मित्रांनो सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल हा लागलेला आहे. त्यामुळे आता पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्रांची आवश्यकता भासत असते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात, तसेच शासकीय दाखले लागतात या विषयी माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण शासकीय दाखला मिळण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. List of all required documents for students
शासकीय दाखला मिळविण्यासाठी लागणारी आवश्यक सर्व कागदपत्रे | List of all required documents for students |
मित्रांनो आता दहावी आणि बारावीच्या निकालानंतर किंवा तुम्ही कोणत्याही वर्गात शिकत असाल तुम्ही कोणताही कोर्स करत असाल तरी सुद्धा तुम्हाला काही महत्त्वपूर्ण शासकीय दाखले ॲडमिशन च्या वेळेस जमा करावी लागत असतात. त्यामुळे तुमच्याकडे हे दाखले असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे हे दाखले नसेल तर तुमची वेळेवर तारांबळ उडू शकते. त्यामुळे तुमची ऍडमिशन सुद्धा दाखले नसल्यामुळे रद्द होऊ शकते किंवा तुम्ही अपात्र ठरू शकतात. त्यामुळे वेळेच्या आत ही सर्व कागदपत्रे काढून घ्यावी. List of all required documents to obtain the government certificate, sarv aawshyak kagdptranchi yadi
हे सुद्धा वाचा:- शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे? संपूर्ण माहिती
महत्वपूर्ण शासकीय दाखले Important Government Certificates: –
शिक्षण शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडे खालील काही महत्त्वपूर्ण अशी शासकीय दाखले असणे आवश्यक आहे. ती दाखले खाली दर्शविलेली आहे.
1. उत्पन्न दाखला( 1 वर्ष )
2. उत्पन्न दाखला ( 3 वर्ष )
3. जातीचा दाखला( Cast certificate)
4. अधिवास प्रमाणपत्र
5. नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट
6. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट
7. जात पडताळणी प्रमाणपत्र
8. आधार कार्ड
शासकीय दाखला मिळविण्यासाठी लागणारी आवश्यक सर्व कागदपत्रे (List of documents required to obtain government certificates) :-
1. उत्पन्न दाखला:-
उत्पन्न दाखला हे एक महत्त्वपूर्ण शासकीय दाखला आहे. उत्पन्न दाखला हा तुम्हीं तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतात. किंवा csc सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथून तुम्ही उत्पन्न दाखला करिता अर्ज करू शकतात.
उत्पन्न दाखला(1 वर्षे) आवश्यक कागदपत्रे :-
1. शिधापत्रिका ची प्रमाणित प्रत
2. आधार कार्ड
3. तलाठी अहवाल
उत्पन्न दाखला (3 वर्षे) आवश्यक कागदपत्रे :-
Non cremelayer तसेच इतर काही दाखले मिळविण्यासाठी 3 वर्षे चा उत्पन्न दाखला पाहिजे असतो.
1. शिधापत्रिका ची प्रमाणित प्रत
2. आधार कार्ड
3. तलाठी अहवाल
3. जातीचा दाखला( Cast certificate):-
Cast certificate हे एक महत्त्वपूर्ण अशी शासकीय दाखले आहेत. एससी एसटी आणि ओबीसी तसेच vjnt प्रवरगतील व्यक्तींना आरक्षण कोट्यातून लाभ घेण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक असते.
1. शाळा सोडल्याचा दाखला
2.वडिलांचा पूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स ओ.बी.सी. साटी १९६७ एन.टी. साठी १९६१ पुर्वीचा पुरावा एस.सी. साठी १९५० पुर्वीचा पुरावा असल्यास
3.मुलांच्या नावाचा जात नमुद तलाठी चौकशी अहवाल
4. आधार कार्ड झेरॉक्स
5. रेशन कार्ड झेरॉक्स
6. फोटो
4. अधिवास प्रमाणपत्र ( Domicile certificate ) :-
स्कॉलरशिप चा अर्ज करण्यासाठी तसेच इतर आवश्यक कर्यांकतीता अधिवास प्रमाणपत्र ( Domicile certificate ) आवश्यक असते.
1. शाळा सोडल्याचा दाखला
2. तलाठी रहिवासी दाखला
3. रेशन कार्ड
4. आधार कार्ड
5. फोटो
5. नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट:-
एससी एसटी ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट असावेच लागते.
1. तहसिलदार उत्पन्न दाखला (३ वर्षांच्या उत्पन्नासहीत)
2. जातीच्या दाखल्याची झेरॉक्स
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. मुलांच्या नावाचा जात नमुद तलाठी चौकशी अहवाल
5. आधार कार्ड झेरॉक्स
6. रेशन कार्ड झेरॉक्स
7. नोकरी असल्यास फार्म नं. १६
8. फोटो
6. जात पडताळणी:-
खास करून science faculty मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
1. प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला
2. माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला
3. कॉलेज शाळा सोडल्याचा दाखला .
4. प्राथमिक शाळा प्रवेश रजिस्टरचा उतारा
5. माध्यमिक शाळा प्रवेश रजिस्टरचा उतारा
6. जन्म मृत्यू नोंदवहीचा उतारा
7. जमिनीचा ७ / १२ उतारा
8. कोतवाल नोंदवहीचा उतारा, राष्ट्रीयत्वचा नोंदवहीचा उतारा
9. सेल डिड / महसूल विभागाकडील कागदपत्रे
10. नावामध्ये / आडनावामध्ये बदल यासंबंधीचे राजपत्र
11. जातीचे प्रमाणपत्र
12. सेवा वैधता प्रमाणपत्र
13. जात वैधता प्रमाणपत्र
14. वारसा हक्क प्रमाणपत्र
7. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट:-
केंद्र शासनाच्या अंतर्गत निघणाऱ्या सर्व जॉब साठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आवश्यक असते. जसे की ibps exam, india post
1. Affidavit
2. Cast certificate state
3. Income certificate for 3 years
4. Copy of School leaving certificate
5. Copy of School leaving certificate of Father
6. Cooy of death certificate
7. Cooy of kotwal Book
8. आधार कार्ड:-
1.Ration Card.
2.Passbook.
3.Bank statement.
4.Insurance documents.
5.Utility bills like electricity and telephone bill.
6.Address certificate signed by a registered company on letterhead.
आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण अशे दस्त ऐवज आहे. जे कोणतेही दस्त ऐवज बनविण्यासाठी आवश्यक असते.
मित्रांनो तुम्हाला ही शासकीय दाखला मिळविण्यासाठी लागणारी आवश्यक सर्व कागदपत्रे | List of all required documents for students पोस्ट महत्वपूर्ण वाटत असल्यास तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता या वेबसाईट ला भेट देत चला आणि आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा.