मित्रांनो जे विद्यार्थी दहावी पास आहेत, अश्या विद्यार्थ्यांना “विद्याधन” स्कॉलरशिप योजने अंतर्गत 20 हजार रुपये इतकी स्कॉलरशिप मिळणार आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण विद्याधन” स्कॉलरशिप योजने अंतर्गत Vidyadhan Scholarship Online Application कसा करायचा? विद्याधन स्कॉलरशिप योजने अंतर्गत अर्ज केव्हा आणि कसा करायचा? या “विद्याधन” स्कॉलरशिप योजने (Vidyadhan Scholarship Yojna) संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
10 वी पास विद्यार्थ्यांना 20 हजार रु स्कॉलरशिप अर्ज सुरू | Vidyadhan Scholarship Online Application |
विद्याधन स्कॉलरशिप योजना काय आहे? What is Vidyadhan Scholarship Scheme
विद्याधन स्कॉलरशिप योजना ही भारतातील महत्वपूर्ण अशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती देणारी योजना आहे. ही विद्याधन स्कॉलरशिप योजना(Vidyadhan Scholarship Scheme) सरोजिनी दामोदरन फाउंडेशन द्वारे दिली जात आहे. विद्याधन स्कॉलरशिप योजना ही एक भारत देशात राबविण्यात येत असलेली महत्वपूर्ण शिष्यवृत्ती योजना आहे. इन्फोसिस सहसंस्थापक एस. डी. शिबुलाल आणि व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती कुमारी शिबुलाल यांनी सरोजिनी दामोदरन फाउंडेशनची स्थापना(Vidyadhan Scholarship) केलेली आहे. यांनी १९९९ मध्ये या फाउंडेशनची स्थापना केलेली आहे.Vidyadhan Scholarship Apply Online 2022
सरोजिनी दामोदरन फाउंडेशन ने आजपर्यंत आपल्या भारत देशातील महाराष्ट्र, गोवा, ओडिशा,आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात,केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दिल्ली या राज्यांत २७,००० पेक्षा जास्त शिष्यवृत्ती ह्या वाटप केलेल्या आहेत. ह्या विद्याधन स्कॉलरशिप योजना(Vidyadhan Scholarship Scheme) अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.(Vidyadhan Scholarship scheme 2022) आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना विद्याधन स्कॉलरशिप योजना 2022 अंतर्गत अर्ज सुरू झालेले आहेत.
विद्याधन स्कॉलरशिप योजना कोण अर्ज करू शकतो?
विद्याधन स्कॉलरशिप योजना करिता खालील विद्यार्थी अर्ज करू शकतात.
1. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची दहावीची परीक्षा वर्ष 2022 मध्ये उत्तीर्ण केलेली आहे.
2. ज्या विद्यार्थ्यांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आहे रुपये दोन लाख रुपयांपेक्षा कमी आहेत.
3. ज्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत 85 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण किंवा 9 CGPA प्राप्त केलेले विद्यार्थी.
4. अपंग विद्यार्थ्यांकरिता या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता 75 टक्के मार्क असणे आवश्यक आहे.
विद्याधन स्कॉलरशिप योजना किती स्कॉलरशिप मिळणार आहे?
या विद्याधन स्कॉलरशिप योजना(Vidyadhan Scholarship Yojana) अंतर्गत ११ वी व १२ वी करिता एकूण २० हजार रुपये स्कॉलरशिप ही प्रदान करण्यात येत आहे. Scholarship For 10th Students
हे नक्की वाचा:- दहावी पास विद्यार्थ्यांकरिता फ्री टॅबलेट योजना
विद्याधन स्कॉलरशिप आवश्यक कागदपत्रे Vidyadhan Scholarship Required Documents
1. Income Certificate ( विद्यार्थी यांच्या नावाचा )
2. 10th marksheet
3. विद्यार्थ्यांचा ईमेल आयडी
4. पासपोर्ट साइज् फोटो
विद्याधन स्कॉलरशिप योजना पात्रता (Vidyadhan Scholarship Eligibility)
1. विद्यार्थी हा वर्ष 2022 मध्ये 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेला पाहिजे.
2. अर्जदार विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रू 2 लाख पेक्षा कमी असावे.
3. ज्या विद्यार्थ्यांनी वर्ष 2022 मध्ये 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे, अश्या विद्यार्थ्यांना 85% किंवा 9 CGPA वरील गुण असावे लागते. अपंग विद्यार्थ्यांसाठी 75% गुण किंवा 7 CGPA असावा लागतो.
विद्याधन योजना विद्यार्थी निवड प्रक्रिया माहिती:-
विद्याधन स्कॉलरशिप योजना(Vidyadhan Scholarship scheme) अंतर्गत विद्यार्थ्यांची चाचणी आणि मुलाखत घेऊन निवड केली जाते. सध्या या विद्याधन स्कॉलरशिप योजना कार्यक्रमात गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा,केरळ, कर्नाटक, तामिळनाडू,पाँडिचेरी, आंध्र प्रदेश, ओडिशा, नवी दिल्ली आणि लडाख मधून 5000 विद्यार्थी सहभागी आहेत. या विद्याधन स्कॉलरशिप योजना(Vidyadhan Scholarship Yojana) अंतर्गत ज्यांची निवड होईल ते दोन वर्षांच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. जर निवड झालेले विद्यार्थी असेच चांगले प्रावीण्य मिळवत राहिल्यास त्यांना त्यांच्या आवडीचा कोणताही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्या करिता sholorship दिली जाईल. या योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता विद्यार्थी फ्री मध्ये अर्ज करू शकतात. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे अर्जदारांची शॉर्टलिस्ट करेल. या करिता कोणतेही शुल्क नाही. या योजने अंतर्गत पदवी अभ्यासक्रमांसाठी Sholorship ची रक्कम ही रू 10,000 ते 60,000 रू पर्यंत असते.Vidyadhan Scholarship अंतर्गत
हे नक्की वाचा:- OBC आणि SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप योजना
विद्याधन स्कॉलरशिप योजना रक्कम (Vidyadhan Scholarship Amount)
या विद्याधन स्कॉलरशिप योजना(Vidyadhan Scholarship Amount) अंतर्गत 11 वी आणि 12वी इयत्तेसाठी स्कॉलरशिप रक्कम ही जास्तीत जास्त 10000 रुपये/वर्ष. असणार आहे.
विद्याधन स्कॉलरशिप योजना अंतिम तारीख (Vidyadhan Scholarship Last Date )
विद्याधन स्कॉलरशिप योजना(Vidyadhan Scholarship Yojana) अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2022 ही आहे. त्यानंतर 25 सप्टेंबर 2022 ला स्क्रीनिंग टेस्ट होईल. त्यानंतर 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2022 या तारखांचा दरम्यान मुलाखत/चाचण्या नियोजित करण्यात येणार आहेत. त्यानंतर ज्या विद्यार्थी यांची निवड होईल, त्यांना अचूक तारीख देण्यात येणार आहेत आणि स्थान सूचित करण्यात येणार आहे.
विद्याधन स्कॉलरशिप योजना 2022 अर्ज प्रक्रिया How to Apply Vidyadhan Scholarship Online 2022
विद्याधन शिष्यवृत्ती योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या विद्यार्थ्यांना विद्याधन शिष्यवृत्ती योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यांनी www.vidyadhan.org किंवा डाउनलोड Vidyadhan Scholarship SDF Vidya App वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. विद्याधन योजनेच्या चौकशी संबंधी माहिती करता vidyadhan.maharashtra@sdfoundationindia.com या वेबसाईट वर भेट द्या.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करताना स्वतःचा ईमेल वापरावा. जर तुमच्याकडे स्वतःची ईमेल आयडी नसेल तर तुम्ही सर्वप्रथम ई-मेल आयडी तयार करून घ्यावी.
हे नक्की वाचा:- Government Hostel काय आहे? प्रवेश प्रक्रिया, सोयी सुविधा संपूर्ण माहिती
विद्याधन स्कॉलरशिप योजना नवीन खाते नोंदणी करताना तुम्हाला तुमचे पूर्ण नाव प्रविष्ट करायची आहे. तुमच्या टीसी किंवा मार्क शीट वर जे नाव असेल ते प्रविष्ट करावे. स्वतःचा ईमेल आयडी असायला हवा, भविष्यात त्या ईमेल वर तुम्हाला पुढील माहिती मिळणार आहे. त्यामुळे ईमेल नसल्यास तयार करून घ्यावा. पासवर्ड तयार करताना strong तयार करण्यात आला पाहिजे.
ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.