आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना( Annabhau Sathe Karj Yojana; LASDC Schemes) या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना ही LASDC(Lokshahir Anna Bhau Sathe Dev.Co.Ltd.) अंतर्गत आपल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील लोकांसाठी राबविण्यात येत आहेत.
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना काय आहे? What is Annabhau Sathe Karj Yojana
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना(LASDC loan schemes 2022) ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येत असणारी महत्वपूर्ण अशी योजना आहे. जी LASDC अंतर्गत राबविण्यात येत आहे. ही अण्णाभाऊ साठे कर्ज योजना(Annabhau Sathe Karj Yojana) आपल्या महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील दारिद्रय रेषेखालील लोकांना आर्थिक व सामाजिक आधार देण्यासाठी राबविण्यात येत आहे. LASDC Loan schemes 2022 Maharashtra
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ Lokshahir Anna Bhau Sathe Dev.Co.Ltd. हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील जे बांधव दारिद्र्य रेषेखालील आहेत, ज्यांची परिस्थिती ही गरीब आहे, अश्या लोकांना आर्थिक सहाय्य पुरवीत आहेत. मातंग समाजातील बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना समाजात प्रवाहात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्याच प्रमाणे मातंग समाजातील लोकांचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी सहाय्य करत आहे.
आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची (Lokshahir Anna Bhau Sathe Dev.Co.Ltd) स्थापना ही कंपनी कायदा -1956 नुसार करण्यात आलेली आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना दिनांक ११ जुलै १९८५ रोजी करण्यात आलेली आहे.LASDC Loan schemes
अण्णा भाऊ साठे कर्ज योजना अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो?
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (Lokshahir Anna Bhau Sathe Dev.Co.Ltd) अंतर्गत अण्णा भाऊ साठे कर्ज योजना अंतर्गत मातंग समाजात समाविष्ट असणाऱ्या खालील १२ जाती आणि पोट जातींना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.
1. मातंग 2. मांग 3. मिनी-मादींग 4. दानखणी मांग 5. मादींग 6. मदारी 7. मांग महाशी 8. मांग गारुडी 9. राधे मांग 10.मांग गारुडी तर २०१२ पासून 11. मादगी 12. मादिगा ह्या दोन पोट जाती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना Annabhau Sathe Karj Yojana; LASDC अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना LASDC Loan schemes अंतर्गत खालील योजना ह्या राबविण्यात येत आहेत.
1. मुदत कर्ज योजना (TERM LOAN):-
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना(LASDC Loan schemes 2022) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजना अंतर्गत लाभार्थ्यांना विविध व्यवसायाकरिता NSFDC यांच्या मार्फत ज्या व्यवसायातील गुंतवणूक ही 5 लाख रुपये पर्यंत आहेत अश्या व्यवसायास मुदत कर्ज दिले जाते. या मुदत कर्ज योजना अंतर्गत कर्ज परतफेड करण्याचा कालावधी हा जास्तीत जास्त 5 वर्षे पर्यंत असतो. NSFDC यांच्या अंतर्गत मिळालेल्या कर्जाच्या रकमेवर आपल्याला 6% आहे. तर अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना(LASDC Loan schemes 2022) अंतर्गत मिळालेल्या कर्जाच्या रकमेवर व्याज दर हा 4% असतो.
हे नक्की वाचा:- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2022 महाराष्ट्र
2. महिला समृद्धी योजना ( Mahila Sumrudhi Yojana ) :-
या महिला समृद्धी योजना अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना 50 हजार रुपये पर्यंत कर्ज मिळत आहे. या मध्ये महामंडळाचे अनुदान 10 हजार रुपये आणि NSFDC चे 40 हजार रुपये कर्ज अनुदान हे देण्यात येत आहे. LASDC loan schemes 2022.
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना Annabhau Sathe Karj Yojana Maharashtra)अंतर्गत ही महिला समृद्धी योजना सन 2004-2005 पासून राबविण्यात येत आहेत. ही योजना फक्त महिलांकरिता राबविण्यात येत आहे. या महिला समृद्धी योजना अंतर्गत विधवा महिला, निराधार महिला आणि परितक्त्या महीला यांना प्राधान्य देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येते. या योजने अंतर्गत ग्रामीण भागांतील महिलांसाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ही 81 हजार रुपये एवढी आहे ते शहरी भागातील महिलांसाठी उत्पन्न मर्यादा ही 1 लाख 3 हजार रुपये आहे.
3. बीज भांडवल योजना (Margin Money) :-
या बीज भांडवल योजना अंतर्गत कर्ज मर्यादा ही 50 हजार रुपये ते 7 लाख रुपये पर्यंत आहे. या कर्ज मंजूर रकमेत 10 हजार रुपये वगळण्यात येईल व बाकीची रकमेत अर्जदाराला 5 % हिस्सा भरायला लागेल. आणि महामंडळ 20% हिस्सा आणि उर्वरित 75% हे बँकेचे कर्ज असेल. या योजने अंतर्गत दरवर्षी दसादशे 4% व्याज द्यावे लागेल.
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना लाभार्थी पात्रतेच्या अटी :-
1. अर्जदार हा मातंग समाजातील असावा
2. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
3. महामंडळाच्या अटी शर्ती चे पालन करणे आवश्यक असेल.
4. अर्जदारास ज्या व्यवसाय करिता कर्ज पाहिजे, त्या व्यवसायाचे पूर्ण ज्ञान व अनुभव हा अर्जदारास पाहिजे.
5. अर्जदाराची वय मर्यादा ही 18 ते 50 वर्षे असावी लागते
6. या पूर्वी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
7. उत्पन्न मर्यादा ही ग्रामीण भागांतील महिलांसाठी – 1 लाख 20 हजार रुपये तर शहरी भागासाठी 98 हजार रुपये
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना आवश्यक कागदपत्र
अण्णाभाऊ साठे कर्ज योजना (Annabhau Sathe Karj Yojana 2022) अंतर्गत खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
1. उत्पन्न दाखला
2. कास्ट सर्टिफिकेट
3. पासपोर्ट आकाराचा 2 फोटो
4. रेशन कार्ड
5. शैक्षणिक दाखला.
6. आधार कार्ड
7. मोबाईल नंबर
8. व्यवसाय जागेचा मालकी हक्काचा पुरावा किंवा भाडे करता
9. ड्रायव्हिंग लायसन्स
10. अनुभव दाखला
11. प्रतिज्ञापत्र
अण्णाभाऊ साठे कर्ज योजना वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ कर्ज योजना विषयीची ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करू. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.