पीक कर्जावर 1.5 टक्के व्याज सवलत; केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय | Crop Loan Interest Subvention Scheme 2022

पीक कर्जावर 1.5 टक्के व्याज सवलत; केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय | Crop Loan Interest Subvention Scheme 2022
पीक कर्जावर 1.5 टक्के व्याज सवलत; केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय | Crop Loan Interest Subvention Scheme 2022

 

 

केंद्र शासनाच्या वतीने अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर 1.5 टक्के व्याज सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली होती. या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी होते. त्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांच्या अल्पमुदतीच्या कृषी कर्जासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जासंबंधीच्या ह्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे. Crop Loan Interest Subvention Scheme 2022 शेतकऱ्यांच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. चला तर हा निर्णय काय आहे? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हे नक्की वाचा:- पीक कर्ज ऑनलाईन अर्ज सुरू

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वतीने शेतकरी बांधवांना अल्पमुदती कर्ज पुरवणाऱ्या(Crop loan Interest subvention 2022) सर्व वित्तीय संस्थांकरिता त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जावर 1.5 टक्के व्याज सवलत देण्यास मान्यता दिली आहे. crop loan interest

पीक कर्जाबाबत केंद्र शासनाचा मोठा निर्णय

सन 2022-23 ते सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता ज्या संस्था शेतकरी बांधवांना अल्पमुदती कर्ज देतील, अशा संस्थांना 1.5 टक्के व्याज सवलत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत वित्तीय संस्था या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतची अल्प मुदतीचे कर्ज देऊ शकतात, आणि 1.5 टक्के पर्यंत व्यास सवलत मिळवू शकतात.

हे नक्की वाचा:- नियमित कर्ज माफी संदर्भात महाराष्ट्र शासनाने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय

अल्प मुदतीचे कृषी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था खालील प्रमाणे आहेत

खालील वित्तीय संस्था ह्या शेतकरी बांधवांना अल्प मुदतीचे कृषी कर्ज(pik karj vyaj sawalat yojana) देत असतात.

सहकारी बँका, ग्रामीण बँका, प्राथमिक कृषी पतसंस्था, प्रादेशिक बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका आणि लघु वित्तीय बँका या शेतकरी बांधवांना अल्प मुदतीचे कृषी कर्ज देत असतात. आता या वित्तीय संस्थांनी शेतकरी बांधवांना दिलेल्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर केंद्र शासनाच्या वतीने 1.5% व्याज अनुदान (Crop loan Interest subvention 2022) दिले जाणार आहे.

 

अल्प मुदती कृषी कर्ज व्याज सवलत योजना आर्थिक तरतूद

केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असणाऱ्या Crop Loan Interest Subvention Scheme 2022 अंतर्गत सण 2022-23 ते 2024-25 या कालावधीमध्ये ही योजना राबवण्याकरिता वाढीव व्याज सवलतीसाठी केंद्र शासनाच्या वतीने 34,856 कोटी इतक्या रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

हे नक्की वाचा:- या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारे 15,000 रुपये

अल्प मुदती कृषी कर्ज व्याज सवलत योजना अंतर्गत मिळणारे लाभ

केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अल्पमुदती कृषी कर्ज व्याज सवलत योजना( Pik Karj Vyaj Savalat Yojana) अंतर्गत व्याजाच्या सवलतीत वाढ केलेली असल्यामुळे शेतकरी बांधवांना दीर्घ काळाकरिता कृषी कर्जाचा पुरवठा हा होणार आहे. यामुळे कृषी कर्ज पुरवणाऱ्या वित्त संस्थांना त्यांचे आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती तसेच व्यवहार्यता ही सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या अल्प मुदती कृषी कर्ज व्याज सवलत योजना 2022 अंतर्गत आता देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि बँकांना सुद्धा कर्ज देण्याकरिता प्रोत्साहित करण्यात येणार आहे. pik karj vyajmafi 2022

केंद्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांचे उत्पन्न हे दुप्पट करणे. त्याचप्रमाणे शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा याकरिता अनेक पावले उचलण्यात येत आहे. पिक कर्ज व्याज सवलत योजना संबंधित ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा.