आजच्या या लेखामध्ये आपण अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे? अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. annasaheb patil karj yojana अंतर्गत बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज दिले जाते. या योजने अंतर्गत देण्यात येत असलेले कर्ज हे बिनव्याजी असते. या अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत आपण ऑनलाइन पद्धतीने लोन साठी अर्ज करू शकतो. संपूर्ण माहिती साठी हा लेख संपूर्ण वाचा. या लेखामध्ये आपण annasaheb patil karj yojana साठी अर्ज कसा करायचा? या योजने अंतर्गत लाभ कसा मिळवायचा या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे?
आजच्या काळात बेरोजगार लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. खूप जास्त बेरोजगार युवक या देशात आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा अनेक बेरोजगार युवक आहेत, जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असेल परंतु त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसते. त्यामुळे अनेक लोकांची स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची स्वप्ने तशीच दडपून राहतात. कुणालाही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून किंवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून चालत नाही. व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशाची सुद्धा आवश्यकता असते. त्यामुळे ही annasaheb patil karj yojana ही जे व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छित असतील त्यांच्यासाठी एक संजीवनी देणारी योजना ठरणार आहेत.
हे नक्की वाचा:- राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना अर्ज प्रक्रिया
आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत मराठा तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते. नुकताच या योजने साठी म्हणजेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ साठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३० कोटी रुपये निधी वितरित करण्यासाठी gr(शासन निर्णय) हा प्रसिद्ध केला आहे.
हे नक्की वाचा:- १ मे महाराष्ट्र दीन माहिती मराठी
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्ज कसा करायचा:-
या अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी तुम्हाला महास्वयंम वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागतो.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आपल्या महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील तरुणांना जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात अश्या तरुणांना कर्ज उपलब्ध करून त्या तरुणांची स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत असते.
हे नक्की वाचा:- नवीन सिंचन विहीर अनुदान योजना सुरू
या योजने अंतर्गत किती कर्ज मिळू शकते. कर्जाची परतफेड,व्याजाची रक्कम पात्रता व कागदपत्रे या संदर्भात माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे:-
१)रहिवासी पुरावा.(कोणत्या ठिकाणचे रहिवासी आहात हे पाहण्यासाठी)
२)आधार कार्ड ( ओळखीचा पुरावा )
३)उत्पन्नाचा दाखला
४)कास्ट सर्टिफिकेट
५)कर्ज घेण्याचा प्रकल्प अहवाल
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत अण्णासाहेब पाटील कर्ज योजना(annasaheb patil karj yojana) अंतर्गत लाभ घेण्यासाठी वरील कागदपत्रे सादर करावी लागतात.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अटी व शर्ती व पात्रता:-
☑️या अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने या योजने पूर्वी कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
☑️ या अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील व्यक्ती लाभ घेऊ शकतात. त्याच बरोबर ज्या जातीसाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अशा जातीचे उमेदवार देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
☑️ या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी पुरुष तसेच महिला पात्र असून पुर्षासाठी जास्तीत जास्त वय ५० तर महिलांसाठी ५५ वर्षे इतके वय असेल तर अर्ज करू शकतात.
☑️अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मधून कर्ज मिळविण्यासाठी वार्षिक उत्पन्न हे ८ लाखापर्यंत असावे लागते.
☑️५ वर्षाकरिता किंवा किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी या पैकी जे कमी असेल तितक्या वर्षापर्यंत लाभ हा या अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत मिळतो. जर तुम्ही घेतलेले कर्जाची रक्कम ही जास्त असेल तर जास्तीत जास्त ३ लाख रुपयापर्यंत व्याज रकमेचा परतावा हे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत करण्यात येतो.
☑️ या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर ७ दिवसाच्या आत त्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
☑️ या योजने अंतर्गत लाभ घेऊन लाभार्थ्यांनी व्यवसाय सुरु केल्यानंतर ६ महिन्याच्या आत त्या व्यवसायाचे दोन फोटो हे संकेतस्थळावर अपलोड करावे लागेल.
हे नक्की वाचा:- मागेल त्याला शेततळे अनुदान योजना काय आहे?
अश्या पद्धतीने आपण जर स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छित असाल तर अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत कर्ज मिळवून व्यवसाय सुरु करू शकतात.
अण्णासाहेब पाटील योजना महामंडळाची व्याज परतावा किती?
या अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ( Annasaheb Patil Karj Yojana) अंतर्गत या योजनेच्या लाभार्थ्यांना महामंडळातर्फे पहिला हप्ता हा अनुदान म्हणून अदा करण्यात येणार आहे. त्या पहिल्या हप्त्यामध्ये मुद्दल + व्याज यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत महामंडळ या व्यतिरिक्त तीन लाख रुपयांच्या कर्ज योजने पर्यंत च्या रकमेवर बारा टक्के पर्यंत व्याज परतावा करणार आहे. म्हणजेच या अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत महामंडळ हे प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंत व्याज परतावा हा देणार आहे.
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना(Annasaheb Patil Maratha Karj Yojana) ही राबविण्यात येत आहेत. या योजनेमुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील मराठा बांधवांना व्यवसाय तसेच उद्योग उभारताना कर्ज मिळाल्यामुळे स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेता येणार आहे.
Annasaheb Patil Loan Scheme संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.
अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या teligram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.