चतुर्थी 2022 आहे. आपल्या भारत देशात परंपरेनुसार आपण आपल्या घरामध्ये दहा दिवस, सात दिवस, पाच दिवस, तीन दिवस किंवा दीड दिवस या दिवसांच्या प्रकारात आपण आपल्या घरात गणपती बाप्पा बसवत असतो. श्री गणेशाला अनेक नावे आहेत. तो मंगलमूर्ती आहे, तो विघ्नहर्ता आहे जर आपल्यावर श्री गणपती बाप्पाची कृपा असेल तर आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होत असतात. त्याचप्रमाणे आपले जीवन हे आनंदी व सुख समृद्धीचे होत असते. Ganesh Chaturthi 2022 Date

 

गणेश चतुर्थी तिथी, वेळ व मुहूर्त:-

Ganesh Chaturthi 2022 Shubh Muhurt

 

गणेश चतुर्थी 2022 ही 30 ऑगस्ट 2022 दुपारी 03:33 वाजता आरंभ होणार आहे. तर 31 ऑगस्ट 2022 दुपारी 03:22 वाजता ला चतुर्थी तिथी मुहूर्त संपणार आहे.

 

 

हे नक्की वाचा:- गोकुळाष्टमी माहिती मराठी

 

गणेश चतुर्थी 2022 पूजा विधी कसा करायचा:-

गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठावे. त्यानंतर स्नान करावे. सहन करून झाल्यानंतर घरातील मंदिरात किंवा देव घरात दिवा लावायचा आहे. त्यानंतर श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी. स्थापना करून झाल्यानंतर गंगाजल ने अभिषेक करावा. गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर फुले अर्पण करावीत. सिंदूर लावून ध्यान करावयाचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा व त्यानंतर श्री गणेशाची आरती करायची आहे.

 

 

ही माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करता आमच्यावर भेट देत चला.

आमच्या teligram channel ला जॉइन होण्यासाठी इथे क्लिक करा.